धक्कादायक ! बेपत्ता भाजी विक्रेत्याचा मृतदेह आढळला नदीच्या पात्रात

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावानजीक नदीच्या पात्रामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी चौकशी केली असता तो पढेगाव येथील भाजी विक्रेता शंकर उत्तम गलांडे वय ३१ असल्याची माहिती समजली. भाजींच्या पिशव्यांसह त्याची दुचाकी परिसरात आढळून आली असून गेल्या ३ दिवसांपासून तो घरी आला नव्हता असे कुटुंबीयांनी … Read more

आरोग्य अधिकारी बोरगे यांची मनपा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- बर्थडे पार्टी… तसेच कोरोना काळातील निराशाजनक कामगिरी मुळे वादाचे केंद्रबिंदू बनलेले मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मात्र कोविड काळात आपल्याला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पडल्या आहे. तसेच मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत … Read more

धक्कादायक ! कुकडी नदी पात्रात दोन तरुण बुडाले

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावामध्ये कुकडी नदी पात्रात दोन तरुण बुडाले होते. यामध्ये मनसुक मारुती मोरे (वय वर्ष ३९ रा. रांधे ता. पारनेर) याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर त्याचा मोठा भाऊ पोपट मारुती मोरे (वय ४२) याला वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

अनलॉक होताच नागरिक बेभान… अखेर प्रशासन उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अनलॉक नंतर पाथर्डी शहरातील बाजार पेठेतील दुकानासह रस्तावर विनाकारण फिरून गर्दी करणाऱ्या लोकांवर तालुका प्रशासनने कारवाई करायला सुरुवात केली आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य बाजार पेठेत दुकानात विना मास्क असणारे , विनाकारण गर्दी, दुचाकीवरून हिरोगिरी करत फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. नुकतीच अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. पाथर्डी … Read more

अकोलेकर जनता हा अन्याय सहन करणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- प्रस्तावित नाशिक-पुणे सेमी हायस्पिड रेल्वेचा मार्ग अकोले तालुक्यातून प्रस्तावित असताना खर्चात वाढ करून तो संगमनेर तालुक्यातून नेण्यात आला. ही बाब आदिवासी व दुर्गम अकोले तालुक्यावर अन्याय करणारी आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पिड रेल्वेचा मार्ग अकोले तालुक्यातून प्रस्तावित असताना बदलला कसा? असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी कोणत्याही जनआंदोलनाची … Read more

एसटी बसचे रुतलेले आर्थिक चाक धावणार; राज्य सरकार एसटीला देणार 600 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  कोरोनामुळे एसटी बसचे आर्थिक चाक गेल्या अनेक दिवसांपासून रुतलेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणेही महामंडळाला कठीण होऊन बसले होते. मात्र यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला ६०० कोटी रुपये … Read more

मुंबईत रेड अलर्ट; आगामी काही दिवस मुसळधारचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- मुंबईत दाखल झालेला मॉन्सून रौद्ररुप धारण करत असतानाच आता मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढचे चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपर्यंत मुंबईल पावसाने झोडपले आहे. अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस आहे. … Read more

लॉकडाऊन शिथील झाला तरी नियमांचे पालन करा…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- लॉकडाऊन शिथील झाला असला, तरी व्यापाऱ्यांसह नेवासकरांनी सुरक्षेच्या दृष्टीने शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले आहे.याबाबत पत्रकात गर्कळ यांनी म्हटले, की लॉकडाऊनच्या कालावधीत नियम तोडणाऱ्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली. नेवासा शहरातील व्यावसायिकांनी जनता कफ्र्युसह लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. वेळेनुसार दुकानेही बंद केली. … Read more

नगरसेवकच झाला ठेकेदार आणि बिघडला कारभार…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नगरसेवकच ठेकेदार झाल्याने राहुरी नगर परिषदेचा कारभार बिघडला असून शहराचा विकास या नावाखाली सत्ताधारी मंडळीकडून स्वत:चा विकास होत असल्याचा आरोप परिवर्तन मंडळाचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केला. परिवर्तन मंडळाच्या वतीने रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राहुरी नगर परिषद प्रशासनाला विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीत निषेध करण्यात आला. साईबाबांच्या नावाचा वापर करून सुरू असलेल्या चुकीच्या कामांचा तातडीने बंदोबस्त करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना देण्यात आले. बैठकीला … Read more

‘ते’ तीन दुकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून सील

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल अचानक कोल्हार मार्केटमध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन व्यावसायिकांची दुकाने अनिश्चित काळासाठी सील केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले, कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षिरसागर व जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे हे शिर्डी येथे जात असताना त्यांनी काल (मंगळवार) … Read more

महाराष्ट्र सरकारने धार्मिक व पर्यटन स्थळे तात्काळ खुली करावी

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महाराष्ट्रात अनलॉक सुरू झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अस्थापने, दुकाने खुली करण्यात आली आहेत. तरी महाराष्ट्र सरकारने धार्मिक व पर्यटन स्थळे तात्काळ खुली करावी, अशी मागणी शिर्डी शहरातील उद्योजक मनोज रतीलाल लोढा व सतीश गंगवाल यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात लोढा व गंगवाल यांनी म्हटले, की शिर्डीतील … Read more

नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी ‘ह्या’ गावांतील जमीन होणार संपादित !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. या मार्गासाठी ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी या दोन गावातील जागेची मोजणीही पूर्ण झाली … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मनमाड हायवे लगत नांदगाव येथे जेसीबीच्या फटक्याने फुटली. त्यामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आज पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला उद्या तर उद्या पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला परवा पाणी मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.अमृत योजनेअंतर्गत अहमदनगर शहरासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम जेसीबीने सुरु … Read more

नगरकरानो इकडे लक्ष द्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहरात सक्कर चौक ते स्टेट बँक चौक नगर-पुणे महामार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. जे काम चालू आहे त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी जागा आहे. मात्र ही जागा कमी रुंदीची असल्याने व रस्त्यावर खड्डे देखील जास्त प्रमाणात झालेले आहे. संपूर्ण रस्त्यावर पावसाने चिखल साचले आहेत. या रस्त्याने जाताना … Read more

श्रीगोंदे पोलिसांनी वसूल केला साडेसोळा लाख दंड !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकेबंदी, पेट्रोलिंग करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या तब्बल ३ हजार ९१४ व्यक्तींवर गुन्हे दाखल करत १६ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले … Read more

शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- पिकात जनावरे चारण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारीची घटना तालुक्यातील खडांबे खुर्द येथे घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंंबातील लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला व कुटुंबातील सदस्य शेतात काम करत असताना अमोल साळवे हा जनावरे चारण्यासाठी घटनास्थळी आला होता. संबंधित महिलेने पिकात जनावरे चारू नकोस असे म्हटल्याचा राग … Read more

सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांची खंडणी…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका भामट्याने अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन … Read more