कॉपी न करण्याची सामुहिक शपथ ! बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील अशोकनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्रातील विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची सामुहिक शपथ घेऊन बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली. तालुक्यातील अशोकनगर येथील (केंद्र क्रमांक ०२२७) या केंद्रातून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अशोकनगर, जानकीबाई आदिक माध्यमिक विद्यालय, खानापूर, अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड … Read more

कुकडीच्या आवर्तनाबाबत पालकमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी कॅनॉल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणी बाबत गुरुवारी नगर येथे महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पारनेर तालुक्यातील २९ पाणी वाटप संस्थांच्या प्रतिनिधींसह पाणी वापर संस्थाच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कुकडी कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी असलेल्या पाट पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडण्याबाबत … Read more

पाथर्डीत कॉपी बहाद्दरांचा उच्छाद ! दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते

पाथर्डी शहर व तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांनी उच्छाद मांडला आहे. पास करुन देण्याची हमी घेणारे शिक्षणसम्राट त्यांच्या यंत्रणेकडुन विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत आहेत. पेपर सुरु झाल्यानंतर दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते. बुधवारी शहरात पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले आहे. कोरडगाव येथे बुधवारी कॉपीचा महापुर होता. येथील एका विद्यालयात सुमारे ७५ विद्यार्थी हे बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेले … Read more

पारनेर तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात स्व. वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली. कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही. विचारांची लढाई विचारांनी लढायची असते आणि कामे मार्गी लावायची असतात ही परंपरा स्व. वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी घालून दिली. आज तालुक्यात उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात नव्या समिकरणांना जन्म घालावा लागेल आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

राहुरी तालूक्यातील टाकळीमियाँ येथील अविनाश रमेश कवाणे या २३ वर्षीय अविवाहित तरुणाने त्याच्या घराशेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अविनाश रमेश कवाणे (वय २३) हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील कारखाना रस्ता परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो. काल सकाळी … Read more

श्रीगोंदा : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दरेकर शहराध्यक्षपदी मनोहर पोटे यांची निवड

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर यांची तर श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची निवड करण्यात आली. नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी या निवडीचे पत्र दिले. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस … Read more

मानव वस्तीत कुत्र्याची शिकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथे बुधवारी (दि. २१) पहाटे दोनच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. मानव वस्तीत कुत्र्याची शिकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या वतीने नागरिकांनी पशुधन व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारोळी नदीच्या तीरावर बाळासाहेब सयाजी पाटोळे हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर बांधलेल्या … Read more

कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवल्याने शेतकऱ्यांनी खा. सुजय विखे यांचे आभार मानले

Onion News

Onion News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा. सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवल्याने पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, पाडळी, चितळी, हनुमान टाकळी … Read more

पारनेर तालुक्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडा

Ahmednagar News

Ahmednagar News : कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने पारनेर तालुक्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. मराठा आरक्षणासंदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झालेल्या आ. लंके यांनी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दखल घेउन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी … Read more

12 Th Exam : बारावी परीक्षेसाठी विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी पाथर्डीत दाखल, शहरातील सर्व लॉज हाऊसफुल्ल

12 Th Exam

12 Th Exam : बारावीच्या परीक्षेला हमखास पास करून देण्याची गैरटी देणाऱ्या तालुक्यातील विविध विद्यालयांतील (परदेशी पाहुणे) इतर जिल्ह्यांतील मुंबई, पुणे, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, कोकणातील काही जिल्ह्यांतून विद्यार्थी पाथर्डी शहरात मंगळवारी दाखल झाल्यामुळ शहरातील सर्व लॉज फुल्ल झाले आहेत. शिक्षण विभागाने प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाच्या मदतीने बारा बैठे … Read more

अहमदनगर शहरात डॉक्टरच्या घरामधून एक लाखाची रोकड लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉक्टरच्या घराच्या खालील मजल्यावर असलेल्या क्लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटून आत प्रवेश करत घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेली १ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नवनागापूर येथील आनंदनगर येथे रविवारी (दि.१८) सकाळी १०.४५ ते सोमवारी (दि.१९) सकाळी ९.३० या कालावधीत घडली. याबाबत आयुब अकबर इनामदार (वय … Read more

Ahmednagar News : पोलीस ठाण्याच्यासमोरच दोन गटांत दगडफेक

Ahmednagar News : नगर शहरातून मारहाणीसारख्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता थेट पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडला असल्याची माहिती समजली आहे. पोलीस ठाण्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी दोन गट आले होते. त्यांच्यात … Read more

अर्बन बँक घोटाळा : मुख्य कर्ज तपासणी अधिकाऱ्यासह कर्जदारास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक कर्जघोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला मंगळवारी अटक केली. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे. आर्थिक गुन्हे … Read more

राष्ट्रवादीचे नेते अडकले ट्राफिकमध्ये ! गजबजलेल्या चौकात एकही वाहतूक पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आज रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांना बसला. ढाकणे यांचे वाहन सुमारे वीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकले होते. तरीही वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे ढाकणे यांनी वाहनातून खाली येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत केली. ही घटना साडेतीन वाजल्याच्या सुमारास शहरातील … Read more

पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट ! वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपी….

Ahmednagar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर सत्ता पक्षातील नेत्यांकडूनही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या वकील आढाव … Read more

पारनेर : साडेसहा कोटीच्या रस्त्यांना मान्यता ! ह्या रस्त्यांची कामे होणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विविध गावच्या एकूण सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. पुढे बोलताना कोरडे यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात … Read more

Ahmednagar Breaking : पोलिसांनी डोंगरात मुक्काम करत घरात पुरलेल्या दागिन्यांसह ‘असे’ पकडले आरोपी, श्रीगोंद्यातील सुद्रिकेश्वर महाराज मंदिर चोरी प्रकरणाचा छडा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात १२ फेब्रुवारीला चोरी झाली होती. चोरटयांनी २४ लाखांचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. या चोरीने जिल्हाभर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. भास्कर खेमा पथवे (वय 46 वर्षे, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (वय … Read more

राहुरी : विजेचा लपंडाव सुरू; शेतकरी वर्ग अडचणीत ! वीज नसल्याने शेतीला पाणी देणे अशक्य

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विशेषतः शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज प्रश्नी तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. … Read more