अहमदनगर ब्रेकिंग : उसाने ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर एका उसाने भरलेल्या ट्रकने पुण्याच्या दिशेने जात असताना एका पायी चालणाऱ्या अज्ञात इसमाला रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली,  या अपघातात उस वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात इसम संबंधित ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला, ही घटना 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी … Read more

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार : राणीताई लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : कायमस्वरूपी दुष्काळी अशी नगर तालुक्याची ओळख आहे. भोरवाडीतील महिलांना दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दुरवर भटकंती करावी लागते. त्यातच अनेक किलोमिटरवरून डोक्यावर हंडा घेवून पाणी आणावे लागते. मात्र आता आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून भोरवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपीचा सोडवून येथील महिला भगिणींच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरवू अशी ग्वाही जि.प.सदस्या राणीताई लंके … Read more

मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी : गेल्या तीन वर्षांच्या विकास कामाचा अनुशेष भरून काढून मिळालेल्या मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी करू. त्यासाठी भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात काल ना. तनपुरे यांचा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी … Read more

आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक … Read more

5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी एका महिन्यात करून दाखवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘नको दूरचा, हवा घरचा’ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘कर्जत-जामखेड’मध्ये ऐकायला मिळाली होती. निवडणुकीमध्ये मतदारसंघातील जनतेने ‘घरच्याला नाकारून, दुरच्याला निवडून दिले’ परंतु तोच दूरचा निकालानंतरच्या काहीच दिवसात घरच्यापेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे. माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे राज्याचे जलसंधारण खात्याचे मंत्री, कुकडी प्रकल्पाचे प्रमुख आणि विशेष म्हणजे … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी इतक्या कोटींची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ग्रामविकास हा जिल्हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामे वेळेत मार्गी लावून येत्या काही वर्षांत नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत क्रमांक एकवर असेल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सन 2020-21 साठी जिल्हा वार्षिक आराखड्यासाठी 571 कोटी 80 लाख रुपयांची मर्यादा राज्य … Read more

राम शिंदे काय म्हणतात त्यापेक्षा मतदारसंघातील लोक काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : कर्जत-जामखेड मतदारसंघात मी पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने आमदार रोहित पवार करीत आहेत. पण एकवेळ त्यांनी ते करणे समजू शकतो. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून भूमिपूजने व उद्घाटने होणे राजशिष्टाचारात बसत नाही, अशी टीका प्रा. शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आमदार रोहित पवार … Read more

चोरी केलेल्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे चोरीचा भांडाफोड  !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : वीजपंपांची चोरी करणाऱ्या टोळीचा पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे भांडाफोड झाला. शेतकऱ्यांनी एकाला रंगेहात पकडले असून पाच चोरट्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेकटे, भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी वीजपंप चोरीला गेले आहेत. यामध्ये शेकटे येथील विष्णू घुले, भास्कर साबळे, जिजाबा घुले, भुतेटाकळी येथील … Read more

कचरा फेकणाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहर स्वच्छ झाल्याचे चित्र आहे. शहरातील ११० कंटेनर काढल्यानंतरही त्या जागेवर कचरा फेकणाऱ्यांकडून सुमारे ५० हजारांचा दंड मनपाने वसूल केला आहे. स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून पथकांची बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्यांवर करडी नजर आहे. थ्री स्टारच्या मानांकनासाठी आलेली चार सदस्यीय समितीही शहरात तळ ठोकून आहे. अहमदनगर … Read more

राम शिंदे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कोणी बंगला व कार्यालयासाठी भांडत आहे. तर, काही मंत्री खात्यासाठी अडून बसले आहे. एका बंगल्याचे दोन-दोन दावेदार आहेत, अशा स्थितीत असलेले राज्यातील नवे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत.नव्या महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ९ जानेवारीला नियुक्ती झाली आहे. त्यानंतर सोमवारी ते प्रथमच नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; हॉटेलचालकाच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी हॉटेल प्राईडच्या मागील दरवाजाच्या जाळीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत हॉटेलचालक आशिष चंद्रकांत कानडे याच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून त्यांचा खून केला. नंतर हॉटेलच्या गल्ल्यातील ४१ हजारांच्या रोकडेसह रमच्या बाटल्या चोरट्यांनी लांबवल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. इतर ठिकाणीही … Read more

रोहित पवारांनी आता, तरी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवावीत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदारही नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलो असतानाही सर्व पदे उपभोगली. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये. आमच्या पराभवासंदर्भात पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमली आहे. ती अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही, असे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी … Read more

मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये – राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : ‘ माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता . त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे . जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले होते. पक्षाचेही योगदान माझ्यासाठी खूप  आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. आमचा पराभव … Read more

अहमदनगर शहरात बिबट्या दिसल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काही महिन्यांपूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आढळला होता. आता केडगाव, शास्त्रीनगर, पांजरापोळ भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. वन विभागाने या परिसराची पाहणी केली, परंतु बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगावातील नाला, अजय गॅस गोडाऊन, पांजरापोळ, रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर; नागरिकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित

अहमदनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने मनपाने अँड्राईड अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून Ahmednagar-SWM टाकून ॲप डाउनलोड करावे, … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. ओडीएफ++ … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ : मारहाणीत एकजण गंभीर जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- तालुक्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.अनेक भागात भुरट्या चोऱ्यांसह मोटारसायकल चोऱ्यात देखील प्रमाणात वाढ झाली आहे. खर्डा सोनेगाव रोडवरील शिंदे वस्ती येथे शेळ्या चोरी करत असताना झालेल्या झटापटीत भगवान विश्वनाथ शिंदे वय ६५वर्षे यांच्यावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी … Read more