अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकी व टॅंकरचा अपघात, एक जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर इंधन खाली करण्यासाठी आलेल्या टँकरने पेट्रोल भरुन घरी चालेल्या दुचाकी चालकास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. हा अपघात दुपारी 1 वाजता डाँ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या आवारात घडला.याबाबत माहिती अशी की, राहुरी कारखाना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याचे फेसबुक अकाउंट हॅक !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राहुरी फॅक्टरी शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हॅक करून मित्र परिवाराला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच राहूरी तालुका शिवसेनेचे प्रमुख विजय बाबुराव ढोकणे यांचे फेसबुक अज्ञात व्यक्तीने हायजॅक केले असून, तो इसम ढोकणे यांच्या नावाने मेसेजद्वारे 10 हजार रुपये मदतीची मागणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला विष पाजले

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरात नवीन मराठी शाळेजवळ राहणारी विवाहित तरुणी सो. वैशाली संदीप झिंजुडे, वय २७ ही आठवडे बाजार असल्याने घरीच होता. तेव्हा नवरा संदीप रोहिदास झिंजुर्डे हा दारु पिवून घरी आला व पत्नी वैशालीला म्हणाला की, मला दारू पिण्यासाठी पैसे दे आणि, तो तिला शिवोगाळ करु लागला. तेव्हा सासू … Read more

मतदान न केल्याने महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-विरोधकांना मतदान केल्याच्या रागातून दारुच्या नशेत एका विवाहित महिलेला शस्त्र व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रमोद प्रल्हाद कोबरणे, संदीप पोपट कोबरणे (दोघेही रा.ओहोळ वस्ती, गणेगाव) या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रमोद … Read more

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडले याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अरणगाव येथे ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली … Read more

दोन गटांत तुंबळ हाणामारी : तीन जणांवर कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटाकडून सर्रासपणे कुऱ्हाड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आलाय. ही घटना दि. २७ मार्च रोजी घडली. दोन्ही गटातील तीन जणांवर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता अनिल बोरूडे … Read more

मोक्कातील फरार असलेला ‘फक्कड’ अखेर जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग या तरुणाच्या खूनप्रकरणातील तसेच मोक्का लावलेल्या गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सुनील फक्कड अडसरे (वय २६ रा. शेडाळा, ता. आष्टी जि. बीड) याला सुपा या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ओंकार भालसिंग याचा विश्वजीत कासार व त्याच्या टोळीने खून … Read more

अरे बापरे: तहसील कार्यालयात हाणामारी! कर्मचा-यांचे  कार्यालयाला टाळे ठोकून कामबंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वैयक्तिक कारणावरून शेवगाव तहसील कार्यालयात एकमेकांशी वाद करुन गोंधळ घालणा-या व शासकीय कामकाजात अडथळा आणणा-या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव या पिता पुत्रासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा … Read more

कोरोना नियम पायदळी तुडवणाऱ्या ‘या’ खासदारांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-औरंगाबादेत कोरोना नियम पायदळी तुडवणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊनचा निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीत कोणीही तोंडावर … Read more

नेवासा तालुक्यातील या गावात लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच दिसून येत आहे. यातच राहता तालुक्यात कठोर नियम करण्यात आले असतानाच आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यातच करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेवून नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीने पाच दिवसांचे लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु … Read more

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत धमकावणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- प्रेमसंबंध असलेल्या दोघांमध्ये वाद झाला व संबंधित व्यक्तीकडून पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून सचिन ज्ञानदेव काळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोकड-मोबाईलसह 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी राहुल जनार्धन लाड (वय 28) रा. नेवासा फाटा, रशीद मुस्तफा शेख (वय 30), गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 25), दत्तात्रय गोरख साळवे (वय 24), आकाश अनिल गायकवाड (वय … Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपीवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीस गती दिली असून घरोघर जाऊन ते वीज खंडित करण्याचा धाक दाखवून वीज बिल भरण्यास धमकावत आहेत. अशीच वसुली करताना वीज ग्राहक व महावितरणच्या अधिकाऱ्यां कडाक्याचे भांडण झाल्यावर ते पोलीस ठाण्यात पोहचवून सरकारी कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल अकोल्यातील महालक्ष्मी कॉलनीतील रहीवासी … Read more

महिलेचा विनयभंग करून पतीला केली मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर शहरातील एका उपनगरात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीसह मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात राजू उर्फ राजेश सुखदेव पवार याच्याविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे जबरदस्तीने बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील एका गावात आपल्या आजी आजोबांच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना डिसेंबर २०२० दरम्यान घडली आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यातून आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. कोपरगाव तालूक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारूड्या बापाने केला मुलाचा खून!

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना आखेगाव (ता.शेवगाव) येथे मंगळवारी (दि.३०) पहाटे घडली. पत्नी ताराबाई करपे हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध  पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आखेगाव परिसर हादरला आहे. घटनेनंतर दारुड्या बाप पसार होण्यात यशस्वी झाला. याबाबत … Read more

आरोपी बाळ बोठेची रवानगी पारनेरच्या जेलमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. खंडणीच्या गुन्ह्यात कोर्टाने आज मंगळवारी बाळ बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यातून कोर्टाच्या निगराणीखाली पारनेरच्या जेलमध्ये गेला आहे. रेखा जरे हत्याकांडात पत्रकार असलेला … Read more

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मृतदेह आढळला पोलीस म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका पार्कमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते जी. एस. बावा यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पश्चिम जिल्हा बाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा यांनी सोमवारी संध्याकाळी सुभाषनगर येथील तवाल असलेल्या पार्कमध्ये ग्रीला लटकून आत्महत्या केल्याचं बोललं … Read more