अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी पुरुषाचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव परिसरात सोमवारी दुपारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. याबाबत घारगावचे पोलिस पाटील सतीश निंभोरे यांनी बेलवंडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा मृतदेह शहीद अंबादास पवार पेट्रोल पंपाच्या शेजारी लालासाहेब भाऊसाहेब पानसरे यांच्या शेतात सापडला. मृत व्यक्तीचे शरीराचा बांधा सडपातळ आहे. रंग काळासावळा आहे. … Read more

आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नागापूर, बोल्हेगाव परिसरात फेज २ पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, पाणी सोडण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी येत्या आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक अशोक … Read more

बाळ बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरूद्ध दोषारोप

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र काल मंगळवारी दि.८ पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असून ४५० पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र आहे. यामध्ये बाळ बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरूद्ध दोषारोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच आरोपी बोठे … Read more

कोरोनाच्या लसीसाठी जनतेने पैसे का मोजावे?

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- ग्रेसने मंगळवारी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याच्या केंद्राच्या घोषणेवर संसदेत स्पष्टीकरण मागितले. ‘मोदी सरकार डेडलाइन नव्हे, तर हेडलाइनवर चालते. या सरकारने डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याच्या आपल्या धोरणावर संसदेत स्पष्टीकरण द्यावे. त्याचा रोडमॅपही सादर करावा’, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘नागरिकांनी खासगी रुग्णालयांत लसीसाठी पैसे का मोजावे?’, असा सवालही काँग्रेसने … Read more

रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, या खराब रस्त्यामुळे अनेक प्रवासी, वाहनचालक या रस्त्याने प्रवास करणे देखील टाळत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांनी दिला … Read more

५ मिनिटांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळे तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- उत्तर प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाने ‘मॉक ड्रिल’च्या नावाखाली ५ मिनिटांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळे तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची गंभीर बाब मंगळवारी उजेडात आली आहे. गत २६ एप्रिल रोजी ही घटना घडली. पण, त्याचा एक व्हिडिओ आता उजेडात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी राज्यातील … Read more

मनपा दक्षता समितीने वसूल केला इतका दंड !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपा दक्षता समितीने ६ लाख ६३ हजार ७०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. १६ मार्च ते ६ जून दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत अवघे 499 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही देशात पुणे शहर हॉटस्पॉट ठरले. पण, दोन्ही वेळी लाटेच्या तीव्रतेचा अंदाज प्रशासनाला आला नव्हता. संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच पुण्यातील सांडपाण्यातही कोरोना विषाणूचे अंश आढळून आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल … Read more

राज्यात लवकरच सत्तांतर होणार – उदयनराजे

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट म्हणजे राजकीय तडजोड आहे आणि या भेटीतून सत्तांतर होणार असून यातून देवाण-घेवाण होणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान, खा. उदयनराजेंनी केलेल्या या राजकीय भाष्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले … Read more

शिवाजी महाराज व त्यांचे वंशज मराठा समाजासाठी सर्वोच्च

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  आखिल विश्वाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी आहेत, असे प्रतिपादन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी केले. शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा झाला. सुमित कोल्हे यांनी रविवारी कोपरगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण … Read more

….दमदाटी करून त्याने मला जवळ ओढले व सोप्यावर ढकलले

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नगर मध्ये घडली आहे. नगर शहरातील एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील अनिल निवृत्ती बागूल या इसमाविरूद्ध … Read more

सावधान ! राज्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारू विक्रीला विरोध करणाऱ्या तरुणाचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अकोले तालुक्यात अवैध दारू विकणाऱ्यास विरोध करत असल्याच्या कारणावरून रविवारी (६ जून) रात्री खडकी बुद्रूक येथील काळू भगवंता बांडे (वय ३०) या कार्यकर्त्याच्या डोक्यात लोखंडी पाइप काठ्या, गजाने मारहाण करून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांनी घरात घुसून खून केला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत येथील … Read more

अखेर खरे कारण आले समोर ! या कारणामुळे झाली रेखा जरे यांची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले … Read more

बर्थडे भोवला ! मनपा आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लॉकडाऊन मध्ये बर्थडे साजरा करणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच भोवले आहे. बोरगे यांना मनपा आयुक्तांनी अखेर सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. बोरगे गेले अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरत होते. यातच कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी असताना डाॅ. बोरगे हे अनेक बाबीत अपयशी … Read more

नागरिकांचे रक्षण करणारी खाकी कोरोनाच्या विळख्यात; दुसऱ्या लाटेत 10 जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने कहर केला आहे. यामुळे लॉकडाऊन,, कठोर निर्बंध, नाकाबंदी यासाठी खाकी नेहमीच ऑन ड्युटी कार्यरत असत. मात्र नागरिकांचे रक्षण करता करता खुद्द पोलीस विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये आतापर्यंत 15 पोलिसांचा मृत्यू झाला असून सर्वांधिक 10 मृत्यू करोनाच्या दुसर्‍या … Read more

मायलेकीला मारहाण करत चोरटयांनी सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढू लागली आहे. सतत चोरी, दरोडा, लूटमार अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र या घटनांना रोख लावण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी अज्ञात चोरटयांनी घरात घुसून माय-लेकीला मारहाण करून घरातला ऐवज लंपास … Read more