Ahmednagar Crime : व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारा तो अहमदनगर जिल्ह्यात अडकला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : पाथर्डी शहर व तालुक्यातील सुमारे सहा व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा ठकसेन पोलिसांनी गजाआड केला आहे.

न्यायालयाने विनोद नेमीचंद शर्मा रा. दिलदपाटकर, वाराणसी, उत्तरप्रदेश याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित आरोपीने सांगितलेले नाव, त्याचे आधारकार्ड व बँकेचे खाते, असे सर्वज बोगस असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे खरे नाव शोधुन काढणे, त्याने व्यापाऱ्याकडुन घतेलेला माल नेमका कुठे विक्री केला, त्याचे पैसे कुठे ठेवले आहेत, हे शोधुन काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

येथील एस. के फर्निचरचे मालक सुनिल कदम यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. संशयीताच्या तांत्रीक माहितीवरुन पोलिस अमोल आव्हाड, राम सोनवणे, कृष्णा बडे,

निलेश गुंड यांनी राहाता येथुन विनोद शर्मा याला अटक करून त्याला येथील न्यायालयात न्यायाधीस अस्मिता बिराजदार यांच्यासमोर उभे केले असता, त्याला प्रथम एक दिवसाची व नंतर पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

व्यापारी सुनिल कदम यांच्या सोबत बाफना फर्निचर व अन्य काही व्यापाऱ्यांना शर्मा नाव सांगुन या ठगाने लुटले आहे. त्याने वापरलेले आधारकार्ड बनावट आहे.

त्याने दिलेले चेक बँकेचे असले तरी बँकेत खाते उघडताना बनावट कागदपत्र दिल्याने हा ठग नेमका कुठला आहे. त्याचे खरे नाव काय आहे, हे शोधुन काढणे गरजेचे आहे. त्याने आणखी कुठे कुठे असले प्रकार केले आहेत का, याचा तपास घ्यावा लागेल.

फसवणारी टोळीची व्याप्ती मोठी असू शकते. घेतलेला माल नेमका कुठे विकला जातो. वाहने कोणती वापरली जातात. त्याला आणखी कितीजण साथीदार आहेत. पाथर्डीत फसवणुक करुन घेतलेला माल नेमका कुठे विकला,

याचा तपास करुन लुटले गेलेल्या व्यापाऱ्यांना न्याय देता येईल का, याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस तपास करीत आहेत. सुतावरुन स्वर्ग गाठण्याची जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली आहे.