प्रतिभा पाचपुतेंसह चार महिलांविरोधात गुन्हा

श्रीगोंदे | काष्टी येथील मतदान केंद्र २८० मध्ये बळजबरीने घुसून मतदान कंट्रोल मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याची तक्रार केंद्राध्यक्ष सीताराम नाना घोडके यांनी दिल्यानंतर भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलां विरोधात मंगळवारी पहाटे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा बबन … Read more

बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात … Read more

जामखेडला मतदानाचा टक्का वाढला

जामखेड – जामखेड शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्याने सर्वांना मतदान करता आले. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. सकाळी मतदान करण्यासाठी येणाऱ्यांत महिलांची संख्या जास्त होती. नवमतदार प्रथमच आपला हक्क बजावत असल्याने त्यांच्यात उत्साह दिसत होता. दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बांधखडक येथील घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. कर्जत-जामखेड … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more

पालकमंत्री राम शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा

जामखेड – पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत.  यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात हाणामारीच्या … Read more

विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

जामखेड : शेतात शेळ्या चारत असताना खाली पडलेल्या पोलच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे अशोक शिवाजी पुढाईत (वय २५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जामखेड तालुक्यातील आघी या ठिकाणी रविवार दि.२० रोजी अशोक शिवाजी पुढाईत हा तरुण शेळ्या चारण्यासाठी घेवून गेला होता. सध्या पावसाळा असल्याने गेल्या … Read more

विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास. ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची … Read more

लोकसभेप्रमाणेच आघाडीचे पानिपत होईल

अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत. मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे. असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे … Read more

मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील !

कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे. मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या … Read more

आमदारकीचा षटकार ठोकणार: आ. कर्डिले

अहमदनगर : जेऊर गटामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतरही राहुरी मतदार संघात जेऊर गट आहे. आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मी सहाव्या वेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. आ. कर्डिले यांनी नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये रॅली काढत जेऊर … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी शहर : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी … Read more

त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते

राहुरी: शहरातील नागरिकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सोडवू. सत्ता असताना अनेक वर्षात नगरपालिकेची साधी पाणीपुरवठा योजना करता आली नाही, त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते. अशी टीका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली. राहुरी येथे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पेठेतून प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा … Read more

तुल्यबळ लढत – राम शिंदेना बारामतीचं आव्हान पेलवलं का?

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून ओळख असलेले राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लढत दुहेरीच होणार यात मात्र शंका नाही!  कर्जत – जामखेड – विधानसभा मतदारसंघावर मागील २५ … Read more

मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती. मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक … Read more

होय, मी मतदान करणार

अहमदनगर ;- विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबवून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. होय, मी मतदान करणार या आशयाखाली हे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला आपण करुया मतदानचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.18 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथे … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.  भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

श्रीगोंद्याला गतवैभव मिळवून देणारच – पाचपुते

श्रीगोंदे घोड व कुकडीचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, ऊस, लिंबूसह अन्य पिकांची स्थिती चांगली असून या पुढेही पाणी नियमानुसार घेऊ, असे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी पारगाव येथे सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचपुते म्हणाले, मी चाळीस वर्षे काय केले, या विरोधकांच्या प्रश्नात राजकारण आहे. जे प्रश्न करतात, … Read more