सर्वात मोठी बातमी : पुन्हा वाढला लॉकडाउन वाचा सविस्तर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. … Read more

कोरोनामुळे आता विवाह होईना… पालक चिंतेत !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे अनेक व्यवसाय व रोजगार बंद झाले; मात्र यामुळे शेकडो विवाह सोहळे पालकांना स्थगित करावे लागले आहेत. भविष्यातही परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार, याची खात्री नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जगाची गती थांबविणाऱ्या जीवघेण्या कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये ! वाचा अहमदनगर कोणत्या झोनमध्ये ?

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- केंद्रीय आरोग्य सुरक्षा सचिव प्रीती सुदान यांनी शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. त्यामध्ये या राज्यांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे.  यामध्ये राज्यातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर ऑरेंज झोनमध्ये एकूण १६ … Read more

भीषण अपघातात वाघ्या – मुरळी दाम्पत्य जागीच ठार

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरिकेशन बंगल्याजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बिरोबावाडी येथील वाघ्यामुरळी दाम्पत्य जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक कार सोडून फरार झाला. या अपघाताबाबत माहिती अशी,कार राहुरीफॅक्टरी कडून देवळालीच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. याचवेळी वाघापुरे हे दाम्पत्य … Read more

श्रीगोंदा पोलिसांची अवैध व्यवसायांवर कारवाई

श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून गावठी दारूनिर्मिती हातभट्ट्या व चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. श्रीगोंदा पोलिसांनी काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव शिवारातील हातभट्टीवर कारवाई केली होती. त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने निमगाव खलू शिवारातील भीमानदीच्या काटवनात सुरू असलेल्या हातभट्टीवर दि.२९रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत त्याठिकाणी तयार … Read more

अहमदनगर शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, चौघांना पकडले

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील आरआर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर आज सकाळी कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. 56 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त करून चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विकास वाघ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात आर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसह तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून चोपले !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- नगर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांतील तीन चोरटे आज पहाटे ग्रामस्थांच्या हाती लागले. त्यात एक महिला आहे. आष्टी तालुक्यात त्यांना पकडल्यामुळे अंभोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी नगर तालुक्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. नगर तालुक्यातील दहिगाव ,साकत खुर्द ,शिराढोण या ठिकाणी धाडसी चोरीचा प्रयत्न केला पण नागरिक जागृत असल्याने … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ‘असे’ झाले ध्वजारोहण

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ हे काल गुरुवारी अहमदनगरमध्ये आले होते. आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर पालकमंत्री लगेच पुणे मार्गे कोल्हापूरकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी कोणताही संदेश न देता तसेच … Read more

गावात बाहेरून येणाऱ्यांवर सरपंच ठेवणार लक्ष, विलगीकरणाचा भार ग्रामपंचायतीवर

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच राहतील. गावातून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून पोलिस पाटील काम पाहणार आहेत. तलाठी व ग्रामसेवक सदस्य असणार आहेत. ज्‍या गावात पोलिस पाटील नाहीत, त्‍या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने टाकाऊ वस्तूपासून बनवले व्हेंटिलेटर !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज हजारो कोरोना बाधितांचे मृत्यू होत आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्यापरीने काम करत आहेत. जामखेड शहरातील सोहेल इब्राहिम सय्यद या युवकाने व्हेंटिलेटर तयार केले असून त्या व्हेंटिलेटरला JIVA (जीवन आणि वायू प्रदान करणारा) असे नाव दिले आहे. … Read more

केळं दिली नाही म्हणून चोपले ! ‘त्या’तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- वाटपासाठी केळी न दिल्याच्या रागातून तिघांनी एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. जुने मुकूंदनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात अर्शद आयुब शेख, आरिफ सय्यद उस्मान, तौसिफ अन्सार शेख (तिघे रा. मुकूंदनगर, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत फैजाउद्दीन अजीजउद्दीन शेख (रा. कादरीमशिदीजवळ मुकुंदनगर) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतची माहिती, वाचा आजचे जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. गुरुवारीही आणखी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, भिंगारजवळील आलमगीर येथील कोरोनाबाधिताला १४ दिवसांच्या उपचारांनंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण २५ जणांना घरी सोडण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य,म्हणाले …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस … Read more

जीवाची पर्वा न करता हा पोस्टाचा “कोरोना योद्धा” करतोय काम…

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणू चे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉक डाउन सुरूच आहे तरी देखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील लॉक डाउनच्या अमलबजावणीसाठी पोलीस कर्मचारी, अधिकारी खूप मेहनत घेत आहेत. त्याच प्रमाणे डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य … Read more

कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा करणाऱ्या अहमदनगरच्या सुपुत्राचे मुंबईत निधन ! मुलाने व्हिडीओ कॉलद्वारे वाहिली श्रद्धांजली…

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- मुंबई येथे पोलिस सेवेमध्ये असताना कुप्रसिद्ध गुंड माया डोळस गॅंगचा खात्मा करणाऱ्या टीममध्ये भाग घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ज्यांचा गौरव केला असे श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सुपुत्र सेवानिवृत्त पोलीस अंकुश ठवाळ यांचे बुधवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अल्पश्या आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित ०७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने … Read more

हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठं ठोकता ? कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी … Read more

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही उपाशीच

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात गावपातळीवर ग्रामपंचायत कर्मचारी जोखीम घेऊन आपले योगदान देत आहे. कोरोना परतवून लावण्याच्या युध्दात ग्रामपंचायत कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांनाच आपल्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश कर्मचार्‍यांना फेब्रुवारीपासून वेतन देण्यात आले नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे थकित वेतन तातडीने … Read more