अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरु

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याच्या धंद्याने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला असून देणगीद्वारे जमा झालेले धान्य, कपडे, तेल हे काळ्या बाजारात विकले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. तरी या टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्री साई सेवा प्रतिष्ठान संस्थेने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे केली आहे. या अर्जात … Read more

गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली एकाचा मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) यांचा मृतदेह … Read more

महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राहाता परिसरात जवळपास ६० टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषी पंपाची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया … Read more

एटीएम लुटण्यासाठी चोरटे शटरच्या आत घुसले अन अडकले… पहा पुढे काय घडले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- काही अज्ञात चोरट्यांनी श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही यामुळे मोठी घटना घडण्यापासून बचावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरटे एटीएम फोडण्यासाठी आत गेले आणि त्यांनी कुणाला काही समजू नये … Read more

अण्णा हजारे बरे होऊन राळेगणला ! किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. गुरुवारी सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल सामान्य आले असल्याने वयाच्या ८५ व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि … Read more

कोरोनाने मृत्यू,आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना ५० हजारांची मदत ! या कागदपत्रांची असेल आवश्यकता ! अशा असतील नियम व अटी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राज्यात कोविड-१९ संसर्गाने निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांना ५०,००० रुपयांचे सानुग्रह साहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार हा निर्णय घेतला असून त्याचा जीअारही जारी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली. … Read more

अरे बापरे!शिक्षिकेवर कारवाईसाठी पालक शाळेला टाळे लावणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेकडुन शाळा प्रशासन, पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरु असुन, त्या शिक्षीकेवर तात्काळ कारवाई झाली नाही तर शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर शिक्षिका … Read more

आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो ‘या’ जिल्हा परिषदेच्या सभापतीची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदाच्या माध्यमातून केवळ टाकळी ढोकेश्वर गटातच नाही तर तालुक्यातील गावोगावी अनेक विकासकामे केली. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. तालुक्यात आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे सुरू करतो. असे … Read more

अखेर जे व्हायचे तेच झाले! नगर जिल्ह्यात ‘लालपरी’वर दगडफेक ; चालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली. या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. … Read more

शिकरीच झाले होते शिकार मात्र….

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यात एटीएम फोडण्यासाठी गेलेले चोरटेच चक्क आतमध्ये फसल्याची घटना समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी अज्ञात चोरटे केबिनच्या आत गेले. कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून लावून घेत मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम मशीन फोडता न … Read more

राळेगण सिद्धीच्या सरपंचाचा राजीनामा ‘यांची’ बिनविरोध निवड

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राळेगणसिद्धीचे सरपंच डॉ.धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज निवड प्रक्रिया झाली. निवडीसाठी मंडलाधिकारी कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाभेष औटी यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. राळेगणसिद्धीसह परिसराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष … Read more

शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून अद्यापही वंचितच

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बाधित पिकांच्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. पंचनाम्यानुसार नुकसानीच्या अनुदानाच्या एकूण उद्दिष्टापैकी जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम श्रीरामपूर तालुक्याला प्राप्त झाली. परंतु येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. केवळ कारेगावचे शेतकरीच अनुदानापासून वंचित ठेवले असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे … Read more

Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   राष्ट्रीय पातळीवरील तेल कंपन्यांनी दिवाळीपासून इंधनाच्या किमतीत वाढ केलेली नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 23 व्या दिवशी स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 27 नोव्हेंबरलाही तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 03 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, … Read more

५ डिसेंबरला राज्यस्तरीय सर्व शाखीय ब्राह्मण वधू-वर मेळावा

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ब्रह्मवृंद वैभव वधुवर सुचक मंडळातर्फे सर्व शाखिय ब्राह्मन समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी ( ५ डिसेंबर) औरंगाबाद येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट जातींसाठी आहे. हा मेळावा सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे. मेळाव्यासाठी उच्चशिक्षित अल्पशिक्षित प्रथम … Read more

शेतीसाठीच्या खंडित वीजपुरवठ्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- रब्बी हंगामाची पेरणी व लागवड सुरु असतांना हंगाम उभा करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना महावितरण कंपनीने बेकायदेशिरपणे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करुन पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत असतांना … Read more

शिवसेनेचा आणखी एक नेता संकटात ! तब्बल १४ तास झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी … Read more

अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून घेतलं जाणार की पुढे ढकलणार?

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. हे अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून उपराजधानीत घ्यायचं की पुढे ढकलायचं याबाबतचा निर्णय येत्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कामकाज सल्ला बैठकीत घेण्यात येणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उपराजधानीत येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली. … Read more

जिल्ह्यातील हा 16 वर्षीय युवक बेपत्ता ! वडीलांनी केलय हे आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  शिरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक दिगंबर बोर्डे हा युवक 19 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाला आहे याचा शोध आजूबाजूला व नातेवाईकांकडे केला असता आढळून आलेला नाही या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे असे युवकांचे वडील दिगंबर … Read more