तिसगावमधील ८३ अतिक्रमणधारक वगळता उर्वरित अतिक्रमणांवर २२ जुलैला पडणार हातोडा ?
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील ४०१ अतिक्रमणधारकांपैकी ८३ लोकांचे अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयास अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर उर्वरित ३१८ लोकांचे २२ जुलैला अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती समजली आहे. तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील गायरान क्षेत्रामध्ये लोकांनी अतिक्रमण केले म्हणून हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी … Read more


