सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार – पालकमंत्री राम शिंदे

कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. … Read more

८ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पारनेर: तालुक्यातील सुपा येथील जि.प. प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय शाळकरी मुलीवर प्रमोद मच्छिंद्र कदम, वय ३८ रा.सुपा याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिक व महिलांच्या लक्षात ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना दि.१३ रोजी घडली. याबाबत सविस्तर असे की, कदम याने तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुरडीस येथील न्यू … Read more

शिवसेनेतर्फे शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीस विरोध !

अहमदनगर ;- शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार असले, तरी त्यांची आजवरची भूमिका ही कायम पक्षविरोधीच राहिली आहे. सर्वच निवडणुकांत आमदार कर्डिले यांनी भाजप-शिवसेने विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे पत्रकाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रकावर माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा … Read more

सत्ता असो अथवा नसो विकासकामे करणारच : सुजित झावरे

पारनेर : सत्ता असो अथवा नसो जनसेवेची कास धरून विकासकामे करीत असतो. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.पारनेर शहरातील पारनेर ते लोणी हवेली रस्ता व मटण मार्केटचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत चेडे हे होते.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष … Read more

मुलीची छेडछाड करणाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर : पिडीत मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांनी आरोपी रोहन उर्फ राहुल दिगंबर फलके, रा.मठ पिंपरी, ता.जि. अहमदनगर यास सत्र खटल्याच्या निकालाविरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या अपीलामध्ये भा.द.वि.का.क. ३५४ नुसार दोषी धरून त्यास १ महिना सक्त मजुरी व ५०हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. एम.व्हि दिवाणे यांनी काम … Read more

कर्जत – जामखेडमध्ये बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही !

जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते आमचचं असत.  कर्जत-जामखेड मतदार संघात बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही. पार्थ पवार पेक्षाही रोहित पवार यांची वाईट परिस्थिती … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना दिलासा

मुंबई : राज्यात नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित मंत्री काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.  त्याच्या मंत्रीपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. बहुचर्चित … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अकोले येथे सुगाव शिवारात … Read more

विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार : आ. राहुल जगताप

ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले, आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. … Read more

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यात … Read more

भाजपाला अँड प्रताप ढाकणे का चालत नाहीत?

पाथर्डी – येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपच्या नेत्या व भावी मुख्यमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ना.मुंडे यांच्या कडे अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घ्या असा आग्रह त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धरला होता परंतु ढाकणे हे राष्ट्रवादीत आहेत, त्यांना भाजपात कसे घ्याचे असे उत्तर ना.मुंडे यांच्याकडून आले. हे उत्तर वंजारी समाजाच्या राजकीयदष्ट्या योग्य नव्हते. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात भरदिवसा घरफोडी

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरोडी येथील रहिवासी संजय भाऊ वागस्कर यांच्या घरी दि.९रोजी दिवसा दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारत, घराच्या कपाटातील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घरफोडीबाबत वागस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, … Read more

शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्राला संधी द्या…

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना सोडून भाजपतील मोठा गट राऊत यांच्या गळाला लागल्याने मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे. उमेदवारीसाठी प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत हे दोघे दावेदार झाल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्या विरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे न दिल्याच्या निषेधार्थ आलेश्वर (ता.परांडा) येथील शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी हे साखर आयुक्तालय,पुणे येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्तांना शेतकर्‍यांनी दिले आहे. परांडा तालुक्यातील आलेश्वर, बंगाळवाडी, गोसावीवाडी डोंजा … Read more

महाजनादेश यात्रेमध्ये कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करणार ?

संगमनेर :- भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यात पुन्हा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मंडपाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अकोले येथून दुपारी १२ वाजता यात्रेचे संगमनेरमध्ये आगमन होईल. अकोले नाक्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, जाणता राजा मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

राष्ट्रवादीनेच केले महाराष्ट्राचे वाटोळे!

अहमदनगर – राज्यात युती सरकारने मोठी भरीव विकास कामे केलेली आहेत. 10-15 वर्ष राज्यात सत्तेत असणार्‍यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही. साकळाई योजना फक्त विखेच करु शकतात असे सांगत विखे पाटील परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. उमेदवारीसाठी त्यांच्याकडे माणसे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉ. … Read more