Ahmednagar District New MIDC : राम शिंदेनी स्पष्टच सांगितलं एमआयडीसी दलालांच्या फायद्यासाठी नाही !

कर्जतमध्ये होणारी एमआयडीसी जनतेच्या फायद्यासाठी होईल, दलालांच्या फायद्यासाठी नाही, आगामी आठ दिवसांत तालुक्यातील सहा जागांची पाहणी करून शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल, शेतकऱ्यांनी कोणालाही जागा विकू नयेत, असे आवाहन आ. प्रा. राम शिंदे यांनी केले. तहसील कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.तालुक्यात एमआयडीसी करण्याचा प्रश्न अत्यंत प्रतिष्ठेचा बनला … Read more

रस्त्यांच्या कामांसाठी ४५० कोटी मंजूर आमदार निलेश लंके

पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली आहे.या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने देवीभोयरे फाटा, पारनेर, सुपा, सारोळा, खडकी रस्त्यासाठी ३६० कोटी रुपये, पारनेर, बाबुर्डी, विसारपूलासाठी ७ कोटी ५० लाख रुपये, कान्हुर पठार, वेसदरे ते वडझिरे, चिंचोली, सांगवी सुर्या ते जवळा रस्ता, रेनवडी, चोंभूत, वडनेर … Read more

विखे-थोरातांचा संघर्ष नव्या वळणावर ! अहमदनगरमधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण व राजकारणाचे विविध पैलू हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नगर उत्तरेचे राजकारण जर पाहिले तर मंत्री राधाकृष्ण विखे व आ. बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत राहिले. दोघेही आपल्या स्थानी दिग्गज. अहमदनगरमधील दिग्गजांच्या यादीत या दोघांचेही नाव अदबीने घेतले जाते. परंतु वैयक्तिक दृष्टया हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी. हे काँग्रेसमध्ये एकत्र … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाच्या पदाधिकारी निवडी अजित पवार गटाच्या मर्जीने होणार? अहमदनगरमध्ये ‘राज’कारण रंगले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी देखील शरद पवार गटातून अजित पवार गटात केले. पण अनेक निष्ठावंत मात्र शरद पवारांसोबतच राहिले. परंतु आता या निष्ठावंतांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे अकोलेतील पदाधिकारी निवडी. राष्ट्रवादी बंडानंतर डॉ. किरण लहामटे हे आधी अजित … Read more

Ahmednagar Politics : विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी !

Ahmednagar Politics

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगला भाव मिळेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी ‘गणेश’ चे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी, अशी टीका गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न … Read more

लोकसभेसाठी ‘शिर्डी’त शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची भाऊगर्दी ! आता ‘या’ बड्या नेत्याने केला उमेदवारीवर दावा,राजकारण तापणार

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यांसुर अनेक पक्ष पक्षबांधणी,जनसंपर्क आदी कामांत गुंतले आहेत. येणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार हे नक्की. अहमदनगर जिल्ह्याची दक्षिणेची उमेदवारी जशी चर्चेत आहे. तशीच शिर्डीत शिवसेना (ठाकरे गट) यांची स्थिती झाली आहे. येथे लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते बबन घोलप यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा … Read more

नगरकरांनो तुमच्या भागातील रस्त्यांचे कामे का रखडलीयेत ? हे घडतंय राजकारण..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह काही उपनगरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. अनेक भागात अर्धवट रस्ते तसेच राहिले आहेत. वरील सत्ताधाऱ्यांच्या स्थगिती राजकारणाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महाविकास आघाडी सरकारने नगर शहरातील विविध विकास कामांसाठी ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता परंतु सत्तांतर झाले आणि या मंजूर निधीला शिंदे सरकारने स्थगिती दिली. दरम्यान ७ डिसेंबरला … Read more

विखे हेच मुख्यमंत्री होणार होते, राष्ट्रवादीचाही होता हिरवा कंदील ! ‘या’मुळे खेळ फिस्कटला

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरमागरम झाल आहे. आगामी लोकसभेच्या हिशोबाने प्रत्येक जण फिल्डिंग लावताना दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुका होतील. त्याअनुशंघाने देखील आता राजकीय वातावरण चांगलेच आपले आहे. आगामी धोरणानुसार सगळेच फिल्डिंग लावू लागले आहेत. परंतु सध्या यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव जास्त चर्चेत येऊ लागले … Read more

MP Sadashiv Lokhande : खा. लोखंडेंनी घेतला नगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा आढावा

