अर्बन बँक घोटाळा : मुख्य कर्ज तपासणी अधिकाऱ्यासह कर्जदारास अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक कर्जघोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला मंगळवारी अटक केली.

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने नगर अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज फिरोदिया व कर्जदार प्रवीण लहारे याला अटक केली आहे.

दरम्यान अटकेतील आरोपींनी केलेल्या जमीन अर्जाबाबत सुनावणी होती. मात्र कोणाच्या जामिनावर कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे अटकेत असलेले अशोक कटारिया, अनिल कोठारी, राजेंद्र लुणिया,

प्रदिप पाटील, सी ए शंकर अंदानी या आरोपींचा जेल मधील मुक्काम काही दिवस वाढला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी दि.२९ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

अर्बन बँकेच्या २९१कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक यांना अटक झालेली आहे. मात्र प्रथमच या घोटाळ्यात एका कर्जदराला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यामुळे आता ज्या कर्जदारांनी खोटे कागदपत्र देऊन कर्ज घेतले आहेत अशा कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर असणार आहे.

या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून, यापैकी माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी यास अटक करण्यात आली आहे. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांसह दोन संचालकांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके,

पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, एपीआय दिवटे, पोहेकॉ गाडीलकर, पोहेकॉ जंबे, पोना घोडके, पोकॉ क्षीरसागर यांनी केली.