कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘नागवडे’ कारखाना तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपये देणार

श्रीगोंदा ;- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ‘नागवडे’ कारखाना श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपये तर तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी देणार असल्याची माहिती ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. गरज पडल्यास स्थानिक प्रशासनाला देखील आर्थिक सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे नागवडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या … Read more

संकटकाळात जगताप कुटुंबीय नेहमीच अग्रेसर : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर :- भारत देशावर कोरोना संसर्ग विषाणूचं संकट आलेले आहे. अतिशय गंभीर असे हे संसर्ग असल्यामुळे देशावर मोठे संकट उभे झालेले आहे. या संकटकाळात या कोरोना विषाणूस रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. देशात हातावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ८३ अहवालापैकी ८२ अहवाल आले निगेटीव्ह !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले.  त्यापैकी ८२ अहवाल निगेटीव आले असून एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.  ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून … Read more

श्रीरामपुरहून आलेले दोन कोरोना संशयीत बहाणा करत झाले गायब !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेले दोघे कोरोना संशयीत केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग … Read more

स्वस्त धान्य दुकानांवर कोरोना संसर्ग होण्याचा धोका

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्वस्त धान्य दुकानावर ठेवलेल्या पॉस मशीनवर अंगठा ठेवल्याशिवाय कुपन धारकांना धान्य मिळत नाही. परंतु आता प्रत्येक माणसाने पॉस मशीनवर हात ठेवून त्यामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटल्याने शासनाने त्या मशीनवर शिधापत्रिका धारकाच्या आंगठ्या ऐवजी दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य देण्यास परवानी दिलेली आहे. ही बाब एका दृष्टीने योग्य झाली. ज्यांना धान्य वाटप केले … Read more

तहसिलदारांची वृद्ध महिलेला धमकी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी जवळा येथे एका वृध्देच्या घरात जावून दमदाटी करत काठी उगारत मुलावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरल्याने पारनेर तालुक्यातील जवळे येथील हरणाबाई लक्ष्मण सालके या 65 वर्षीय महिलेचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सबंधित महिलेने रुग्णालयातून जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार … Read more

भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाला चमकोगिरी चांगलीच भोवली !

  अहमदनगर लाईव्ह24 टीम :- माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमाफी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी … Read more

यांना काही काळजीच नाही : सोशल डिस्टंन्सिगची ऐशी तैसी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   जेऊर : संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग निर्णयाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात काही ठराविक नागरीकांमुळे लॉकडाऊनच्या काळात संपुर्ण गाव वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. विनाकारण चकरा मारत राहणे, घोळका करुन गप्पा मारणे असे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी अडविलेच … Read more

आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या सहकार क्षेत्रातील ऊत्कृष्ट बँकेने कोरोनाविरोधात लढ्यासाठी दिली ही मदत

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोना प्रतिबंधासाठी आता निकराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना प्रतिबंधासाठीच्या या लढ्यात समाजिक उत्तरदायीत्व नेहमीच जपणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील मदतीसाठी सरसावली नसेल तर नवल! अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील २५ लाख रूपयांची मदत कोरोना संसर्गा संदर्भात उपायायोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरातील तीन जणांना फक्त ‘या’ मुळे झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  आज संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. या बाधित व्यक्तींपैकी ०२ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील असून ०१ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज पुन्हा कोरोनाचे तीन पेशंट वाढले वाचा सविस्तर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त. त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट. एकूण बाधित रुग्णांची संख्या आता झाली २४. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वेळ मिळाला ‘या’ दिवशी करणार अहमदनगर दौरा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अद्याप अहमदनगर जिल्हा दौरा केला नव्हता.  राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार दि.7 एप्रिल रोजी जिल्हा दौ-यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या रविवार अखेर २१ झाली. काल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. … Read more

हे तर आमदार बबनराव पाचपुते यांचे अपयश !

श्रीगोंदे कुकडीचे आवर्तन १३ मार्चला सुरू झाले. त्यानंतर आठ दिवसांनी १३२ चे आवर्तन सुरू होणे गरजेचे असताना ते सुरू झालेले नाही. त्यामुळे १३२ खालील शेतकरी भरडला जात आहे, अशी टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी रविवारी केली. ते म्हणाले, ५ वर्षांच्या कार्यकाळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न मी केला, पण बबनराव पाचपुते यांनी कायम खोडा … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे अहमदनगर करांना अत्यंत महत्वाचे आवाहन वाचा आणि शेअर करा…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्‍हयातील सर्व खाजगी व्‍यवसायिक डॉक्‍टर यांना त्‍यांचे दवाखाना वा रुग्‍णालयात आलेल्‍या बाहयरुग्‍ण व आंतरुग्‍णामध्‍ये श्र्वसनाचा त्रास जाणवणारे (SARI) खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे  रुग्‍ण आढळल्‍यास, त्‍यांना त्‍वरीत जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३१ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा; जिल्ह्यातील पेशंट्सची संख्या आता एकवीस !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आज सकाळपर्यंत पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले. असून त्यात एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. प्राप्त अहवालापैकी उर्वरित ३८ … Read more