खत खरेदीसाठी शेतकरी भल्या पहाटपासून दुकानासमोर रांगेत

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राहुरी तालुक्यात आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र आता उगवण झालेल्या पिकांना खतांची गरज भासू लागली आहे. खत मिळावे, यासाठी अनेक शेतकरी रोज उपाशी पोटी चक्करा टाकत आहेत. त्यातच कोरोनाचीही भीती आहे. पण, टंचाई असल्याने अनेकांना खताविना रिकाम्या हाताने … Read more

घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली होती. घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी 65 हजार 655 गोण्या कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. दरम्यान कांद्याला भाव जास्तीत जास्त 2400 रुपयांपर्यंत निघाला. तसेच मोठ्या मालाला 1900 ते 2200 रुपये भाव … Read more

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ७५० … Read more

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लोणावळा येथील बैठक महत्वपूर्ण ठरणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- दि.26 व 27 जून रोजी लोणावळा येथे होणार्‍या ओबीसींच्या चिंतन शिबीराच्या नियोजनासाठी नगर येथे बैठक़ आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना ओबसी, व्हीजेएनटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप म्हणाले की, ओबीसीच्या संतप्त भावना आता सर्वांनी घ्यानात घेतल्याचे लक्षात येते म्हणून ओबीसीच्या प्रश्‍नांसाठी सर्व राजकीय पक्षांसह संघटनांचे नेते सक्रिय होत … Read more

बुथ हॉस्पिटल सेवा कार्य हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षाभरापासून सर्वांमध्ये भितीचे वातावरण होते. परंतु प्रशासन व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून कोरोनावर मात करण्यात आपण आता यशस्वी होत आहोत. यामध्ये नगरमधील बुथ हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे. कोरोना रुग्णांना उपचाराबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून झाले आहे. येथील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी केलेल्या … Read more

जुने जिल्हा न्यायालयाच्या परिसरात स्वच्छता करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जुने जिल्हा न्यायालयात आवारात पड असलेल्या इमारती व परिसराची स्वच्छता करुन नवीन जिल्हा न्यायालयाच्या पूर्वेला असलेल्या बंगल्यावर कोणी राहत नसताना डागडूजीचा खर्च केला जात असताना न्यायालयाच्या मालकीच्या इमारतींचे योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.  … Read more

शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यात मालपाणीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील आरोपी योगेश मालपाणी यांच्या अडचणीत भर पडली आहे. मालपाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिल्या नंतर दुसर्‍या आणि आज त्याला तिसरा गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले. डाॅ. नीलेश शेळके संचलित एम्स हाॅस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप … Read more

श्रीरामपूर शहरात तरुणावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने पुन्हा भिती निर्माण झालेली आहे.गोदावरी नदी परिसर असल्याने पूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर होता. येथील शेतकरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; या महामार्गावर झाला टँकर पलटी, एक जण टँकर खाली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास पलटी झाला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. यात एक मोटारसायकल चालक जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच … Read more

बाळासाहेब नाहाटा यांनी केले गंभीर आरोप म्हणाले राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे बाहुले…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- गटविकास अधिकाऱ्यावर बूट फेकून मारण्याची घटना श्रीगोंदा तालुका पंचायत समितीत घडली. या प्रकरणी राज्य बाजार समितीचे संचालक आणि लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचे वडील बाळासाहेब नहाटा यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आता नाहाटा यांनी स्पष्टीकरण देत धक्कादायक असे आरोप केले आहेत, मी कोरोना काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे जीव … Read more

कुटुंबात तुंबळ हाणामारी,दोघांना अटक : परस्परविरोधी फिर्याद दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली असून, एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. ही घटना रविवार दि.२० रोजी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, भगवान बाजीराव बोठे( वय २६ रा. इमामपूर) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीची आई इमामपूर येथील गट नंबर … Read more

मराठा आरक्षणासाठी केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमावा : माजीमंत्री ढाकणे

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास केंद्र सरकारच कायदा करु शकते. मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे मात्र तो विषय केंद्राच्या कक्षेतला असल्याने घटनेतील तरतुदीनुसारच मराठा आरक्षण देणे शक्य आहे. कायदा जाणणाऱ्या माणसांनी चुकीच्या ठिकाणी आरक्षण मागुन वेळ वाया घालु नये असे मत माजी केंद्रीय मंत्री बबन … Read more

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच पहायला मिळाली होती. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आज दिनांक 22 जून रोजी सायंकाळ पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष … Read more

नवरा – बायकोला शिवीगाळसह मारहाण; पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- एका विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे, लिला आबासाहेब ढोकचौळे (सर्व रा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात नातेवाईकांकडे आलेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अरुण नावाच्या आरोपीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे कि सदर पिडिता डोंगरावर जनावरे ‘चरण्यास गेली असता आरोपी अरुणने तिला मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. पिडीत अल्पवयीन मुलीने पारनेर … Read more

तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  शेवगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवजच्या आधारे आभासी वाळू लिलावचा कट रचला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विशाल बलदवा याने आमरण सुरु केले आहे. यावेळी उपोषणकर्ते बलदवा यांनी म्हंटले कि, वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही सर्व पुरावे देऊन देखील … Read more

ना.बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यात युवकांची मोठी फळी युवक काँग्रेस उभी करणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर तालुका हा काँग्रेस विचारांना मानणारा तालुका आहे. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काँग्रेसचे मोठे काम राहिलेले आहे. विधानसभा मतदारसंघांच्या नवीन रचनेमध्ये तालुक्याचे तीन भाग झाले असले तरी देखील तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण करावी, असे … Read more

गाव कोरोनामुक्त झाला असताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन केला योग, प्राणायाम

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र अहमदनगर संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. गाव कोरोनामुक्त … Read more