वनशहीद किनकर यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर येथे भरवस्तीत धुमाकूळ घालून अनेकांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना जखमी झालेले राहुरी येथील वन कर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर उपचारादरम्यान मृत पावले. ताहाराबाद येथे वनशहीद किनकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रु नयनांनी शहीद वनरक्षक किनकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी … Read more

फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात 100 शक्तिशाली महिलांची यादी

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  फोर्ब्स या सर्वात लोकप्रिय मासिकाने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांनी जर्मन चांसलरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली महिला बनल्या आहेत या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड तिसऱ्या स्थानावर आहेत. … Read more

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल १३ अर्ज अवैध ठरले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी आलेल्या ८९ उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली असून यातील १३ अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार लंकाबाई देविदास खरात यांच्या अर्जावर त्यांचे पती नगरपंचायतचे ठेकेदार असल्याबाबत हरकत घेण्यात आली. प्रियंका केतन खरात यांच्या अर्जावर या उमेदवाराचे वय २१ वर्षाच्या आत असल्याची … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये…ओमायक्रॉनबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनचे राज्यात आतापर्यंत १० रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी आणखी ६५ जणांचे नमुने पाठवले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जगभरात या प्रकारामुळे होणारा मृत्युदर अत्यंत कमी आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून उपाययोजना … Read more

परराज्यातील तिघांनी नगरच्या कांदा व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- आंध्र प्रदेशमधील तिघांनी नगर शहरातील कांदा व्यापार्‍याचा विश्वास संपादन करून त्याला 34 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 39 रा. सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान चिपाडे यांच्या दाखल फिर्यादीवरून बी. रामकृष्णा, पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजू (तिघे रा. गाजुवाका, जि. विशाखापट्टणम, … Read more

कायदा – सुव्यवस्था धोक्यात! दरोडा टाकत चोरटयांनी लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील एका घरावर चोरटयांनी दरोडा टाकत लाखोंचा माल लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे पोपट गोरक्षनाथ शिसोदे यांच्या राहत्या घरी रात्री तीन … Read more

चक्क पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोरुन जात चोरट्यांनी मूळच्या वसईत राहणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह सोन्याचे पदक लांबविले आहे. याबाबत अधिक ताहिती अशी कि, मूळच्या वसईत राहणार्‍या मनीषा रामनाथ वाघ या कामानिमित्त संगमनेरात आल्या होत्या. पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याने क्रीडा संकुलाकडे जात असताना संजय गांधी नगर … Read more

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दुचाकीस्वाराला उडविले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- वाळू वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने घुलेवाडीतील एक तरुण जखमी झाला होता. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक आपल्या वाहनासह पसार झाला होता. नुकतेच जखमी तरुणाच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज शेख याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

Cds Bipin Rawat Helicopter Crash : CDS बिपिन रावत यांचा मृत्यू !

सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. ज्या हेलिकॉप्टरसोबत हा अपघात झाला ते भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 होते. … Read more

महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यातच लाचार-बेजबाबदार अधिकारी कर्मचारीही करताहेत बोगस नियमबाह्य फेरफार नोंदी !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारला सर्वत्र घोटाळ्यांच्या आरोपाने घेरले आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये महा-घोटाळे, भ्रष्टाचार माजला आहे. नगर जिल्ह्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच लाचार व बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी करताहेत बोगस व नियमबाह्य फेरफार नोंदी ही गंभीर बाब असतांना देखील शासन दखल घेत नाही, ही शरमेची बाब आहे. … Read more

नगर मनपाचे पहिले आयुक्त बी.डी.सानप यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त बी.डी.सानप यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 71 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.बी.डी.सानप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर 2000 साली त्यांनी प्रथम … Read more

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेचा खून ! खुनामुळे परिसरात खळबळ ..

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील लोणी येथील हॉटेल पाकिजामध्ये काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या डोक्यात टणक वस्तूने घाव घालून या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी ती उघडकीस आली. खुनाचे कारण समजू शकले नाही. रंजना ऊर्फ अंजना मोहिते (वय अंदाजे ५९) असे या मूळच्या केडगाव येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण करून तरुणीवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघा जणांनी रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. अपहरण करणाऱ्यापैकी एकाने आपल्याला गुंगीचे औषध पाजून सिन्नरमधील एका लॉजवर अत्याचार, मारहाण केल्याची तसेच पोटावर सिगारेटचे चटके दिल्याची तक्रार संबंधित तरुणीने पोलिसांकडे केली. मात्र याच प्रकरणात संबंधित तरुणीने सिन्नर पोलिसात … Read more

२ हजारांच्या नोटांची संख्या निम्याने घटली !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  भारतीय बाजारपेठेत २,००० रुपयांच्या चलनी नोटांची संख्या निम्म्याने घटली असून सध्या केवळ २२३.३ कोटींच्या (१.७५ टक्के) नोटा चलनात वापरल्या जात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली आहे. एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लिखित उत्तर दिले. यात ते म्हणतात की, देशात गेल्या नोव्हेंबर … Read more

साेन्याने माेडले सर्व विक्रम ! जाणून घ्या तीन कारणे ज्यामुळे होत आहेत बदल…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशातील सोने आयातीने सर्व विक्रम मोडून काढले आहेत. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या अवघ्या १० महिन्यांत ३,४५,३०३ कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले. आयातीचा सध्याचा सरासरी कल असाच सुरू राहिल्यास डिसेंबरपर्यंत हा आकडा ४ लाख कोटींच्या पुढे जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकाच वर्षात सोन्याच्या आयातीवर एवढा खर्च कधीच … Read more

Maharashtra weather news : महाराष्ट्राला पावसासह गारपिटीचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवार (दि. ९)नंतर पुन्हा वातावरणात बदल घडून येण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, थंडी, धुके, पाऊस आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांसह महाराष्ट्रात देखील गारपिटीसह विजा पडणे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत देखील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ राजकीय व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला एक राजकीय व्यक्ती व फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपी राजकीय व्यक्तीच्या भावाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात ६ डिसेंबरच्या सकाळी, एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला पकडताना वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर हे जखमी झले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरा मध्ये पाच डिसेंबर रोजी बिबट्याने थेट शहरात बसून धुमाकूळ घातला … Read more