FD Rates : तुम्ही 6 महिने ते एक वर्षासाठी FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप बँकाच्या एफडी व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. येथे तुम्हाला सहा महिन्यांपासून एक वर्षांपर्यंतच्या एफडीवर किती फायद्या होईल याबद्दल माहिती देणार आहोत.
जर तुम्ही शॉर्ट टर्म एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या बँका तुम्हाला सर्वोत्तम परतावा देत आहेत. FD मध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचे पैसे लवकर काढू शकता.
-बँक ऑफ बडोदा: 5.60 टक्के ते 7.10 टक्के
-बँक ऑफ इंडिया: 5.5 टक्के ते 5.75 टक्के.
-बँक ऑफ महाराष्ट्र: 5.10 टक्के ते 6 टक्के.
-कॅनरा बँक: 6.15 टक्के ते 6.25 टक्के.
-सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 6.0 टक्के ते 6.25 टक्के.
-इंडियन बँक: 3.85 टक्के ते 7.05 टक्के.
-इंडियन ओव्हरसीज बँक: 5.75 टक्के.
-पंजाब आणि सिंध बँक: 5.25 टक्के ते 7.10 टक्के.
-पंजाब नॅशनल बँक: 6 टक्के ते 7.05 टक्के.
-स्टेट बँक ऑफ इंडिया: 5.75 टक्के ते 6 टक्के.
-UCO बँक: 5 टक्के ते 5.50 टक्के.
-युनियन बँक ऑफ इंडिया: 4.90 टक्के ते 5.75 टक्के.
-Axis Bank Ltd: 5.75 टक्के ते 6 टक्के.
-बंधन बँक लिमिटेड: 4.50 टक्के.
-सिटी युनियन बँक लिमिटेड: 6 टक्के ते 6.5 टक्के.
-फेडरल बँक लिमिटेड: 5 टक्के ते 6 टक्के.
-HDFC बँक लिमिटेड: 4.5 टक्के ते 6 टक्के.
-ICICI बँक लिमिटेड: 4.75 टक्के ते 6 टक्के.
-IDBI बँक लिमिटेड: 5.25 टक्के ते 7.05 टक्के.
-इंडसइंड बँक लिमिटेड: 5 टक्के ते 6.50 टक्के.
-IDFC First Bank Ltd: 4.5 टक्के ते 5.75 टक्के.
-कर्नाटक बँक लिमिटेड: 6.0 टक्के ते 6.5 टक्के.
-कोटक महिंद्रा बँक लिमिटेड: 6 टक्के ते 7 टक्के.
-येस बँक लिमिटेड: 5 टक्के ते 6.35 टक्के.