स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी लाभार्थी भगिनींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे पाप भाजपवाल्यांनी करू नये !

rashtravadi

राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची यंत्रणा महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी झटून काम करीत आहे. या गोष्टीचा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांना पोटशूळ उठला आहे. यापेक्षा भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी सरकारने या अर्थ संकल्पात मतदारसंघाला एक रुपयाचाही निधी का दिला नाही, असा जाब शासनाला विचारायला पाहिजे होता. मात्र त्यांनी हे काम न करता … Read more

ज्यांनी आधी नवे ठेवली आता तेच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत – कर्डीले !

kardile

राज्यातील गोरगरीब, गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील गोरगरीब गरजू पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेला राज्यभरातून सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेला आधी नावे ठेवणारे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आता या योजनेचे श्रेय … Read more

तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिवाजीराव गर्जे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात प्रवेश !

shivaji garje

यापूर्वी दोन वेळा आमदारकीची संधी हुकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना यावेळी मात्र विधान परिषदेच्या सभागृहाची प्रवेशिका मिळाली. मतांच्या आवश्यक कोट्यापेक्षा एक अधिकचे मत मिळवत गर्जे यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून गर्जे यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि विधानसभेत जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना … Read more

संजय राऊत यांचे नगर जिल्ह्यात मोठे विधान.. म्हणाले, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत”.. पैकी २ उमेदवार जाहीर केले…

sanjay raut

श्रीगोंदा : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना उपनेते साजन पाचपुते हे शिवसेनेचे श्रीगोंद्यातून उमेदवार असतील. ते आमदार म्हणून राणी लंके यांच्याबरोबर एकाच गाडीत विधानसभेत येतील, असे विधान करत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही तर, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात महाविकास आघाडी कडून … Read more

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोन रोड रोमिओंवर गुन्हा दाखल !

chedchad

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीने दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना एका महिन्याचा कालावधी का लागला … Read more

माजी खा. तनपुरे यांचे महसूलमंत्र्यांना पत्र, राहुरीतील प्रशासकीय कार्यालये शहराबाहेर नेण्याचा घाट घालू नये !

prasad tanapure

राहुरी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शहराच्या बाहेर बिजगुणन प्रक्षेत्रावर बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते तालुक्यातून येणाऱ्या जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे असून ते बाहेर हलवू नये, अन्यथा या निर्णयविरुद्ध जनआंदोलन होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय प्रतिष्ठेचा न करता याचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले आहे. माजी … Read more

नगरमध्ये कांद्याला आज मिळाला ‘इतका’ भाव ; तब्बल ३९५ ट्रक कांद्याची झाली आवक !

kandda market

  Ahmednagar News: गुरुवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ४० हजार ९५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ७०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी काहीसे नाखूष झाले आहेत. सध्या दुधाचे देखील मोठ्या प्रमाणात भाव पडले आहेत.मात्र पशुखाद्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे एकीकडे खर्च वाढला असून … Read more

दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विळद बायपास ते पुणतांबा फाट्यापर्यंतची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने !

avajad vahan

पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रोडचे काँक्रीटीकरण, शिंगणापुर फाटा ते राहुरी दरम्यान रोड दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरुन अवजड वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. या अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) … Read more

१० वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी तालुक्याचा काय विकास केला – घुले !

ghule

स्व. घुले पाटील यांचेपासून ते आज पर्यंत शेवगाव तालुक्यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी घुले घराणे कायम पुढे राहिले असून येथून पुढच्या काळात तीच आमची वाटचाल राहणार आहे. असे मत स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे. आगामी राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला !

grampanchayat

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सदस्य संख्याबळा अभावी फेटाळण्यात आला. तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या १० सदस्यपैकी १ सदस्य गैरहजर राहिल्याने तहसिलदार यांनी अविश्वास ठराव फेटाळल्याचे … Read more

गाणे लावून वाढदिवस साजरा केल्याने ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल !

gunha dakhal

भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या चांदबीबी महाल म्हणजेच सलाबत खानाची कबर असलेल्या ऐतिहासिक वास्तूत मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे लावून वाढदिवस साजरा करत या ऐतिहासिक वास्तूचा गैरवाजवी वापर केल्या प्रकरणी नगर मधील मोहन लुल्ला यांच्या सह ३० ते ४० जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारतीय पुरातत्व विभागाच्या नगर कार्यालयातील संतोष … Read more

अहमदनगर मध्ये विजेचा शॉक बसून तरुणाचा अकस्मात मृत्यू

vejecha shock

अहमदनगर : येथे राहत्या घरात विजेचा शॉक बसून ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे मंगळवारी (दि.९) सकाळी घडली. अक्षय श्रीमंत गोरे (रा. रुईछत्तीसी, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अक्षय गोरे हा राहत्या घरात काम करत असताना त्याला मंगळवारी (दि.९) सकाळी विजेचा शॉक बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला … Read more

दुधातील भेसळ बंद झाल्यास दूधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल – शेतकरी नेते सुरेशराव लांबे

dudh bhesal

गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुडघ्याला असा प्रकार पाहायला मिळत आहे. दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी ओरडणारे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टिका करीत दूधातील भेसळ थांबल्यास दूधाला प्रतिलिटर ५० रुपये … Read more

पिकावरील अमर्याद खते व तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीचा कस बिघडतोय !

tanaanashak

शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढला त्यामुळे जमिनीची सुपिकता सेंद्रिय कर्ब व तिचा पोत ढासळत आहे. जमिनी खारपड व चोपन होत आहेत. उत्पादन खर्च वाढून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत असताना दुसरीकडे वर्षाकाठी हजारो लिटर तणनाशकांचा … Read more

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठे नुकसान !

dhagfuti

जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डासहित जामखेड शहरात ८ जुलै रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने छोट्या बंधाऱ्यासहित मोहरी तलाव हा केवळ दोन तासात भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याचा प्रकार २५ वर्षात पहिल्यांदाच घडला असल्याचे जुने जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोहरी येथील काही शेतकऱ्यांचे मात्र या तुफान मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद … Read more

नगर तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट, राज्यमार्गात होणार रुपांतर – आ. तनपुरे !

rajya marg

नगर तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निंबळक-चास- खंडाळा ते राज्य मार्ग १०, ते वाळुंज- नारायण डोह प्र राज्य मार्ग २, ते राज्य मार्ग १४८, बारदरी- खांडके-कापूरवाडी- पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी ते राज्य मार्ग, १४६ हा रस्ता दर्जोन्नत करण्यात येऊन त्यांचे राज्य मार्गात रूपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राजक्त … Read more

पाट पाणी आणणे व जिरायत शेतीसाठी पाणी हेच माझे मुख्य ध्येय – अॅड. ढाकणे

adv dhakane

जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुक लढवल्या. मात्र, यामध्ये माझा पराभव झाला तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचा प्रयत्न केला, येथून पुढच्या काळातही तो संघर्ष सुरूच राहील. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधींनी शेतीच्या पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा जिरायत भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतीसाठी … Read more

महाराष्ट्र्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रात लाडकी ठरणार !

ladaki bahin

महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे, या याजनेंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. त्या नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या महिलांना … Read more