मोदी, पवार, फडणवीस यांच्या होणार सभा

नगर : मतदारसंघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्टार नेत्यांच्या सभा होणार अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन असून सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारील मोकळ्या जागेत ही सभा होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासाने पंधरा दिवसांपूर्वीच या मैदानाची पाहणी केली आहे. ही जागा उपलब्ध झाली नाही, तर वाणीनगर येथील मैदानावर सभा घेण्यात येईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह … Read more

…..पण टोपीची औकात काय ? – राठोड

नगर :आमदार शिवाजी कर्डिले जे बोलतील ते कधीच करत नाहीत. डॉ. सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत, त्यांना ठावूक नाही.  कर्डिले हे विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही. टोपीची महती काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड, … Read more

माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही – आ.शिवाजी कर्डिले.

अहमदनगर :- माझ्यावर राजकीय द्वेषातून काही लोक आरोप करत आहेत. काही आमदारकीचे स्वप्नच पहात आहेत, तर काही लोक आपण आमदारकीला पडलो आहोत हे मान्य करायला तयारच नाहीत. अशा सर्व लोकांना मी वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा टोला प्रा. गाडे, माजी आमदार राठोड, तनपुरे यांचे नाव न घेता आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला. नगर … Read more

लोकसभा निवडणूक वाद : माजी नगरसेवक आणि शिक्षक नेत्यामध्ये तुंबळ मारामारी.

पाथर्डी :- लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार, या मुद्यावरून बुधवारी रात्री माजी नगरसेवक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये तुंबळ मारामारी झाली. ही घटना शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. हा वाद उशिरा पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत गेला. मात्र, कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. याबाबत माहिती अशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान असलेले एक माजी नगरसेवक रात्री … Read more

विखे पाटलांकडून पैशाच्या जोरावर कार्यकर्ते खरेदी करण्याचा प्रयत्न !

जामखेड :- तालुक्यातील कोणत्या कार्यकर्त्याची आर्थिक किंमत किती आहे, कोणाला किती पैसे द्यावे लागतात, असे विचारत पैशांच्या जोरावर माणसे खरेदी करण्याची भाषा दोन वर्षांपासून या मतदारसंघात केली जात आहे, असा आरोप लोकसभा निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी शहर व तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी … Read more

पालकमंत्र्यांच्या गावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव असून. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे. आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर … Read more

#लोकसभा 2019 : पहिल्याच दिवशी २१ जणांनी नेले ३९ अर्ज !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली. या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी, विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक यंत्रणेचे १७ अधिकारी- कर्मचारी या प्रक्रियेसाठी … Read more

माजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड.कमल सावंत लोकसभेच्या मैदानात.

अहमदनगर :- महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू कमल सावंत या अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आपले भाग्य आजमावणार आहेत. ही माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सावंत म्हणाल्या की, घराणेशाहीच्या विरोधात मी लोकसभा अपक्ष लढविणार आहे. सध्याच्या राजकारण्यांना शेतक-यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतक-यांना वापरुन घेण्याचे काम राजकारण्यांकडून सातत्याने होत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून, … Read more

जनसामान्यांसाठी माझे घर नेहमी उघडे – आ.संग्राम जगताप.

अहमदनगर :- बोधेगाव माझे काम करा, नाहीतर पाहून घेऊ असा दम कोणी देत असेल, तर काळजी करू नका, ते मी पाहतो. दक्षिणेत इथला उमेदवार आवश्यक असताना बाहेरील उमेदवार का? मागील वेळी झालेल्या चुकांचा त्रास सर्वांनी भोगला. यंदा तशी चूक न करता सेवेची संधी दिल्यास परिसरातील ३५ गावांचा विकास मी करेन, असे आश्वासन दिले. जनसामान्यांसाठी माझे … Read more

सुजय विखेंच्या पराभवासाठी नगरमध्ये अजित पवारांनी पाठवली २०० तरुणांची टीम !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विखेंची जिरविण्यासाठी व राष्ट्रवादीचा विजय खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची २०० युवकांची फौज राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी दक्षिणेत दाखल झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी आपले चिरंजीव डॉ . सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना … Read more

…आणि शरद पवारांनी नगरमध्ये मुक्काम टाळला !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर मतदारसंघातून उमेदवारी केल्याने शरद पवार यांनी नगरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरला मुक्कामी थांबून दोन्ही निवडणुकांतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची रणनीती शरद पवार निश्चित करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, केवळ चार ते पाच तास येथे थांबून व … Read more

लग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या !

पारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत. येत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं … Read more

भाजपच्या जिल्हापरिषद सदस्याला अटक.

कर्जत :- जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांना मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने स्पेशल सेल वॉरंटप्रकरणी अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राशिन येथील जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांची जगंदबा कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स प्रमोटर्स या नावाने पुणे येथे बांधकाम क्षेत्रात काम करणारी संस्था होती.  २०१२ साली या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील मांगलेवाडी परिसरात घोडके … Read more

…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.  नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

माजीमंत्री पाचपुतेंचे कुकडीच्या आवर्तनासाठी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांना साकडे.

श्रीगोंदा :- सध्या दुष्कळाची धग वाढत आहे. या परिस्थितीत शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी कुकडी आवर्तन अत्यंत महत्वाचा घटक ठरू शकतो. मात्र फळबागा जळण्यापूर्वीच पाणी सुटले पाहिजे. कुकडीचे आवर्तन लवकर न सुटल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व गोष्टींचा विचार करता दि.१ एप्रिल पासून कुकडीचे आवर्तन सोडावे. अशी आग्रही मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी … Read more

श्रीगोंद्यात भीषण अपघातात दोघे ठार

श्रीगोदें :- तालुक्यातील औटेवाडीजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चारी नं. १२ येथे स्विफ्ट व हायवाची समोरासमोर टक्कर होऊन दोन जण जागीच ठार झाले. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती चिंताजनक आहे. श्रीगोंदे-कर्जत रस्त्यावर असलेल्या लहानशा पुलावर ही दुर्घटना झाली. श्रीगोंद्याहून स्विफ्ट (एमएच १२ जीएफ … Read more