दिवाळीसाठी गावी येणाऱ्या तरुणांचा अपघातात मृत्यू, गावावर शोककळा

बोधेगाव :- दिवाळी सणासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी कपडे तसेच फराळ घेऊन दुचाकीवरून पुण्यावरून आपल्या मुळ गावी परतत असताना पुणे-नगर महामार्गावर सुपा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दिलेल्या धडकेत बोधेगाव येथील दोन कुटुंबांतील दोघा नवतरुणांचा जागीच करुण अंत झाला. विशेष म्हणजे दोघेही त्यांच्या कुटुंबांतील एकुलते एक मुलगे होते. येथील संकेत अशोक शिंदे (वय २१) … Read more

आ.नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर.आर.पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला !

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर. आर. पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काढले. लंके यांनी हाती घेतलेल्या पाणीप्रश्नावर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार लंके यांनी रविवारी समर्थकांसह बारामती येथे जाऊन पवार यांचा आशीर्वाद घेतला. पवार यांनी लंके … Read more

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले. राष्ट्रवादी … Read more

पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली. पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे … Read more

हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका !

कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे. “हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. … Read more

रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मिळाले नवे नेतृत्व !

अहमदनगर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.  मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात … Read more

अण्णांनी दिला आमदार लंकेना विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला

पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला. राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले. विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे … Read more

दारूड्या नातवाकडून आजी-आजोबांना मारहाण

करंजी :- दारूड्या नातवाकडून होणाऱ्या मारहाणीला आजी व आजोबा वैतागले आहेत. मात्र, पोलिस या नातवावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. दारू पिऊन घरी येणाऱ्या नातवाकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने या जाचाला वैतागलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आजीबाई, रखमाबाई रंगनाथ अकोलकर यांनी थेट पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नातू मालू रामदास अकोलकर … Read more

आमदार बबनराव पाचपुते भाजप सरकारमध्ये मंत्री होणार ?

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून सातव्यांदा आमदार झालेल्या बबनराव पाचपुते यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आ. पाचपुते रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. संभाव्य मंत्रीमंडळात आ. पाचपुते यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव पाचपुते 4 हजार 523 मतांनी विजयी झाले. त्यांना 1 लाख … Read more

माजी आमदार औटींसह सुजित झावरेंवर दुसर्‍यांदा ओढवली नामुष्की !

पारनेर :- बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात विधानसभा उपाध्यक्ष ना.विजय औटी व सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अविश्वास ठराव दाखल केला होता. परंतु सभापती गायकवाड यांनी विरोधी संचालक ताब्यात घेवून खेळी केली. तसेच काही संचालक गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे विधानसभा पाठोपाठ ना.विजय औटी व सुजित झावरे यांना हा … Read more

रोहित पवारांच्या विजयात बारामती ॲग्रोच्या टीमचा सिंहाचा वाटा !

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पवार घरातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना थेट आव्हान देत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष खेचले होते. युतीच्या मंत्रिमंडळातील बडे प्रस्थ व मुख्यमंर्त्यांच्या अत्यंत जवळचे मंत्री म्हणून ना. शिंदे ओळखले जात होते. मात्र, रोहित पवार यांनी गेल्या एक वर्षापासून अत्यंत शिस्तबद्ध व … Read more

राम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ !

कर्जत: कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत रोमहर्षक व ऐतिहासिक विजय मिळवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला. गेली पंचवीस वर्षे येथे असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणत पवारांनी नवीन पर्वाला सुरुवात केली. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे रोहित पवार यांनी … Read more

भाजपाचा बुरुज उद्ध्वस्त करण्यात पवारांना यश !

कर्जत – जामखेडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाचे विद्यमान आमदार तथा मंत्री ना.शिंदे विरुद्ध पवारांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होती. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. रथी-महारथींच्या सभा कर्जत-जामखेडला गाजल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. रोहित पवारांनी तब्बल ४३ हजार ३४७ इतक्या मताधिक्क्यांनी ना.शिंदेंना पराभवाची धूळ चारली. ना.शिंदे यांना ९२ … Read more

अहमदनगर जिल्ह्याने भाजप – सेनेच्या ‘ह्या’ सहा आमदारांना दाखविला घराचा रस्ता

अहमदनगर :-  जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदार संघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत,नगर जिल्ह्यातून आलेले हे निकाल अत्यंत धक्कादायक असून ना.शिंदे, कर्डिले, औटी, पिचड, कोल्हे, मुरकुटे ह्या युतीच्या सहा आमदारांचा पराभव झाला असून नगर शहरातून माजी आमदार अनिल राठोड यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. … Read more

पारनेर मध्ये गुरुला शिष्याने हरविले !

पारनेरला शिवसेनेचे विजय औटी यांच्यासमोर त्यांच्याच पक्षात एकेकाळी असलेले व त्यांचे शिष्य मानले जात असलेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून औटींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. लंके यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींनी स्वीकारले व काहींनी विरोधात भूमिका घेतली. पण पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांची साथ मिळाल्याने त्यांना आणखी ताकद मिळाली. विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले असले तरी औटी … Read more

भाजप – शिवसेनेचे गर्वहरण, अहमदनगर जिल्ह्यात आघाडीची हवा !

अहमदनगर – जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता उर्वरित सर्वच उमेदवार ‘गॅस’ वर राहिले. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना चौकार ठोकण्यात सपशेल अपयश आले.  येथे राष्ट्रवादीचे नीलेश लंके हे जायंट … Read more

श्रीगोंद्यातून पुन्हा एकदा घनश्याम शेलार पराभूत !

श्रीगोंद्यात घनश्याम शेलारांचे पक्षांतर अयशस्वी झाले आहे, श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांना निसटता विजय मिळाला. येथील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे घनशाम शेलार यांनी त्यांना तगडी लढत दिली. शिवसेनेकडून नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी मिळत नसल्याचे पाहून शेलारांनी चार-पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे हे पक्षांतर मात्र यशस्वी झाले नाही.  … Read more

राम शिंदेंना पर्याय उपलब्ध झाल्याने बदल घडविला !

कर्जत-जामखेड हा मतदारसंघ शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या एंट्रीमुळे राज्यभर गाजला. निवडणुकीपूर्वीच या भागात त्यांनी तयारी केली होती.  मागील दोन वर्षांपासून त्यांचे संपर्क अभियान जोरात होते. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या प्रा. राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिला.  मत विभाजन आणि जातीय समीकरणाचा फायदा मिळत असल्याने शिंदे दोनदा विजयी झाले होते. … Read more