कुक्कुटपालकांना ३.७६ लाख रुपयांची नुकसान भरपाई

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील कुक्कुटपालकांना ३ लाख ७६ हजार ४० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली. तुकाराम ठाणगे यांना १ लाख ८० हजार, शिवाजी पायमोडे यांना १ लाख २० हजार, शैला हुलावळे यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकाला लुटले !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास सोमवारी पहाटे मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी सुपे (तालुका पारनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर … Read more

शहर बनतेय चोरट्यांचा अड्डा; दिवसाढवळ्या चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व असलेल्या नगर शहरात पोलिसांचा दरारा कमी होऊ लागला आहे. दिवसाढवळ्या खून, जबरी चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत असून, अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असून, नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना बळावू लागली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यावर कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य … Read more

जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. तसेच नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्याच कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान सोमवारी १०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ७४ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १०९१ जणांवर शासकीयसह … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीसह अल्पवयीन मुलास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एका आरोपीस व एका अल्पवयीन मुलास शेवगाव पोलीसांनी सोमवारी (दि.8) जेरबंद केले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोनोशीवरून नांदूरकडे जाणार्‍या रस्त्यावरील खंडोबा मंदिर जवळील लिंबाच्या झाडाखाली बाबासाहेब दादाबा ढाकणे (वय 27, रा. भारजवाडी, तालुका पाथर्डी) व एका अल्पवयीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा मृतदेह गटारीत आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान रामचंद्र नेहे (६५) या वृद्धाचा मृतदेह रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द येथे गटारीत आढळला. मृतदेह कुजल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. नेहे भिक्षा मागून मिळेल ते खात. त्यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पाटील किरण उत्तम गुंजाळ यांच्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात … Read more

गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. … Read more

सरकारी वाहनचालकास बेदम मारहाण करून लुटले! ‘या’ महामार्गावरील घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- नगर महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे गजानन पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेला वाहन चालक अरुण गौतम भोले यास दि . ८ रोजी पहाट ४ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना म्हसणे शिवारात घडली . याबाबत सविस्तर असे की, सरकारी वाहन (क्र एमएच ०३ डीए ७०८१ ) … Read more

जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बोरुडे यांचा केला गौरव

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  सामाजिक चळवळीत योगदान देत गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेले जलसंपदा विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे या विभागाचे भूषण ठरले आहे. एक सरकारी कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोर-गरीब वंचितांसाठी आरोग्य चळवळ चालवतो हे पाहून भारावलो आहे. ईश्‍वराने दिलेले आयुष्य वंचितांना मदत करण्यासाठी असून, या भावनेने बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेले … Read more

नगर औरंगाबाद रोडवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  भरधाव वेगातील कारचालकाने कारच्या समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागुन जारोची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली अनिता नानासाहेब चौधरी (वय ५० वर्षे रा.ढवळपुरी ता.पारनेर) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळ घडली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणातील फरार आरोपीस अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  शिर्डी येथे झालेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील आरोपी असलेला व कोरोना रजेमुळे जेलबाहेर असताना हत्येचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपी विशाल कोते याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोते … Read more

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उध्यक्ष प्रविण शेलार, युवकचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, उध्दव इंगळे, … Read more

आ.राजळे यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आ.मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.राजळे यांनी अर्ज दाखल करतानाच बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. सर्वाधिक ठराव … Read more

तिळगुळाच्या माध्यमातून विश्वासाचा गोडवा निर्माण होतो’

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- विकासकामाबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे. सण-उत्सवामध्ये मतदार संघातील जनतेला बरोबर घेऊन सणांचा आनंद द्विगुणित केला आहे. गेली २५ वर्षांपासून दिवाळी-पाडवा व मकर संक्रांतिनिमित्त हळदी- कुंकुवाच्या कार्यक्रमाद्वारे महिलांना एकत्र आणण्याचे काम केले जाते. यामाध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होते. तिळगुळाच्या माध्यमातून विश्वासाचा गोडवा निर्माण होतो. … Read more

कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून भिंगारला नगरपालिका स्थापन करा 

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी. अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रिसिडेंट ॲड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विषारी औषध! ‘या ‘तालुक्यातील दुर्दैवी घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  एकीकडे दिल्लीत कृषी कायदे मागे घेण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शेतमाला अत्यल्प दर मिळत असल्याने झालेला खर्च देखील हातात पडत नाही. त्यामुळे परत एकदा कर्जाला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. याबाबत सविस्तर असे की, शेवगाव तालुक्यातील एरंडगाव … Read more

तपोवन रोड येथील संचारनगर येथे निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  कोरोनाच्या संकटकाळात नागरिक आरोग्याप्रती जागृक झाले. तर आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळले. प्रदुषणमय वातावरणात श्‍वसनाचे अनेक आजार नागरिकांना जडत असून, श्‍वसन तंत्र बलवान बनविण्यासाठी भश्रीका प्राणायाम अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब निमसे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने तपोवन रोड येथील संचारनगर माऊली … Read more

वारुळाचा मारुती परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- शहरातील वारुळाचा मारुती येथील नागरिकांना अनेक वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या टंगळ-मंगळ अनागोंदी कारभाराचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. शहरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून महापालिकेने 2016 साली वारुळाचा … Read more