ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार प्रकरणी ‘त्या’ दोघांवर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या. यात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी लगेचच पसार झाले. मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता चव्हाण घोडेगावातून घरी चालले होते. … Read more

आमदार लंके म्हणतात भाषणे ठोकण्यापेक्षा विकासकामांवर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- परिषद किंवा १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तीन लाख रुपयांची कामे मंजूर करून आणायची, लाख रुपयांच्या विकास कामाच्या नावाखाली हातभर भाषणे ठोकायची, हे काम विरोधक करत आहेत, त्यामुळे विकासाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली असून, भाषणे ठोकण्यापेक्षा आपला विकास कामांवर भर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

जे एका मंत्र्याला जमले नाही, ते काम वर्षभरात आ. रोहित पवार यांनी करुन दाखवले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जगात दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे बघितले जाते. आज त्याठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन करताना प्रामुख्याने साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विकासाचा सुक्ष्म दृष्टीकोन असणारीच व्यक्ती नेमावी, राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत, त्यात महाविकास आघाडीतदेखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची … Read more

साईमंदिरासमोर गार्डन विकसित होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून साईमंदिरासमोर असलेल्या नगर-मनमाड रोडलगतच्या त्रिकोणातील मोकळ्या जागेत भव्य असा बगिचा, लहान मुलांना गार्डन आणि भव्य अशी कोरीव व अप्रतीम साईबाबांची मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती … Read more

एकाच पावसात रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाचे काम ठेकेदारामुळे रेंगाळल्याने मार्गाच्या ठिकाणी एकाच पाऊसात पाणी साठले आहे. सदर ठिकाणी त्वरित पाणी निचरा होण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम पूर्ण नसताना २७ एप्रिल २०२१ पासून कायमस्वरूपी रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय रेल्वे … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या पाच वर्षांत शिर्डीत रोज विश्वस्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्याही जाहीर होत आहेत; मात्र महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्वस्त मंडळ जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येणार, अशी चर्चा जोरदारपणे … Read more

युवकाच्या निधनानंतर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्यासमोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले. यानंतर पोलिसांनी संबंधित विहीरमालकांवर गुन्हा दाखल केला. घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे. विहिरीतील मोटार काढण्यासाठी शिवाजी … Read more

वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस दल आणि … Read more

वारकऱ्यांना पायी दिंडीस परवानगी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शासनाने वारकऱ्यांना पायी दिंडी परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी जिल्हाध्यक्ष रामकिसन महाराज तापडिया यांच्यासह संत मंडळींनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनास वेळोवेळी मंदिर, भजन, कीर्तन, कार्यक्रम आदींवर शासकीय बंदी ठेवून त्यास सहकार्य केले असताना आता लॉकडाऊन उघडूनदेखील पायी दिंडीस परवानगी नाकारल्यानेे वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत … Read more

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होय,आम्ही सर्टिफाईड गुंड…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकरणी माहीम पोलीस स्थानका गुन्हा देखील दाखल … Read more

दीड वर्षापासून बंद असलेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची दुरावस्था

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दीड वर्षानंतर सुरु झालेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये मोठी दुरावस्था निर्माण झाली असताना तातडीने या जॉगिंग पार्कची स्वच्छता करुन, सर्व सोयी सुविधा पुरविण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन … Read more

कोरोना काळात मुख्यालयी न थांबणार्‍या अधिकारी, कर्मचारींवर कारवाई होण्यासाठी उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाच्या संकटात नेमणुक असलेल्या मुख्यालयी उपस्थित न राहणार्‍या नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल लोकेशन तपासून यामध्ये दोषी आढळणार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले. तर या तक्रारीवर कार्यवाही होत नसेल तर जिवंतपणीच शरीर दान घेऊन … Read more

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची निमगाव वाघा व नेप्ती ग्रामस्थांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- बिबट्यामुळे नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती गावात दशहत निर्माण झाली असताना, तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी निमगाव वाघाचे ग्रामपंचयत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, … Read more

गुरु अर्जुन देवजी यांनी धर्म व सत्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- धर्मासाठी बलिदान देणारे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिद दिवसानिमित्त जी.एन.डी. (गुरुनानक देवजी) सेवा ग्रुपच्या वतीने तारकपूर येथे नागरिकांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सरबत व प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राज गुलाटी, संजय आहुजा, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आज थोड्या प्रमाणात वाढली आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळत होते त्यात आता वाढ झालीय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 679 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला दुर्गगती न्यायालयात चालविण्यात यावा !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला दुर्गगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री व गृहमंर्त्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे. जरे यांची दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी गळा चिरून निघृर्ण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळ … Read more

इलाक्षी शोरुम समोरुन दुचाकी वाहन चोरीला

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी शोरुम समोरुन सोमवारी (दि.14 जून) शिक्षकाची बजाज पल्सर दुचाकी चोरीला गेली. साजिद लालासाहेब पठाण (रा. उक्कडगाव, ता. नगर) हे शिक्षक असून, कामानिमित्त ते इलाक्षी शोरुम मध्ये आले होते. ते परत घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची बजाज कंपनीची पल्सर 150 एमएच16 सीएन 9689 नंबरची काळ्या रंगाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात लग्नसंभारभ करताय.. मग ही गोष्ट नक्की करा..

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- लग्न व इतर समारंभ करताय तर पोलीसांची परवानगी घ्या नाही तर जेलची हवा खावी लागेल.राहुरीच्या तहसिलदारांनी राहूरी तालुक्यातील ग्रामपंचायत व नगर पालिका क्षेत्रात लग्न सभारंभ अथवा इतर कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश आज दिनांक 14 जून रोजी राहूरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी पारीत केला आहे. कोरोना … Read more