भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

निष्क्रीय असल्यामुळेच त्यांनी रणांगण सोडले : पाचपुते

श्रीगोंदा : केवळ भाजपमध्येच विकास करण्याची ताकद आहे. माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्र बिंदू मानून काम केले. पण मागील पाच वर्षात चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा डोळ्यादेखत जळताना पाहून वाईट वाटते. घोड, कुकडी, विसापूर, साकळाई,सीना,या महत्वाच्या शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या प्रश्नाला विद्यमान लोकप्रतिनिधीने कधीच महत्व दिले नाही. ते तालुक्याचे आमदार होते की एका … Read more

विकासकामांचा जनतेला हिशेब द्या : आमदार कर्डिले

राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले. उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत … Read more

कुकडीचे पाणी अडवणाऱ्यांना धडा शिकवा : ना.शिंदे

जामखेड : कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे कुकडीचे पाणी बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यात अडविले होते. परंतु मी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणले. आज त्या खुनसीपोटी निवडणुकीत उभे राहिले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुकडीचे हक्काचे पाणी पुणे जिल्हात ठेवण्यासाठीच त्यांना आमदार व्हायचे आहे. परंतु ही जनतेने आपला स्वाभीमान दाखवत बारामतीचं पार्सल परत पाठवण्याची व तुमच्या हक्काचे पाणी अडविणाऱ्यांना धडा … Read more

म्हणून त्या आमदारांना मते मागण्याचा अधिकार नाही!

शेवगाव –राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले. भाजप सरकारने मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असी टीका जि. प. उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केली. महाआघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.  जि. प. सदस्य प्रभावती ढाकणे, संगीता दुसुंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, … Read more

…रामाचा रावण झालायं, येत्या २१ ला दहन करण्याची वेळ!

जामखेड – गेल्या दहा वर्षांपासून कर्जत-जामखेडचा विकास खुंटला आहे. आता रोहित पवार यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन चेहरा मिळाला आहे. येत्या २१ ला राम शिंदे यांना पायउतार करा.  कारण रामाचा रावण झाला असून त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामखेड येथील सभेत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ … Read more

नगर शहरातील बहुजन मतदार वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीशी

नगर : बहुजन समाजाला आज समाजात असणार स्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना दैवत मानणारा सर्व समाज आणि मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन … Read more

पाणी प्रश्‍नासाठी बबनराव पाचपुते यांना आमदार करा

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नासाठी महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना आमदार केल्याशिवाय जनता राहणार नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी केले. पाचपुते यांच्या प्रचारा निमित्त शहरातून काढलेल्या फेरीच्या वेळी नगराध्यक्ष पोटे बोलत होत्या. श्रीगोंदा बाजार समितीपासून सुरू झालेल्या पायी प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नगराध्यक्षा पोटे म्हणाल्या, श्रीगोंदा … Read more

Vidhansabha 2019 – आ. मुरकुटे हसले तर गडाख कोमजले!

नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.  असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. … Read more

नगरमधील शिंदेशाही धोक्यात, गड येईल पण सिंह जाईल?

कर्जत – जामखेड – जिल्ह्यात युतीचे भाजपाचे वारे जोरात आहेत. येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे. ना. राम … Read more

आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा

राहुरी  : राहुरी मतदारसंघाच्या विकासाकरिता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा, असे आवाहन अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ आदी भागात सौ. कर्डिले यांनी महिला व कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सौ.कर्डिले म्हणाल्या, की गेल्या … Read more

हवेत असलेल्या पाचपुतेंना शेलारांनी घाम फोडला!

श्रीगोंदा – श्रीगोंदा मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी  मोठी ओढाताण सुरू असल्याचे जिल्ह्याने पाहिले होते. या स्पधेत पाचपतेनी नागवडेंना मागे सोडत भाजपाचे तिकीट मिळवले होते.  उमेदवारी मिळवल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं.  कारण  लोकसभा निवडणुकीतही  या मतदार संघातून खा. डॉ. विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. … Read more

विधानसभा निवडणुकीच्या वादातून राडा

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या वादातून कर्जत तालुक्यात राडा झाला असून, यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास धांडेवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली. बैठकीनंतर बाहेर … Read more

खरे निष्क्रिय कोण जनतेला ठाऊक आहे

तांदूळवाडी : राहुरी नगरपालीका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकास पर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती. यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली … Read more

विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं

राहुरी : राहुरीकरांनी मला दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली. राजकारणात निवृत्त व्हावं लागतं परंतु कार्यकाळात झालेल काम जनतेच्या लक्षात राहतं. पदापेक्षा केलेलं काम अविस्मरणीय आहे. विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं, त्यांना संधीच सोनं करता आलं नाही, ते मी करून दाखवलं म्हणूनच माझा उगम झाला. महाराष्ट्रात प्रत्येकाला कुठेही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. मी बाहेरचा … Read more

पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार ?- अजित पवार

कर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग … Read more

माजी खासदार दिलीप गांधी -उपनेते अनिल राठोड यांचे अखेर मनोमिलन

नगर : जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली. गांधी, राठोड, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या बैठकीत मनमोकळी मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार दिलीप गांधी हे महायुतीचे उमेदवार … Read more

पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत

राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली. महाराष्ट्रातील किल्ल्यांत … Read more