दिपाली सय्यद म्हणतात खा.सुजय विखेंनी फसविले….

श्रीगोंदा :- तालुक्यातील 35 गावांसाठी जीवनदायी ठरणारी साकळाई योजना पूर्ण तत्त्वास व्हावी, या मागणीसाठी दि.9 ऑगस्ट रोजी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पटांगणात अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. साकळाई देवीचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली जाणार आहे. साकळाई योजनेचे आतापर्यंत निवडणूक … Read more

शिर्डी विमानतळाचा लवकरच होणार विस्तार !

शिर्डी :- विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘त्या’ डॉक्टरला खडसावले

राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले. नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात … Read more

उड्डाणपुलाचे काम महिन्याभरात सुरू !

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत … Read more

डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप एकाच व्यासपीठावर!

अहमदनगर – परस्परांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसले. महापालिका निवडणूक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे लोकसभा निवडणूक विरोधात लढले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे एका व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.   महापालिकेच्या घरकुलांची सोडत दोघांच्या हस्ते काढण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात … Read more

वृद्ध विधवा महिलेवर भर दिवसा अत्याचार

कर्जत :- तालुक्यात राक्षसवाडी खुर्द येथील विधवा वृध्द महिलेवर भर दिवसा अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर सर्व दुकाने बंद ठेवली. तसेच गावामध्ये एकही घरामध्ये चूल पेटली नाही. या घटनेतील आरोपीस तातडीने अटक करून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संतत्प ग्रामस्थानी कर्जतचे पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन केली आहे. … Read more

कुत्रा चावला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर :- पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी चक्क कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्याविषयी हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भिस्तबाग चाैकातील पवननगरमध्ये २ जूलैला ही घटना घडली. याप्रकरणी विजय अर्जुन पिंगळे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. विजय पिंगळे यांची पुतणी दुर्गा संजय पिंगळे हिला रॉट व्हिलर जातीच्या कुत्र्याने चावा घेतला. हा … Read more

विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

अहमदनगर :- विवाहबाह्य संबंधाला विरोध करीत असल्याच्या कारणातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कैलास आनंदा नरके (वय ४२, कासारी, शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. जगताप यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. आरोपी नरके याने पत्नी सविता हिला घरातून … Read more

ह्या कारणामुळे रोहित पवार लढविणार कर्जत – जामखेड मधून निवडणूक…

अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकत या निर्णया मागील कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे. याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. … Read more

मैत्री, प्रेम, अत्याचार ते सोशल मीडियात बदनामी करत दहा लाखांची खंडणी…हि घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल…

अहमदनगर :- पंधरा दिवसांपूर्वीच तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् त्या दोघांची गृहस्थाश्रम वाटचाल सुरू झाली. दोघांच्या सुखी संसारात जुना मित्र प्रकटला. त्याने तिच्या मिस्टरांकडे दहा लाखांची खंडणी मागत त्याने संसाराच्या वाटेत काटे टाकले. आता हा वाद थेट पोलिसांच्या दारात पोहोचला असून पोलिस त्या ‘मित्राच्या शोधात आहेत. कोण्या पिक्चरमधील ही कहाणी नाही तर ही नगरात घडलेली … Read more

मी केलेला विकास पहायचा असेल तर मतदारसंघात येऊन पहा – आ. शिवाजी कर्डिले

राहुरी :- आपले शिक्षण कमी असले, तरी आपण फिल्डवर काम करतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत, ते शासन दरबारी कसे मांडायचे आणि मंजूर करून घ्यायची हातोटी आपल्याकडे आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक निधी राहुरी – नगर – पाथर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे. आपण केलेला विकास कोणाला पहायचा असेल, तर या मतदारसंघात येऊन पहा, असे … Read more

महिलांच्या शौचालयात डोकावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

राहुरी :- एसटी बसस्थानकावरील शौचालयात गेलेल्या प्रवासी महिलेकडे खिडकीतून डोकावून पाहणाऱ्या अरबाज शेख (राहुरी) या तरूणाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंंबई येथील ही महिला बसस्थानकावरील शौचालयात गेल्यानंतर पाठीमागच्या खिडकीतून अरबाज शेख हा मोबाइल हातात घेऊन डोकावत असल्याचे दिसले. या महिलेने बाहेर येऊन अन्य प्रवाशांना हा प्रकार सांगताच त्यांनी संबंधित तरूणाला रंगेहात पकडून लाथाबुक्क्यांनी तुडवत चोप … Read more

मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण

राहुरी :- मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण केल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपी मुजफ्फर लतीफ शेख व त्याची चुलती गुलशन रशीद शेख यांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. दोन वर्षांपूर्वी मुजफ्फर लतीफ शेख याने राहत्या घरातून युवतीचे अपहरण करत गुलशन रशीद शेख हिच्या घरात तिले डांबून ठेवले … Read more

वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

राहुरी :- तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दोन वर्षांपूर्वी एकाने मुलीचे राहत्या घरातून अपहरण करीत ‘तुझ्यासह तुझ्या वडिलांना जिवे मारून टाकू’, अशी धमकी देत अत्याचार केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुजफ्फर लतिफ पटेल याने सुमारे दोन वर्षांपूर्वी तरुणीला तिच्या वडिलांच्या राहत्या घरातून पळवून आणले. चुलतीच्या … Read more

शेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी

शेवगाव :- राज्यमार्गावर सौंदाळा-नागापूर शिवारात रविवार दि. ३० जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या दरम्यान ॲपे रिक्षा व इंडिका कार यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक ठार, तर नऊ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय, श्वास हॉस्पिटल व नगर येथे हलविण्यात आले आहे. प्रवासी वाहतूक करणारी ॲपे रिक्षा … Read more

खा. सुजय विखेंचा जनता दरबार हाऊसफुल्ल

अहमदनगर : जनतेचे प्रश्न व सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेला जनता दरबार अक्षरश: हाऊसफुल्ल झाला होता. व्यक्तिगत अडचणींपासून सार्वजनिक प्रश्न घेऊन आलेल्या युवक, महिला व जेष्ठ नागरिकांची गर्दी डॉ. सुजय विखे पाटील यांना भेटण्यासाठी झाली होती. नागरिकांचे प्रश्न आवधानाने ऐकून, समजून घेत डॉ.विखे आपल्या स्वीय सहायकांना त्याबाबतच्या … Read more

रोहित पवार यांनी आ. जगताप पितापुत्रांना टाळले…

अहमदनगर :- रोहित पवार यांनी शनिवारी शहरातील पक्षाचे आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कानाडोळा केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची भेट घेत बंद खोलीत गुफ्तगू केले. आ. जगताप पितापुत्रांना त्यांनी का टाळले, यावरून कुजबुज सुरू झाली आहे. गेले दोन दिवस रोहित पवार नगरमध्ये होते मात्र नगर … Read more

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शशीकांत दत्तात्रय कोहकडे, वय २७ हा तरुण शेतक-याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान मोमीन आखाडा येथील शशीकांत कोहकडे हा संध्याकाळी २८ आपल्या शेतातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला. त्याला नातेवाईकांनी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी … Read more