शेतकऱ्यांना चालू गळितास २८०० रुपये भाव द्या

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला कृषी मुल्य आयोगाच्या शिफारशीनुसार २८०० रुपये टनाप्रमाणे हमीभाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुळा, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून मिळावा, या मागणीचे निवेदन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन्ही कारखान्याला दिले. नेवासे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या दोन्ही साखर कारखान्याकडून २४११ हा तुटपुंजा भाव … Read more

अल्पवयीन मुलीला झालेली भूतबाधा काढण्यासाठी कुटुंबीयांकडून आठ हजार रुपये घेतले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीला झालेली भूतबाधा काढण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. यानंतरही मुलीला फरक पडला नाही म्हणून तक्रादारांनी पैसे परत मागितले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट केल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये १८ नोव्हेंबरला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोड बाप-लेकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. रावसाहेब हेरू वडते (वय ५७) व गणेश रावसाहेब वडते (वय ३०, दाेघे रा. बाेळेगाव, नागलवाडी, ता. शेवगाव) असे मृत बाप-लेकांची नावे आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वडते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपी कान्हू माेरेला पकडले

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- राहुरी येथील पत्रकार राेहिदास दातीर यांच्या खून खटल्यातील पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कान्हू गंगाराम मोरे याला पुन्हा अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांना यश आले आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची आरोपी कान्हु मोरे व त्याचे साथीदारांनी एप्रिल २०२१ मध्ये अपहरण करून हत्या केली होती. त्याबाबत राहुरी … Read more

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी… खतांच्या किंमतीत मोठी वाढ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर असताना आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मात्र मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा … Read more

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या 21 जागांसाठी 19 डिसेंबरला मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुक अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 96 जणांनी अर्ज माघारी घेतले आहे. आता 21 जागांसाठी 61 जण निवडणूक रिंगणात उभे राहिलेले आहेत. यासाठी 19 डिसेंबरला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले. मात्र इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे ज्येष्ठांच्या प्रयत्नांना … Read more

एसटीच्या तब्बल ८० हजार संपकरी कर्मचाऱ्यांना बसला वेतन कपातीचा फटका

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून जमा झाले आहे. मात्र जे कर्मचारी संपात सहभागी आहे त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. तर संपात सहभागी नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले आहे. तर गेल्या महिन्याभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी … Read more

पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल 76 अर्जांपैकी एवढे अर्ज झाले बाद

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, यामुळे सध्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. यातच पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल 76 अर्जांपैकी छाननी प्रक्रियेत 13 अर्ज अवैध ठरले आहे. तर 13 जागांसाठी 63 अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेले अर्ज प्रभाग क्रमांक 1 शीतल सुनील म्हस्के प्रभाग क्रमांक 5 … Read more

‘या’ मागणीसाठी शेतकरी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेणार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  शेतकर्‍यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 14 डिसेंबरला महांकाळवाडगाव येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतील, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकरी संघटनेचे नेते निलेश शेडगे व इतरांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे. दरम्यान श्रीरामपूर महावितरण कंपनीने दहा दिवसांपासून तालुक्यातील शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बिल वसुलीसाठी … Read more

अरणगावातील झेंड्याचा वाद… पोलिसांनी आठ जणांना केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील अरणगाव येथील बायपास चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 200 ते 250 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

कार – टेम्पोच्या धडकेत पाच जण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा ते निघोज दरम्यान पुढे चाललेल्या टेम्पोला मागून आलेल्या एका कारने धडक दिली असल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार मधील पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यामध्ये अंकुश लेंधे, लहानु लेंधे, चालक गणेश लेंधे, जयराम गोंधे, ऋषिकेश शिंदे हे … Read more

विदेशातून प्रवास करून श्रीरामपुरात आलेल्या त्या व्यक्तींचे रिपोर्ट आले…

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  सध्या ओमायक्रॉनच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असून परदेशातून भारतात येणार्‍यांचा शोध घेवून त्यांची तपासणी केली जात आहे. यातच श्रीरामपूर येथे दुबई, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहून आलेल्या आणखी दहा जणांची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. या अगोदर दुबई येथून आलेल्या चौघांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय … Read more

पत्नीचा छळ करणार्‍या पतीला न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  पत्नीचा छळ करणार्‍या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन वर्षे साधी कैद व 10 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. संतोष रामनाथ गायकवाड (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित एम. शेटे यांनी हा निकाल दिला. … Read more

खोटा गुन्हा दाखल केल्याच्या नैराश्यातून तरुणाने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक फाटा येथील 22 वर्षीय तरुणाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सुदर्शन चंद्रकांत राजगुरू (22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील सुगाव फाटा येथील या तरुणांने राहत्या घरात छताच्या अ‍ॅगलला दोरीने गळफास घेऊन … Read more

राहाता बाजार समितीत 3 हजार 641 कांद्याच्या गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत 3 हजार 641 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2500 तर लाल कांद्याला 2200 रुपये इतका भाव मिळाला. तर लाल कांद्याला 1800 ते 2200 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये, लाल कांद्याला 1250 ते 1750 रुपये … Read more

नगरकरांसाठी दिलासादायक माहिती… ‘त्या’ 25 जणांचा अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे. यातच याचे रुग्ण राज्यात देखील आढळून आल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. नुकतेच नगर जिल्ह्यात बुधवारी आणखी 39 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले आहेत. ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 121 प्रवाशी आले असून आतापर्यंत … Read more

Sun Pharma Fire : सन फार्मा कंपनीच्या आगीत एकाचा मृत्यू

Sun Pharma Fire :- नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला लागलेल्या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली होती. यावेळी त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा मृत्यू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सन फार्मा कंपनीला भीषण आग !

अहमदनगर शहरातील एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.(Ahmednagar Breaking: Sun Pharma Company fires) आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती … Read more