Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर दहा लाख लुटले, पोलिसांनी मुद्देमालासह आरोपी जेरबंद केले

Ahmednagar News

Ahmednagar News : तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजमध्ये नोकरीस असणाऱ्या विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 45, रा. शेवगाव) यांच्याकडील दहा लाख रुपये चोरटयांनी तलवारीचा धाक दाखवत चोरून नेले होते. ही घटना २८ डिसेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चेतन प्रमोद तुजारे (वय १९), समाधान विठ्ठल तुजारे (वय 20, दोघेही रा.वरुर, ता.शेवगांव) याना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख … Read more

Ahmednagar News : मध्यरात्री फिल्मीस्टाईल थरार ! पाठलाग करत चार चोर पकडले, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : बळजबरीने कापूस चोरून नेणारे चौघे शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून  चोरुन नेलेला १० क्विंटल कापूस, गुन्हयात वापरलेले वाहने असा ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भानुदास बाबुराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे,विवेक योगराज पाटील, किरण कचरु मोहिते असे अटक आरोपींची नावे आहेत. संदीप वाघमारे व बळीराम फुगे हे दोघे फरार … Read more

काही लोकांना निवडणूक आल्यावरच कामगारांची आठवण होते – हर्षदा काकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना कुणी नाही, अशा बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार बंधू भगिनींसाठी ११ वर्षांपूर्वी जनशक्ती श्रमिक संघटना स्थापन केली. कामगारांचे विविध प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारी आमची संघटना तालुक्यात काम करत आहे. काही लोकांना मात्र निवडणूक आली की कामगारांची आठवण होते व त्यांचे दुकान ते मांडतात. निवडणूक संपली की पाच वर्षे परत दुकान बंद असते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

Ahmadnagar Braking

Ahmednagar News  : पाथर्डी तालुक्यातील करंजी – भोसे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, जोहारवाडी येथील पै. देविदास माणिक सावंत (वय ५५), हे करंजीहून भोसे मार्गे जोहारवाडीला जात असताना समोरून आलेल्या मोटारसायकलस्वराने सावंत यांच्या दुचाकीला जोराची … Read more

Ahmednagar Crime : जीवे मारण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सोनई येथे गावात मोटरसायकलवर जात असताना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी नामदेव कोरडे यांच्या फिर्यादीवरून सोनई येथील ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव अशोक कोरडे यांनी म्हटले आहे की, (दि. २०) फेब्रुवारी रोजी मित्रांबरोबर गावात जात असताना वैभव वाघ, सचिन पवार, सचिन वैरागर, अभिषेक त्रिभूवन, … Read more

संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणाचा निकाल लवकर लावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणी या खटल्यातील आरोपी बबन कवाद याने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. यातील आरोपी कवाद जामिनावर बाहेर असून, अ. नगर व पुणे जिल्ह्यात वराळ खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्यास त्याला मनाई केलेली आहे. वराळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जेरबंद ! ५ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांकडून सुमारे ५ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक दुचाकी जप्त केली. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात म.पो.ना. अविंदा विठ्ठल जाधव (वय ३३) यांच्या फिर्यादी वरून अजय मधुकर पुरके (वय ३०), रा. पिंपळगाव … Read more

Ahmednagar News : आधी दारू पाजली, अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने युवकाचा ठेचून खून

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरातील खुनाचा उलगडा झाला असून हा खून अनैसर्गिक कृत्य करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. आधी दारू पाजली, परंतु नंतर अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. संदीप कमलाकर शेळके ऊर्फ बाळू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांचा एमआयडीसी … Read more

Ahmednagar Breaking : आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती, मुद्देमाल जप्त !  तालुका पोलिसांची मोठी कामगिरी 

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking :  आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी २६ फेब्रुवारीस ही कारवाई केली. मंगेश साहेबराव खरमाळे यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले … Read more

कोयत्याचा धाक दाखवून घाटात लुटले ! कारवर टाकले मोठमोठे दगड, दोन तोळे सोने लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी वाहनातील प्रवाशांना लुटण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात रविवारी (दि.२५) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुरक्षिततेची भावना आता निर्माण झाली आहे. रविवारी (दि.२५) रात्री पावणे दहाच्या सुमारास मल्हारी सोनवणे हे कारमधून माणिकदौंडी घाट चढत होते. कारमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागापूर परिसरात तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आग्रा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी), साहिल शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापूर) अशी अटक … Read more

राजकारणात विश्वास संपादनासाठी नेतृत्वाचे चरित्र चांगले असायला हवे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर राजकारणात लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तर त्या नेतृत्वाला विश्वास संपादनासाठी चालचलन, चरित्र चांगले असावे लागते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात विश्वस्त नेता गरजेचा आहे. मर्चेंट बँकेने ५० वर्षांच्या इतिहासात ठेवीदारांसाठी, ग्राहकांसाठी संचालक मंडळाने निर्माण केलेली गोष्ट म्हणजे विश्वास आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अहमदनगर मर्चन्टस् बँकेच्या सुवर्ण … Read more

भाजप नेत्यांनी स्पष्टच सांगितलं ! खा. सुजय विखेंमुळे अनेक विकास कामे…

Ahmednagar News

Ahmednagar News : रेल्वे स्टेशन रोड, गायके मळा ते लिंक रोडला जोडणाऱ्या व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. काही वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी होणाऱ्या अडचणीपासून सुटकेचा निश्वास सोडला असून, या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडला जाणार … Read more

Ahmednagar Crime : व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारा तो अहमदनगर जिल्ह्यात अडकला !

Ahmednagar News

Ahmednagar Crime : पाथर्डी शहर व तालुक्यातील सुमारे सहा व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा ठकसेन पोलिसांनी गजाआड केला आहे. न्यायालयाने विनोद नेमीचंद शर्मा रा. दिलदपाटकर, वाराणसी, उत्तरप्रदेश याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपीने सांगितलेले नाव, त्याचे आधारकार्ड व बँकेचे खाते, असे सर्वज बोगस असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे खरे नाव शोधुन काढणे, … Read more

ऑडिओ क्लिप व्हायरल ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कार्यालयाची अब्रू चव्हाट्यावर?

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्‍यातील तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेतील वैजुबाभुळगाव येथे सुरू असलेल्या मातीबांधचे काम निकृष्ठ झाले असल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत संबधित कामाची वरीष्ठ पातळीवर चौकशी सुरु असतानाच सरपंच, उपसरपंच यांनी आर्थिक मागणी केल्याचे वन कर्मचाऱ्याच्या आवाजातील मोबाईलवरील कॉल रेकॉडिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वनविभागाची अब्रु चव्हाटयावर … Read more

नगरमध्ये मराठा समाजाचा रास्तारोको…! नगर-मनमाड, भिंगार, केडगावसह शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठ्यांचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी व राज्यभरातील मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करावा. अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरातील नगर मनमाड रोड, शेंडी बायपास, भिंगार, केडगाव या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन … Read more

केडगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..! हल्ल्यात तिघे जखमी; जुन्नरच्या टिमला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि. २४) बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल. धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याल्य जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यश आले. बिबट्या पकडल्याने केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडल. बिबट्याची दहशत कशी असते, याची प्रचिती केडगावकरांना शनिवारी जाणवली. … Read more

बीटीआर गेटसमोर अपघात; युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेटसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल घुसळे हे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घुसळे हा नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल घुसळे याच्या … Read more