योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मोफत अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करणार माजी मंत्री कर्डिले !

kardile

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राहुरी मतदारसंघातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री कर्डिले यांनी राहुरी … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवाव्या – आ. मोनिका राजळे !

monika rajale

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी आठशे रुपये मिळत होते; परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंधराशे रुपये मिळत आहे. खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेच्या जाचक अटी शिथिल … Read more

देवळाली परिसरातील धक्कादायक घटना, विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू !

shocking daeth

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार घडली. नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली असून विद्युत विरोधी साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास नारळाच्या फांद्या तोडण्यास लावल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटकळी येथील रहिवासी … Read more

कारंजी घाटात आढळला अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह !

crime

कल्याण-निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील करंजी घाटामध्ये माणिकशहा पिरबाबा दर्गाजवळील धोकादायकक वळणाजवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये अंदाजे ३५ वय असलेल्या एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह डीवायएसपी सुनील … Read more

प्रशासनावर कोणाच्या तरी दबावाखाली काम करतय – खा. निलेश लंके यांचा गंभीर आरोप !

nilesh lanke

आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. खा. लंके म्हणाले, गावागावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. आज मोठ्या संख्ये जनावरेदेखील या आंदोलनात आणण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मात्र प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप खा. लंके यांनी केला आहे. सरकारने चार महिन्यांपूर्वी अनुदान जाहीर केले. त्यातील दोन टक्के … Read more

त्या सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम सरसकट मिळावी – चंद्रशेखर घुले

pikvima

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ यावर्षी पिकविमा भरला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम अदा केली जावी तसेच मागणी असेल त्या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत केली. श्री. घुले यांनी मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली असून, या यात्रेत लोकांचे प्रश्न व … Read more

श्रीगोंद्यातल्या आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच-उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव !

politics

श्रीगोंदा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरुद्ध दहा सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करण्यासह उपसरपंचाच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप या सारख्या कारणांमुळे दि.५ रोजी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर … Read more

बारा दिवसात काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन, ‘नगर-मनमाड’साठी शिवसेना उतरली रस्त्यावर !

highway

नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग नागरिकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. अपघात तर नित्याचेच झाले आहेत. तरीदेखील प्रशासनास जाग का येत नाही? प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरत वेळ पडल्यास नगर- मनमाड मार्गासाठी गुन्हें झेलण्यास तयार आहोत. परंतु मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी … Read more

हॉटेल मालकावरील जीवघेण्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थांकडून निषेध करत चार तास निघोज बंद.

nighoj crime

मंगळवारी २ तारखेला निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी तिव्र निषेध केला. गुरुवार (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानेस्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. येत्या दोन दिवसांत पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा … Read more

वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी, राहुरीत रिंगरोड तयार करण्यात यावा !

ringrod

अहमदनगरच्या राहुरी शहरामधून नगर- मनमाड हा राज्यमार्ग जातो. या रस्त्याने दक्षिण व उत्तरेकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या रस्त्याची दुरवस्था हा काही आजचा प्रश्न नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे या रस्त्यास पर्याय म्हणून याठिकाणी रिंगरोड होणे गरजेचे आहे. त्याबाबत राहुरी नगरपालिकेने लक्ष द्यावे, … Read more

पावसाच्या तडाख्याने जामखेडच्या खडर्यातील ऐतिहासिक ‘निंबाळकर गढीचे’ बुरूज ढासळले !

disaster

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या ऐतिहासिक निंबाळकर गढीच्या तटबंदी, बुरुज व मुख्य इमारतीची पडझड चालूच असून, या पावसाळ्यात तिच्या अस्तित्वाचा प्रश्नच गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी करत आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या गढीच्या पश्चिमेकडील बुरुज कोसळल्याने या गढीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच ही सततची … Read more

चार दिवसाच्या कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी सरकारी पथक कोंभळीत दाखल !

karjat midc

कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या रुपरेखा सर्व्हेक्षण पथकाचे कोंभळी येथील ग्रामस्थांकडून वाजत -गाजत स्वागत करण्यात आले बहुचर्चित कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यभरात चर्चिला जात आहे. या एमआयडीसीबाबत आ. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केल्याने याची दखल घेत राज्य सरकारच्या आदेशानुसार एमआयडीसीच्या सव्र्व्हेक्षणासाठी कोंभळी येथे रूपरेखा सर्व्हेक्षण पथक आज बुधवार (दि.३) जुलै … Read more

वाळकीच्या सामाजिक कार्यकर्त्यामुळे मिळाला पक्ष्यांना हक्काचा निवारा !

social work

सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरण मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी उपलब्ध करुन देण्याची मोहिम हाती घेतली आहे. उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भालसिंग यांनी विविध ठिकाणी झाडावर भांडी लटकवून धान्य व पाण्याची व्यवस्था केली होती. तर पावसाळ्यात … Read more

जेवणावरून तुफान राडा ! निघोज येथील जत्रा हॉटेलवरील घटना.

crime

पारनेर तालुक्यातील निघोज येथील जत्रा हॉटेलवर जेवणावरून तुफान राडा झाला. या वेळी आरोपींनी हॉटेल मालकासह वेटरला कोयता व तलवारीने मारहाण केल्याने हॉटेल मालक प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती पोलिसांना देताना फिर्यादी गणेश भाऊ भुकन यांनी सांगितले की, … Read more

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर ! शिर्डीत सुरू झाली मोर्चेबांधणी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : 18 व्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी राहिल्याचे आपण पाहिले. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरपासूनचं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. पारनेर चे माजी आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी कडून आणि भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील महायुतीकडून निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक शरद पवार … Read more

निलेश लंकेंकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य ! म्हणतात की….

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेअर झाला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे निलेश लंके हे एक जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खरंतर नगर दक्षिणची निवडणूक ही मोठी अटीतटीची झाली. या निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने निलेश लंके … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार !

Ahmedanagar Vidhansabha 2024

Ahmedanagar Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर झाला आहे. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महायुतीचा सुपडा साफ झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेने आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारत विजयी गुलाल उधळला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात … Read more

लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. साऱ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटात बंद दाराआड जागा वाटपावर खलबत देखील सुरू झाले आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली … Read more