श्रीगोंदा तालुक्यात दारुड्यांची पोलिसाला बेदम मारहाण

श्रीगोंदा :- तालुक्यातील खाकी बाबा देवस्थान जवळ बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसाला मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी संजय कोतकर हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसावरच दारुड्याने हात उचलल्याने कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पिसोरे खांड, येथील आषाढ महिन्यात भरणाऱ्या खाकी बाबांच्या यात्रा उस्तवात … Read more

विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष … Read more

नवऱ्याला सोडून लग्न करण्यासाठी आरोपीकडून महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर : जामखेडमध्ये अजब प्रकार घडला. चक्क आरोपीने विवाहीत महिलेला लग्न करण्याचा आग्रह धरला. नवऱ्याला सोडून दे अन् माझ्याशी लग्न कर अशी अजब मागणी करत आरोपीने त्या महिलेच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मायकल शेळके (रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात १६ जुलैला गुन्हा दाखल झाला … Read more

त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मीच दिसतो …

अहमदनगर : सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चा केवळ वावड्या असून अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही स्पष्टीकरण आ. संग्राम जगताप यांनी दिले आहे. सन २०१४ ची विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा … Read more

धनगर समाजासाठी एक हजार कोटी :- महादेव जानकर

पारनेर :- राज्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजना येत्या ऑगस्ट पासून लागू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ना. जानकर हे पारनेर तालुक्यातील टाकळीहाज़ी येथे आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. याबाबत अधिक … Read more

श्रीगोंद्यात जमिनीच्या वादातून महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून विनयभंग

श्रीगोंदे :- जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला, अशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी … Read more

अहमदनगर – कल्याण महामार्गावर बस-कंटेनरच्या अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

अहमदनगर – नगर कल्याण रोडवर कंटेनर व एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बस पलटी झाली असून त्यातील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महाविदयालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. सुचित्रा बडेअसे मृत तरुणीचे नाव आहे कल्याण रोड वरून नगर – पारनेर (MH 40 N 8756) ही बस नगरच्या दिशेने येत होती. दुपारी … Read more

प्रियकरासाठी सासर सोडून आली माहेरी,पण लग्न करण्यास प्रियकराने दिला नकार अखेर प्रेयसीने केली आत्महत्या !

जामखेड – प्रियकरासाठी सासर सोडून माहेरी आलेल्या विवाहित महिलेसोबत लग्न करण्यास प्रियकराने नकार दिल्याने अखेर संबंधित विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी बळीराम सदाफुले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. … Read more

‘हे’ काम घेवून सुजित झावरे अजित पवारांच्या भेटीला

पारनेर -पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना सभापती पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या संचालक मंडळांनी सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांची भेट घेतली. सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेेते अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करत बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर प्रशांत गायकवाड यांना एक … Read more

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू … Read more

नगर जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई समस्या कायम

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी लावली.परंतु  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील 13 लाख 57 हजार 295 जनता पाणी टँकरवर अवलंबून आहे.  जिल्ह्यातील 487 गावे अणि 2 हजार 847 वाड्या वस्त्यांवर अजूनही 687 पिण्याच्या टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यातील 5 नगरपंचायातींच्या हद्दीत अद्याप पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. … Read more

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार !

अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार … Read more

पारनेर सैनिक बँकेत लाखोंचा अपहार

श्रीगोंदे :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे संस्थापक असलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप बँकेचे संचालक सुदाम गणपत कोथिंबिरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. कोथिंबिरे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून बँकेच्या शिलकी रकमेतून ५,४५,७७२ रुपयांचा अपहार केला. … Read more

महिलांसह तिघांनी ९ लाखाला फसविले

नगर – नगर शहरात जयहिंद सेल्स कॉर्पोरेशन गजानन कॉलनी नवनागापूर एमआयडीसी नगर येथे एका तरुणीस व इतर लोकांना २ महिला व एका पुरुषाने वेगवेगळे अमिष दाखवून  ९ लाखांची फसवणूक केली.  त्यांना पैसे भरायला लावून पावत्या देवून मशिन व कच्चा माल न देता तसेच शाखा सुरु करण्यासाठी तरुणीकडून व लोकांकडून वेगवेगळ्या रकमा घेवून त्यांना पावत्या देवून … Read more

नोकरीत फसवणूक झाल्याने युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

राहुरी :- देवळाली प्रवरा येथील युवकाचा मृतदेह शुक्रवारी पाचोरा येथे रेल्वे रुळावर आढळला. आदिनाथ भिंगारे (२१) असे या युवकाचे नाव आहे.  त्याच्याजवळील ओळखपत्रामुळे रेल्वे पोलिसांना ओळख पटली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने आदिनाथने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  कारवस्ती येथील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार असलेल्या आदिनाथने आत्महत्या केल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली.  राहुरी फॅक्टरी … Read more

व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा !

शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला. याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच … Read more

वेश्या व्यावसायिकांचा पोलिसांवर हल्ला !

अहमदनगर – पांढरीपूल परिसरात असणार्‍या एका हॉटेलच्या शेड मध्ये सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान ताब्यात घेतलेल्या महिलांची विचारपूस करणार्‍या पोलिसांवर चालकांने हल्ला चढविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सार गफुर शेख, वाजिद नसीर शेख, मन्सूर रहमानभाई पठाण, बाबा निजाम शेख, गंगाराम जानकु काळे, रशिद सरदार शेख यांच्यासह … Read more

मुलाच्या लग्नाला दहा दिवस उरले असताना श्रीगोंद्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत … Read more