वीज पडुन ११ शेळ्या मृत्युमुखी या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वारणवाडी ता.पारनेर येथे दि.23 जुलै रोजी मध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून ११शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मेंढपाळ पोपट हांडे यांचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. दि .२३जुलै रोजी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी … Read more

ऑनलाइन शिक्षणाचा ‘पारनेर पॅटर्न’ ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रे बंद आहेत. याला शिक्षण विभागही अपवाद नाही. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आदेश शासनाने काढला व विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी या मार्गाने प्रयत्न सुरु झाले. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम … Read more

‘कोरोना तर आहेच हो, पण सर्वसामान्यांच्या समस्या महत्वाच्या’ ‘हा’ आमदार फिरतोय मतदारसंघ

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात  केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. कोरोनाचे संकट आहेच. ते आणखी वाढतेय. पण म्हणून इतर प्रश्न संपलेत … Read more

पारनेर नगरसेवक फोडाफोडी नंतर अजित पवार व उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक ; राज्यात आता ठाकरे-पवार पॅटर्न?

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मुंबईत दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवे चर्चा झाली. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवं. यात दोन्ही पक्षांचं हित आहे. केवळ रायगड जिल्हाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १४३७ अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १०, शेवगाव १०. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार … Read more

‘या’ गावच्या तरुणाने केली आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातल्या पळवे बुद्रुक येथील किरण विठ्ठल कळमकर (वय- २४) या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाडुरंग आबाजी कळमकर (रा. पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ किरण विठ्ठल कळमकर याने मंगळवारी दि. २१ सकाळी साडेसातच्या अगोदर … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १५१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर … Read more

अहमदनगर करोना अपडेट : डॉक्टरसह जिल्ह्यात १५१ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली.धक्कादायक म्हणजे शहरातील एका डॉक्टराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या … Read more

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले ‘हे’ निर्देश

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक रित्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 12वीत कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी दहावी मध्ये 91 टक्के मार्क मिळाले. मात्र बारावी मध्ये अपेक्षेपेक्षा कमी … Read more

त्या कर्मचाऱ्याचा भाऊ व पत्नी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : गेल्या चार दिवसांपूर्वी भाळवणी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या घरातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करण्यात आले. त्यातील मृताच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी या दोघांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळल्याने भाळवणीत खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४ अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्ण. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात आल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांची कोरोना टेस्ट, असा आला रिपोर्ट…

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : तहसीलदार ज्योती देवरे यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे तहसीलदार देवरे यांच्या संपर्कात आल्या होत्या. सत्तार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देवरे यांनी कोरोना चाचणी केली होती . दरम्यान पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधीत.असूनतालुक्यातील ४६ अहवाल निगेटिव्ह दैठणे गुंजाळ … Read more

अहमदनग ब्रेकिंग : पोलिस पाटलाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील पोलिस पाटील रेवणनाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. काळे यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. दुधाला भाव नसल्याने काळे यांनी विष घेतले, असे त्यांचे बंधू अरुण काळे व शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले. मृत … Read more

आता ‘या’ शहरात घुसला कोरोना,३० जुलै पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : मिरजगाव शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून येथील बगाडे गल्लीमधील ५० वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. या रूग्णाला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आणखीन एका संशयित रूग्णाचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती, मिरजगाव जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.हरीष दराडे यांनी दिली आहे. आज … Read more