अहमदनगर मनमाड मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी व नागरिक वैतागून गेले होते. गॅस पाईपलाईचे खोदकाम व लग्न तिथी दाट असल्यामुळे ही गर्दी झाली . राहुरी येथील नगर- मनमाड राज्य मार्गावर काल सकाळपासून दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात शहरात … Read more

Ahmednagar Breaking ! अहमदनगर जिल्ह्यात भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

 सध्या नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था केवळ नावाला उरलेली आहे की काय अशी अवस्था झाली आहे. भर दिवसा घरफोडी, खून दरोडे, गोळीबार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचून काढावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत. शेवगाव शहरात भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. या गोळीबारात … Read more

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.. खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

काल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खळबळ ! शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांनी कोट्यावधी गुंतवले, एजेंट पैसे घेऊन पळाले

मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झालेल्या घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाट परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बदनामी, चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल … Read more

Ahmednagar News : कुकडी नदीत लवकरच बोटिंग ! जगाला भुरळ घालणाऱ्या रांजणखळग्यांसाठी होणार ‘ही’ कामे

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड , रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. हे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात. आता याठिकाणी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदी तीरावर पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला निघोज गाव … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more

धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ४ महिन्यांची शिक्षा ! रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटीतील प्रकरण

Ahmednagar News

Ahmednagar News  : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस कोर्टाने ४ महिने कारावास तसेच ४६ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रियाज अन्वर शेख असे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर येथील १२ वे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एच. आर. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपर. अर्बन क्रेडिट सोसायटीकडून … Read more

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Fraud News

IndusInd Bank चे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यामध्ये राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस ठाण्यात टाकळीमिया येथील किरण बाजीराव चिंधे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक व पॅन कार्डवरील माहिती वापरून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवले होते. … Read more

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मैं हू डॉन..’ गाण्यावर धरला ठेका..

Ahmednagar News

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

Ahmednagar News : नगरकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ भागातील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाने विविध उपाययोजना केल्या. परंतु अनेक प्रयत्न करूनही बहुतांश थकबाकीदारांर्नी कर भरलेले नाहीत. आता मनपा प्रशासन ऍक्शनमोड वर आले आहे. नागापूर परिसरातील मनपा हद्दीबाहेरील २६८ नळ कनेक्शन ४७.३७ लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. या नळधारकांना थकबाकी भरण्यासाठी अंतिम मुदत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस जोडे मारून केले आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील महायुती सरकार आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांबाबात टोलवाटोलवी करत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने गेली ४७ दिवस बेमुदत संप सुरू आहे. … Read more

श्रीगोंदा तहसीलदारांची अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरानजीक वन विभागाच्या हद्दीमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर श्रीगोंदा तहसीलदारांनी कारवाई करून एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर, अशी दोन वाहने तहसील कार्यालयात आणून लावली. मात्र, याकारवाईबाबत अधिक माहिती विचारली असता, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी दिगंबर पवार यांनी माहिती न देता माहिती दडविण्याचा प्रकार केल्याने तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी केलेल्या … Read more

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन … Read more

पाचशे एकरमध्ये एमआयडीसी उभी राहली, तर रोजगार उपलब्ध होईल – आमदार शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : आमचे सरकार आल्यापासून नगर तालुक्याबरोबर दक्षिण भागात वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची कामे केली. मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम केले. पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना अश्या विविध योजनांच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे झाली. वडगाव गुप्ताच्या हद्दीत महाराष्ट्र सरकारच्या असलेल्या पाचशे एकर जागेत विखेंनी स्वतः पुढाकार घेऊन ती … Read more

Ahmednagar News : नगर तालुक्यावर दुष्काळाचे सावट ! विहिरींनी गाठला तळ, पाणी टंचाईने फळपिके धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा तसा जिल्हाभर पाऊस कमीच झाला. परंतु नगर तालुक्यात मात्र पावसाने पाठच फिरवली. तालुक्यातील बोटावर मोजण्याजोगी गवे सोडली तर बहुतांश गावात समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. आता मार्च सुरु झाला असला तरी पावसाळा यायला खूप अवकाश असून आधी कडक उन्हाळा तोंडावर आहे. त्यामुळे सध्या … Read more

Ahmednagar News : करंजीतील गर्भगिरी डोंगराला भीषण आग ! पाच तास भडका, मोठी वनसंपदा भस्मसात

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी येथील गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली. बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गवत वाळलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. अनेक लहान-मोठी झाडे आगीत भस्मसात झाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांत आग आटोक्यात आणली. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगराला आग लागते अशी तक्रार … Read more

निवडणुका डोळयासमोर ठेवून अपूर्ण कामाच्या उद्घाटनाचा फार्स ! बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्णच

Ahmednagar News

Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याचा आरोप निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केला आहे. अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावर निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी काम अपूर्ण असतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण सोहळा … Read more

Ahmednagar News : पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध, फरार आरोपीचा तपास सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील पळून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. केवळ २४ तासांमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा शोध पोलिसांनी घेतला असून या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून … Read more