ब्रेकिंग : श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांचा राजीनामा

श्रीगोंदा :- पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे या दोघांनी आज त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान श्रीगोंदा पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशावरून पंचायत समितीचे विद्यमान सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित लक्षात घेऊन … Read more

गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथे ३२ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास शेटीबा भोसले (वय ३२ वर्षे), रा. पोखरी (पवळदरा) या विवाहित तरुणाने घरातील खिडकीच्या लोखंडी अंगलच्या गजास सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. घटनेच्या अगोदर रामदासची … Read more

श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांना जनतेचे देणे – घेणे नाही !

श्रीगोंदा :- तालुक्याच्या आमदारांना तुमचे काहीएक देणे नाही. अजून एक कारखाना कसा होईल, यासाठी ते काम करत आहेत. माजी आमदार तर उसाचे पैसेच देत नव्हते. मला लक्ष घालावे लागले. मग पैसे मिळाले. राधाकृष्ण विखेंना काँग्रेसने काय कमी केले, म्हणून ते मुलाला खासदार करण्यासाठी भाजपत गेले? ही मंडळी सत्ता आणि स्वार्थासाठीच काम करतात, अशी टीका आ.बच्चू … Read more

नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला

राहुरी :- तालुक्यातील उंबरे येथील नवविवाहितेचा मृतदेह वांबोरी शिवारातील गडाखवस्ती येथील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. योगिता ऋषिकेश ढोकणे असे तिचे नाव आहे. चारित्र्याचा संशय घेऊन पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार विवाहितेचे वडील रघुनाथ केशव दरेकर (ताहराबाद, ता. राहुरी) यांनी वांबोरी दूरक्षेत्रात दिली आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास … Read more

नगर-पुणे महामार्गावर मोटारसायकलवरील दोघांना वाहनाने चिरडल्याने जागीच मृत्यू

अहमदनगर :- नगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील चास गावाजवळ मोटारसायकलवरील दोघांना वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावाजवळून दोन तरुण मोटरसायकलवरून जात होते. भरधाव मोटारसायकल डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्य़ा बाजूला गेली. त्याचवेळी आलेले एक … Read more

तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा येण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करा – माजीमंत्री पाचपुते

श्रीगोंदे ;- गेली ३५ वर्षे सामान्य जनतेच्या कृपेने आमदार, मंत्री होऊन सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचे पर्व तयार केले. जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत लढलो. पराभव झाला, तरी रणांगण सोडले नाही. आता सर्वांना विश्वासात घेऊनच विधानसभेचा निर्णय घेऊ, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे सांगितले. परिक्रमा शैक्षणिक संकुलात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खासदार डॉ. सुजय … Read more

रन विथ फॅमिली उपक्रमास नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर  – व्यायामाची आवड निर्माण होऊन संपुर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ्य राहण्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रन विथ फॅमिली या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नगरकर उत्सफुर्तपणे धावले. उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे 6 वाजल्यापासूनच बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यानात बाळगोपालांसह … Read more

संभाजी कदमांकडून आमदारकीची तयारी ?

अहमदनगर : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केले आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मागील विधानसभा निवडणूक शिवसेना, भाजप तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढविली होती. या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी … Read more

रोहित पवारांना कर्जत जामखेड मध्ये कॉंग्रेसकडून ‘नो एंट्री’ !

अहमदनगर :- कर्जत-जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे. ह्या जागेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पवारांची अडचण होणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच जागा असून शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या … Read more

श्रीगोंद्यात सामाजिक कार्यकर्त्याचा गळ्याला फास अडकवलेला मृतदेह आढळला

श्रीगोंदे :- तालुक्यातील पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे (२६) या तरुणाचा गळ्याला फास अडकवलेल्या स्थितीतील मृतदेह देऊळगावच्या हद्दीत शुक्रवारी आढळला. दरम्यान मृत्यूपूर्वी त्याने गावातील एक ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार श्रीगोंदे पोलिसांत दिली होती. या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे हा तरुण खासगी वाहनावर चालक … Read more

मोलमजुरी करणाऱ्या एकाचा मृतदेह विहिरीत आढळला

राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या अर्जुन पाचे (वय ५२) याचा मृतदेह मोकळ ओहोळ येथील कदम यांच्या विहिरीत गुरुवारी आढळला. काॅन्स्टेबल शैलेश सरोदे, सुशांत दिवटे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दुपारी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत. वीस … Read more

पालकमंत्री राम शिंदेंच्या शब्दाला कार्यकर्त्यांनी दाखवली केराची टोपली !

जामखेड :- नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीत सातपैकी एबी फार्म नसल्याने एक अर्ज बाद झाला. भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांची भर पडल्याने लढत रंगतदार होणार आहे. सुरुवातीला भाजपतर्फे पठाण सलमा शाकीरखान यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु पक्षाचा एबी फार्म पठाणऐवजी शेख जाकीया आयुब … Read more

राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण

अहमदनगर :- राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे,तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य मंत्री पदाबाबत ही संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन, पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे. … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेवून बलात्कार

नगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पारनेर तालुक्यातील धोत्रे परिसरातून एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. तिला नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारातील के कताई डोंगरामध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध करून बलात्कार केला.  ३१ मे ते २ जून २०१९ या काळात हा अत्याचाराचा प्रकार घडला, पिडीत मुलीच्या आईने … Read more

किरणच्या खूनप्रकरणी दोघांना पुण्यातून अटक

अहमदनगर :- नगर शहरातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 29 एप्रिल … Read more

लग्नाला घरच्यांचा विरोध, प्रेमीयुगुलाने घेतला गळफास मुलीचा मृत्यू, मुलावर उपचार

अहमदनगर :- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अवंतिका रघुनाथ दळवी (२१, कडा, ता. आष्टी) असे मृत युवतीचे नाव असून, मुकुंद बाबासाहेब भोजने या तरुणावर उपचार सुरू आहेत. या … Read more

रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील राजकारण तापणार

जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका … Read more

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले. जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. … Read more