कर्डिले व तनपुरे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळली

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळत त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. छाननीत अन्य दोन उमेदवारांचे तीन अर्ज बाद झाल्याने ११ उमेदवारांचे १५ उमेदवारी अर्ज राहुरीत वैध ठरले. सोमवारी माघारीच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. छाननीला शनिवारी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात सुरुवात झाली. यमनाजी आघाव यांचा … Read more

गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी ३० लाखांची मागणी

श्रीगोंदे :- अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यातून आरोपीला मुक्त करण्यासाठी महिलेच्या नातेवाईकाने ३० लाखांची मागणी केली. पैसे मागणारा जिवा घोडके याच्या विरोधात दादासाहेब लक्ष्मण नलगे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महिलेच्या फिर्यादीवरुन लखन काकडे, लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, शुभांगी नलगे, राहुल नलगे, कुमार काकडे, सुनीता काकडे, स्नेहल भोसले (सर्व सांगवी दुमाला) या आठ जणांवर … Read more

खासदार सुजय विखेंची जीभ घसरली !

अहमदनगर ;- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असे वक्तव्य नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कर्जत येथील प्रचारसभेत केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जतमध्ये शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विखे यांनी हे वक्तव्य केले. विखे म्हणाले, … Read more

नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अचानक हजेरी लावली. यावरून नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ढोकराई फाटा येथे प्रगती कार्यालयात नागवडे समर्थकांचा मेळावा झाला. नागवडे निवडणुकीत काय भूमिका घेतात, … Read more

आमदार मोनिका राजळे कोट्यधीश पण एकही चारचाकी वाहन नाही !

शेवगाव ; – आमदार मोनिका राजळे कोट्यधीश असून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी आपल्या कुटुंबाकडे नऊ कोटी 28 लाख 86 हजार 178 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. आ. मोनिका राजळे यांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही, तर त्यांचे पती स्व. राजीव … Read more

मंत्रिपदाचे दावेदार विजय औटी यांच्या पराभवासाठी खा.सुजय विखेंसह विरोधक एकत्र !

पारनेरमध्ये युतीला तिलाजंली देवून युतीचा धर्म न पाळता भाजपचे खासदार डॉ.विखे औटींच्या अडचणी भर पडण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. अर्थात औटींबद्दल युतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते व सर्वसामान्य नाराज आहेत. त्याबरोबर औटी हे विजय झाले तर ते पुढे मंत्रिपदाचे दावेदार राहतील. ते दावेदार होवू नये म्हणून आतापासून पाडापाडीचे राजकारण या निमित्त्याने सुरू झाले आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात … Read more

आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम

राहुरी : आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम गेली काही दिवस करत होते.मात्र विखे कर्डिले समीकरण तोडण्याचे षडयंत्र आम्ही सामूहिकपणे हाणून पाडले.आमच्या दोन्ही कुटुंबांमधील वैचारिकता कायम राहणार आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.  राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत बोलतांना खा.विखे … Read more

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज बाद!

अहमदनगर :- राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड मतदार संघातील रोहित राजेंद्र पवार या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडविली आहे. कर्जत जामखेड … Read more

सुजित झावरेंचे बंड थंडावणार ?

पारनेर :-  जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवत नगर जिल्हातील नेत्यांशी महाआघाडी करून विधानसभा निवडणुकीत उतरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर राहुन पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना मदत करावी. अशी गळ राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी झावरे यांना घातली आहे. दुसरीकडे झावरे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

विखे आणि शिंदेंना मंत्रिपदे मिळतील पण आ.शिवाजी कर्डीलेना नाही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री … Read more

उमेदवारांच्या ऐवजी पावसानेच केले शक्तीप्रदर्शन !

अहमदनगर – जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक आल्याने पावसाने उमेदवारांचा निरूत्साह झाला. भर पावसात इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. या पावसामुळे शक्तीप्रदर्शनाचा बेत हुकला. दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

‘मी आपली मनापासून माफी मागतो’ – आ.राहुल जगताप यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

श्रीगोंदा :- तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघात घेतल्यानंतर समर्थक, कार्यकर्त्यांची माफी मागीतली आहे. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकली आहे. भाजपाचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच, मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आ.जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडू भाजपाच्या उमेदवारीसाठी चाचपणी … Read more

आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच !

कर्जत तालुक्यात शिवसेनेने आयोज़ित केलेल्या निर्धार मेळाव्यात आता शिवसैनिकांचही ठरलंय…पुन्हा राम शिंदे…चं ! अशा घोषणा देण्यात आल्या. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने तसेच जनसामान्यांचे हित पाहून कर्जत-जामखेडमधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळत ना. शिंदे यांना साथ … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून युवा नेते रोहित पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील निवडणूक कार्यालयात दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी त्यांनी सहायक निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला. त्यांच्या अर्जावर हभप वामन खराडे गुरुजी व हभप प्रकाशमहाराज जंजिरे यांनी अनुमोदक व सुचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष … Read more

महागड्या घड्याळांचे शौकीन आहेत रोहित पवार,तब्बल २८ लाख रुपयांची घड्याळे !

जामखेड :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नाईकवडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी प्रकाश महाराज जंजिरे, प्रतापराव खराडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पवार यांची आई सुनंदा, पत्नी कुंती, बहीण सई, चुलते रणजित व चुलती शुभांगी … Read more

हुकूमशाही आणि गुंडशाहीच्या विरोधात पारनेरमध्ये सुजित झावरे यांची अपक्ष उमेदवारी !

पारनेर :- विधानसभा मतदार संघात तीन वेळेस आमदार असलेले शिवसेनेचे विजय औटी व शिवसेनेतून हकालपट्टी केलेले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले नीलेश लंके यांना पर्याय म्हणून सुजीत झावरे पाटील यांनी पारनेर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर मध्ये असलेली हुकूमशाही व गुंडशाही मोडीत काढण्यासाठी शिवसेनेचे औटी व राष्ट्रवादीचे … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का आ.राहुल जगताप निवडणूक लढविणार नाहीत !

अहमदनगर :- वयाच्या 26 व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून विधानसभेत गेलेले राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपाचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती बदलली, श्रीगोदा तालुक्यातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत आमदार जगताप यांनी माघार घेत कार्यकर्त्यांना दुसरा धक्का दिला. श्रीगोंद्यात आज … Read more