सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचे मूल्यांकन करावे !

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेला सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावाच्या शिवारातून जात असल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या कामात जात आहेत. हा महामार्ग जात असलेल्या भागाचा सर्व्हे करताना परिसरातील बधित शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे या भागातील बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जमिनीचे मूल्यांकन करावे, अन्यथा करू नये, अशी मागणी … Read more

शहरात घाणीचे साम्राज्यामुळे शेवगाव शहर बनले आहे बकाल, नगरपालिकेचे होत आहे दुर्लक्ष !

kachara

शहरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहर बकाल होत असल्याचे दिसून येत असून, मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर, ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांनी गटाराचे रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आंदोलनाला उधाण आलेले असून, फक्त देखाव्या पुरतेच आंदोलने सुरू असून, नागरिकांचे … Read more

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेतील बैठकीनंतर महसूल संघटनेचा निर्णय !

radhakrushn vikhe

महसूल खात्याच्या विविध विभागातील कर्मचारी. महसूल कर्मचाऱ्यांच्या संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री … Read more

चोरट्याने परत आणून ठेवलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठण राहुरी पोलिसांकडून मूळ मालकाला परत !

chori

राहुरी तालुक्यातील कणगर येथे भर दिवसा अज्ञात भामट्याने गाढे यांच्या घरात घुसून घरातील रोख रक्कमेसह सात तोळे सोन्याचे दागीने पळवून नेल्याची घटना दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. तपासादरम्यान पोलिस पथकाला मिळून आलेले सोन्याचे गंठण गाढे यांना परत करण्यात आले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की स्वाती अशोक गाढे (वय ३५ वर्षे) या … Read more

मी, शब्दाचा पक्का, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी जोमाने पुढे नेवू : ना. पवार

ajit pawar

मी, शब्दाचा पक्का आहे जर तुम्ही महायुतीचे आमदार निवडून दिले तरीही योजना यापुढे आणखीन जोमाने नेऊ, हा दादाचा शब्द आहे, असे वक्तव्य जाहीर सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी केले. अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचे काम करताना पैसे खाल्ल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. सावेडी येथे महिला मेळाव्यात … Read more

सर्व योजना सुरळीत चालू राहण्यासाठी महायुतीला सत्तेत कायम ठेवा, ना. अजित पवारांचे मतदारांना आव्हान

ajit pawar

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले. जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या … Read more

प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याच्या खून प्रकरणातील आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी !

karagruh

राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील चार आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२०२४ नुसार दाखल आहे. या प्रकरणाचा खटला सध्या सुरू आहे. यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत … Read more

डेंग्यूमुक्त शहर बनवण्यासाठी लोकचळवळीची खरी गरज : आ. संग्राम जगताप

sangram

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असते. वेळेवर उपायोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो. झिका डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपयोजना सुरू केल्या आहे. परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक असते. नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराची स्वच्छता करावी, या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ … Read more

श्रीगोंद्यात भिंगान परिसरात ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार !

apghat

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर गायकवाड (वय ३२, रा. भिंगाण), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड (वय ५५), रा. भिंगाण) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीगोंदा … Read more

अहमदनगर येथे तरुणाकडून महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेडछाड !

chedchad

अहमदनगर येथील महाविद्यालय सुटल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या गेटवर अडवून तिची छेडछाड केल्याचा प्रकार लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयासमोर घडला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कृष्णा किरण कांबळे (रा. प्रबुद्ध नगर, भिंगार) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पिडीत तरुणीने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात … Read more

कोविडमध्ये निधी उपलब्ध होत नव्हता तरी देखील विकासाची कामे सुरूच होती : आ. जगताप

sangram jagtap

अहमदनगर शहराची विकास कामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, तसेच सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला त्यामुळे विकास कामे करीत असताना अडचणी आल्या, मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली गेली, मी सरकारमधला प्रतिनिधी असल्याने शहराच्या विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला व ती कामे आता टप्प्याटप्प्याने सुरू आहेत, विकासाची कामे सुरू असल्यामुळे … Read more

डिंबे माणिक डोह कालवा झाला नाही तर तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल – घनश्याम शेलार !

ghanshyam shelar

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

खा. नीलेश लंके यांचा एस.टी. प्रवास अन् प्रवाशांना सुखद धक्का ! नगर ते तिसगांव प्रवासात जाणून घेतल्या समस्या

nilesh lanke

नगर : खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगांव या मार्गावर एसटीने प्रवास करीत बसमधील प्रवाशांना आश्‍चर्याचा धक्का दिला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. नीलेश लंके यांच्यासारखाच खासदार हवा अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी यावेळी दिल्या. पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार खा. लंके हे तिसगांव येथे जाणार होते. स्वतंत्र वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी एसटी ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. … Read more

जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व टीडीओमध्ये तू तू मै मै, व्हिडिओ व्हायरल !

lalage

पारनेर : प्रतिनिधी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला. अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापले व दोघांमध्ये तू तू, मै मै झाली. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो, असे सांगत लाळगे यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री … Read more

अहमदनगर पुणे महामार्गालगत राळेगण सिद्धी फाट्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी !

accident

अहमदनगर पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १९) पहाटे राळेगणसिद्धी फाट्याजवळ चारचाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवारी (दि.१९) माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार (रा. ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) व वाहनचालक जखमी राहुल लिंबाजी राठोड … Read more

वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर, सुपा परिसरात रुग्णसंख्येत वाढ !

helth

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागते आहेत. या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, त्यातून अनेकजण इन्फेक्शन ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी … Read more

शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुक्यात कधीही भेदभाव न करता समान निधी दिला : आ. राजळे

monika rajale

गेली १० वर्षापासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्ही ही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला असून, मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी, दहिगाव शे, बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या … Read more

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात ग्रामसडक योजनेअंतर्गत ५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर – आ. राजळे !

monika rajale

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक २ मधून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील ३९ कि.मी. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ५४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात प्रथमच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना एवढा मोठा निधी मिळाला आहे. याबाबत माहिती देताना … Read more