कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना महामारी मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार विविध … Read more

शेवगावच्या जिल्हा परिषद शाळेलगत बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (मुलांची) शॉपिंग कॉम्प्लेक्स 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर बांधण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्री घुले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे समवेत संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, … Read more

संगीत बहार गुरुकुल विहारातील साधकांचे जागतिक पातळीवर बासरी वादन स्पर्धेत यश

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- पंढरपुर येथील कपलिनी संगीत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन जागतिक पातळीवरील शास्त्रीय गायन वादन स्पर्धेत नगरच्या संगीत बहार गुरुकुल विहारातील साधकांनी सहभागी होऊन बासरी वादन स्पर्धेत यश मिळविले. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. लहान गटात प्रणव दंडवते याने द्वितीय क्रमांक तर शिवराज भोर याने तृतीय व … Read more

दादाभाऊ कळमकर, जी.डी.खानदेशे, डॉ.राजेंद्र व डॉ.सुचिता धामणे यांना ‘मराठा समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :-  अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मराठा समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना देण्यात येणार्‍या ‘मराठा समाज भुषण पुरस्कारां’साठी यावर्षी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे आणि मानसिक विकलांग महिला आणि बालकांसाठी … Read more

आरक्षणापासून वंचित असणार्‍या ओबीसी बारा बलुतेदारांकडे सरकारचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- ओबीसी समाज आज संघटीत होत आहे. मात्र वंचित ओबीसी बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाज आजही वंचित आहे. या वंचित समाजाला न्याय हक्क मिळवून देणे यासाठी बारा बलुतेदार महासंघाचे धोरण ठरविण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी चिंतन बैठकीचा उपक्रम अहमदनगरपासून सुरु करण्यात आला, असे प्रतिपादन प्रजा लोकशाही परिषद महाराष्ट्र आणि … Read more

पत्रकार सूर्यकांत वरकड यांना पीएच.डी. जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :-  हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथील पत्रकार सूर्यकांत मोहन वरकड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली. अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्रातून त्यांनी निवडक संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक अभंगांचा अभ्यास या विषयावरील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. … Read more

कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी पक्ष अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीसाठी धावून आला

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोना काळात राष्ट्रवादी पक्षाने कोणतेही राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करुन सर्वसामान्य जनतेला आधार दिला. अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीसाठी राष्ट्रवादी पक्ष धावून आला. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना अल्पसंख्यांक समाजा पर्यंत घेऊन गेल्यास पक्षाची विचारधारा त्यांच्या पर्यंत पोहचणार आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालय व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना … Read more

नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- शहराच्या उत्तरेला लागून असलेल्या नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविण्यात आले … Read more

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला घरात घुसून बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- विजेचे कनेक्शन कट करण्याच्या कारणावरुन पाच जणांनी वीज कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला घरात घुसून काठी तसेच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना कारेगाव येथे घडली. याबाबत लखीचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रताप कांतीलाल कातोरे (वय ३८), हर्षद शामराव धुमाळ (वय २०), शामराव सखाराम धुमाळ (वय … Read more

राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपविण्याचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांचा जयघोष करुन राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. शिवाजी डमाळे, मेजर भाऊसाहेब भुजबळ, माजी सुभेदार भाऊसाहेब आंधळे, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. बी.जी. गायकवाड, अ‍ॅड. संदीप … Read more

आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड होऊन संप मागे

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड होऊन संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 72 हजार आशा व गटप्रवर्तक कर्मचारी या संपात उतरले होते. बुधवारी (दि.23 जून) राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक … Read more

कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र … Read more

चार खुनाचा आरोप असणाऱ्या त्या महिलेला जामीन

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात २० आगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोने देण्याचे आमिष प्रकरणी पारधी समाजातील चार व्यक्तींचा खून झाला होता. याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ व आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात बेलवंडी पोलिसात अक्षदा कुंजा चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. यात नाथिक्या कुंदा चव्हाण, श्रीधर कुंजा … Read more

आमदार निलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस ,लंडन’मध्ये समावेश !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाच्या वैश्विक संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांची विदेशातही दखल घेतली असून त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस,लंडन’मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. आज (गुरूवारी )दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतीचिन्ह … Read more

शीलाविहारला लॅण्ड माफियाने बंद केलेला रस्ता खुला करुन देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गुलमोहर रोड, शीलाविहार येथे लॅण्ड माफियाने जागा बळकाविण्यासाठी नागरिकांच्या वहिवाटीचा 20 फुटी रस्ता बंद केला असताना, सदर जागेतून गेलेली पिण्याची पाईपलाइन देखील तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मागीक वर्षापासून वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याची मागणी केली जात असताना नागरिकांनी मनपा आयुक्तांना स्मरणपत्र देऊन रस्ता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावाच्या मदतीने पत्नीने केला विजेचा शॉक देऊन पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना … Read more

बापरे! १७ लाखांच्या रोख रकमेसह चोरांनी चक्क एटीम मशीनच पळवले…

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या कमी श्रमात अधिक पैसे कसे मिळतील याकडे ओढा वाढला आहे. मग त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. अलीकडे अनेकजनाची ऑनलाईन देखील फसवणूक करण्यात यात आहे. त्याचसोबत चोरट्यांचा देखील धुमाकूळ वाढला आहे. हे चोरटे कोणत्या वस्तूची चोरी करतील याचा काहीच अंदाज लावता येत नाही. नुकतीच लाखो रुपयांच्या रक्कमेसह … Read more

मोबाईल अ्ॅपवर होणार पीकनोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नव्या तंत्राचा वापर करून गैरव्यवहार कमी करणे, वेळेची बचत करणे आणि काम घरबसल्या करणे शक्य होत आहे. राज्य सरकारनेही ई-प्रणालीवर भर दिला आहे. आता शेतक-यांच्या बाबतीतही सुखकर असा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल ॲपवर पिकांची नोंद करता येणार आहे. ‘माझी शेती माझा साताबारा… मीच लिहिणार माझा पीक पेरा’:-  … Read more