तीन दिवसात राहुरीत चारशेहून अधिक बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाची विक्रमी आकडेवारी दरदिवशी समोर येत आहे. वाढती आकडेवारी प्रशासनासाठी चिंतादायक ठरत आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा कहर जरा जास्तच पाहायला मिळत आहे. राहुरी तालुक्यात दररोज करोनाबाधितांची संख्या शतकापार झळकत आहे. गेल्या 72 तासात राहुरी तालुक्यात 420 … Read more

काळे- कोल्हे कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-साखरे बरोबरच अनेक उपपदार्थांची निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या काळे व कोल्हे सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करून तालुक्याला दिलासा द्यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की , कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कै … Read more

चीन म्हणतो, कोरोनाच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी तयार

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवांचे शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या संकटाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी आपण तयार आहोत, असे भारताविरोधात वेगवेगळे कट रचणाऱ्या चीनने म्हटले आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. … Read more

‘१३ जणांना मृत्युच्या खाईत लोटणाऱ्या हॉस्पिटलच्या अग्नि सुरक्षेची चौकशी करा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला. या १३ जणांना मृत्युच्या खाईत लोटणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. “विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास … Read more

कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्री गडाखांनी दिला महत्वपूर्ण आदेश

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिंगणापुरात तत्काळ १०० बेड्सचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे असे आदेश जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला दिले आहे.यामध्ये ४० ऑक्सिजन बेड्स, ८ आयसीयू बेड्सची सुविधा असणार आहे. शिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या … Read more

शेतीच्या पाण्यासाठी बळीराजा आक्रमक; जलसंपदा मंत्र्यांच्या घरमोसर आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे, या प्रमुख मागणीसाठी कुकडी पाटपाणी कृती समितीच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सुटेल, असे आश्वासन पाटील यांचे मुख्य सचिव बाळासाहेब देशमुख यांनी दिले. यावेळी कुकडी पाटपाणी कृती समितीचे … Read more

दहशतवाद्यांचे कायमच लक्ष्य राहिलेल्या ‘या’ शहरात सापडले तब्बल दोन हजार किलो आरडीएक्स

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-दहशतवाद्यांचे कायमच लक्ष्य राहिलेल्या मुंबईत तब्बल दोन हजार किलो आरडीएक्स सापडले. दहशतवाद्यांनी मागील काही वर्षांत विविध ठिकाणी आरडीएक्स किंवा टीएनटीसारखी स्फोटके दडवून ठेवली होती. त्याखेरीज अशा प्रकारची अनेक स्फोटके पोलिसांनी अटकेत असलेल्या दहशतवादी संबंधितांच्या चौकशीतून हुडकून काढली होती. अशा सर्व न फुटलेल्या संबंधित स्फोटकांचे वजन तब्बल दोन हजार किलो … Read more

नालेगाव अमरधाम पाठोपाठ शहरातील या ठिकाणी होतायत रुग्णांवर अंत्यविधी

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला असताना, दररोज मोठ्या संख्येने कोरोनारुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरात दररोज कोरोनाने मृत झालेल्यांच्या मृतदेहांचे खच पडत आहेत. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत असताना दररोज ४५ पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहेत. … Read more

विरार मध्ये मृत्यूतांडव : एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला पहाटे ३ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी … Read more

आमदारांनी दिलेला शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान आ. लंके यांनी मतदारसंघातील नागरिकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले होते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आश्‍वासनही लंके यांनी दिले होते. दरम्यान आमदार लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर केला आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला, अशी … Read more

भाजप आमदार म्हणतात, अदर पुनावाला डाकू

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत ताब्यात घेतली पाहिजे, असे ट्वीट गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी केले आहे. कोव्हिशिल्ड लसीची किंमत सीरम इन्स्टिट्यूटकडून ठरवण्यात आल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी हे ट्विट … Read more

दुकाने बंद असल्याने छोटे विक्रेते उपाशी, अन‌्‌‌ दारूवाल्यांना मात्र पैसे कमवायला परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- गरीब हातगाडीवाले छोटे विक्रेते हे उपाशी मरत असताना त्यांना कोरोनाच्या नावाखाली दुकाने बंद ठेवायला लावणार आणि दुसरीकडे श्रीमंत दारूवाल्यांना मात्र पैसे कमवायला परवानगी देणार, हा भेदभाव संतापजनक आहे. कुटुंबाची बचत कायम राहण्यासाठी तरी घरपोच दारू देण्याचा निर्णय निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी दारूबंदी चळवळीचे राज्य समन्वयक हेरंब … Read more

पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण दिनाजपूर भागातील एका सभेत जनतेला संबोधित करताना कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. देशभरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या महत्वपूर्ण घोषणेमुळे पश्चिम … Read more

महिलेची पुलावरून उडी मारुन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- महिलेने प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरातील नवीन नगररोड परिसरातील पाठक हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या रोहिणी भगवान काळे (वय ५६) ही महिला सकाळी घराच्या बाहेर पडली होती. घरातील कचरा टाकण्याचे निमित्त करून सदर महिला घराच्या बाहेर गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरालगतच्या प्रवरा नदी … Read more

देवदत्त ! ऑक्सीजन सिलेंडर पोहचवण्यासाठी चक्क त्याने 23 लाखांची गाडी विकली

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटमय काळात ऑक्सीजनची कमतरता जीवनासाठी संकट ठरत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाला ऑक्सीजनच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा एक व्यक्ती गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. मुंबईत राहणार्‍या शाहनवाज शेख यांनी मृत्यूच्या दाढेखाली चाललेल्या लोकांना नवे जीवन देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे … Read more

लसीकरण मोहिम : अशा प्रकारे करा नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार हे लसीकरण येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी २४ तारखेपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही लस घ्यायची कुठे, त्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे असे अनेकांना प्रश्न पडले … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात निर्माण झालीये ऑक्सिजन टंचाई

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरामध्ये ऑक्सिजन टंचाई सूर आहे त्यापाठोपाठ आता संगमनेरातही ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. संगमनेरातील खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये पुढील काही तांस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या जवळपास साडेतिनशे रुग्णांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २१ हजारांच्यावर रुग्ण सध्या उपचार घेत … Read more

आ.लंकेना कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष करा, सेनेच्या ‘ या’ नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्णांची सेवा करण्यात आ.निलेश लंके यांचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यासाठी वेळ नसल्याने पारनेरचे आ.लंके यांना जिल्हा कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे. जिल्हाप्रमुख झावरे यांनी म्हंटले … Read more