२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागत !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे, असे भाकीत जयपूर येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी … Read more

सातवा वेतन आयोग आणि १० वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांची संघटना तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात विविध प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला. तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्मचारी संघटनांसोबतच्या बैठकीनंतरच्या … Read more

संपूर्ण कुटुंबानेच केला आत्महत्येचा प्रयत्न ! सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण वाचून बसेल धक्का

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- भोपाळमध्ये एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण दिलं आहे. आनंदनगरमधील अशोक विहारमधील संजीव जोशीच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची … Read more

तरुणांनी हद्दच केली ! वाढदिवसाचा केक कापला नाही म्हणून केला होता ‘तो’ पेट्रोल बॉम्ब हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयावर 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा सांगवी पोलिसांनी उलगडा केला आहे. यात तिघांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, या तरुणांचा प्लॅन ऐकाल तर … Read more

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे ८ दिवस मुसळधार पावसाची शक्यता ! पहा काय असेल तुमच्या जिल्ह्याची स्थिती

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- भारतीय हवामान खात्याने नुकताच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पुढचे ८ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा मृतदेह आढळला ; आत्महत्या की घातपात?

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. अमोल मोहनराज वामन (वय २६ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वडगावपान … Read more

सोयाबीन, कांदा, डाळिंबाला मिळाले असे भाव ! जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या ३६२४ गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त २६५० तर लाल कांद्याला २६०० रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त ६६३६ रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत ३ हजार ६२४ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी … Read more

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदे शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा काही अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न असफल झाल्याने आत फसलेल्या चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करत एटीएमचे शटर एका बाजूने कट करत बाहेर निघून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती श्रीगोंदे पोलीसांना समजताच … Read more

पाणीपुरवठ्याची थकबाकी भरण्यासाठी मनपाला महावितरणचा इतक्या दिवसांचा ‘अल्टिमेटम’

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील थकबाकी १५ दिवसांत भरावी, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी नोटिस महावितरणने मनपाला बजावली आहे. नोटिस मिळताच मनपात लेखाधिकारी, पाणीपुरवठा विभागासह आयुक्तही सतर्क झाले आहेत. तातडीने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची धास्ती आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी योजना ५० वर्षांपूर्वीची आहे. शहर … Read more

महात्मा फुले विकास महामंडळास तात्काळ कर्जपुरवठा करावा अन्यथा महामंडळास टाळे ठोकण्याचा आरपीआयचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- महात्मा फुले विकास महामंडळ मार्फत एनएसएफडीसी चे जिल्ह्यातील दोन वर्षापासून मंजूर असलेली प्रकरणासाठी तात्काळ कर्जपुरवठा करुन बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लाभार्थींना 15 दिवसाच्या आत कर्ज पुरवठा न झाल्यास आरपीआयच्या वतीने 13 डिसेंबर रोजी महात्मा … Read more

चिंताजनक ! ९ दिवसांत कोरोना मृत्यूदर १२१ टक्क्यांनी वाढला

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विदेशात करोनाचा नवीन प्रकार B.1.1529 आढळल्यानंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. कोविडच्या नव्या प्रकाराचे रुग्ण बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या नागरिकांची सखोल चाचणी करावी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याने गावच्या परिसरात राहणारे भिवा घुले यांच्या तीन मेंढ्या, एक पाळीव कुत्रा, तसेच नरेंद्र तोडमल व दादा काळे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- वीजप्रश्नी महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रताप दहिफळे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता माजी आमदार मुरकुटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विधवा महिलेवर युवकाने केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी साजिद अब्दुललतीफ शेख ऊर्फ लाला (रा. बोल्हेगाव) याच्याविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह एका उपनगरात तिच्या माहेरी राहत होती. तिची साजिदसोबत ओळख होती. … Read more

भाजपची भविष्यवाणी गेली दोन वर्षे सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना … Read more

अखेर सरकारने घेतला मोठा निर्णय ! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मिळणार ‘इतकी’ मदत

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. काम करणारी तसेच कुंटुंबप्रमुख व्यतींचा या कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने … Read more

राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी या नेत्याची बिनविरोध निवड !.

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील आदर्शगाव राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटी यांची बिनविरोध निवड शुक्रवारी करण्यात आली आहे. राळेगणसिद्धीसह परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला. औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी यांना संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे … Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले…मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- “लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील,” असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. “जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल … Read more