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अहमदनगर ते सावळीविहीर रस्त्याच्या कामाविषयी आढावा घेतला. नगर- मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी कृती समितीच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात वर्षाश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार … Read more

ज्यांचे डोके ठिकाणावर नाही त्यांच्यावर इलाज करु – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा डॉ. खासदार असल्यामुळे या भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी विकासाचे दिलेले आश्वासने पूर्ण केले आहे. शहरातील उड्डाणपूल, नगर करमाळा रस्ता, शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, नवीन वर्षांत त्यांचे लोकार्पण होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी नगर बदलतंय हा नारा दिला असून, ते खरेच आहे. … Read more

MP Sujay Vikhe : लष्कराने रस्ता बंद केल्याने नागरिकांचे हाल, खा. सुजय विखेंकडे मांडली निवेदनाद्वारे कैफियत

नगर जवळील दरेवाडी परिसरात असलेल्या हरीमळा या मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांच्या दळण-वळणासाठी असलेला नगरवाला रोड या नावाचा रस्ता लष्कराने तेथे गेट लावून बंद केल्याने हरीमळा येथील रहिवासी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्त करावेत अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे खा. सुजय विखे यांच्याकडे केली आहे.दरेवाडीच्या हरीमळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ३०० ते ४०० … Read more

दारूबंदीवरून आ. तांबेंनी सरकारला सुनावले ! ‘त्या’ दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आमदार सत्यजीत तांबे यांनी दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन संदर्भात सभागृहात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले. मोह फुलापासून दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले ? या कंपनीला सर्व परवानग्या कशा काय मिळाल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशीही मागणी आ. तांबेनी सभागृहात केली. … Read more

आठ दिवसात पाट्या बदला अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन

महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभुमीवर न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र आज … Read more

निळवंडेसाठी कोणी कष्ट घेतले, याची जाणीव ठेवा ! आमदार थोरातांनी सगळंच सांगितलं…

निळवंडे कालव्यांची कामे होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यांनी निळवंडेच्या कामात काडीचीही मदत केली नाही. उलट सातत्याने काड्या घालण्याचे काम केले. निळवंडेचे पाणी आणण्यासाठी कोणी कष्ट घेतले आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सर्वसामान्यांच्या समाधानाकरता राजकारण करायचे असते. मात्र, ते सुडाचे राजकारण करीत आहेत, हे चांगले नाही. याचा जनता नक्की जाब विचारेल, असे प्रतिपादन … Read more

Ahmednagar Politics : तीन महिन्यांत खासदारकीची स्वप्न बघू नका ! खासदार सुजय विखे स्पष्टच बोलले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जे विरोधात बोलतात त्यांची दया येते. आरोप प्रत्यारोप आपणसुद्धा करू शकतो. चार दोन जणांच्या गाठीभेटीने जिल्ह्याचा खासदार ठरत नाही. केवळ इच्छा असून, चालत नाही, त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात. कुरघोड्या नाही, फोडाफोडीचे राजकारण अवघड नाही. आज विरोधात बोलणारे उद्या गाडीत बसलेली दिसतात. कोण कधी काय करील, याचा नेम नाही. पदासाठी उतावीळ होऊ … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचे नेतेही सुजय विखेंच्या व्यासपीठावर ! अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेची लढाई प्रवरेच्या मैदनावरूनच होणार ? चर्चांना उधाण

Ahmednagar Politics : अहमदनगर हा राज्याचाच केंद्रबिंदू असतो हे जरी सर्वश्रुत असले तरी यावेळी मात्र राजकीय रंग कुणालाच कळेनात. त्याचे कारण असे की वरती विरोधात बसणाऱ्या पक्षांचे उमेदवार नगरमध्ये एकत्र तर एकत्र असणाऱ्या पक्षांचे उमेदवार परस्पर विरोधात बसलेले दिसतायेत. त्यातच आता लोकसभेच्या हिशोबाने विखे विरुद्ध कोण? अशा विविध चर्चा रंगत असतानाच आता एका घटनेने अहमनगर … Read more

‘नरेंद्र मोदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर अमित शहा येतील, तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे गृहखाते’

India News

India News : देशातील राजकारण सध्या वेगात फिरू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्याने विविध गणितांची जुळवाजुळव सुरु आहे. भाजप सध्या मोठा पक्ष असून भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कम्बर कशी आहे. दरम्यान २०२४ ला भाजपचं सत्तेत येईल. यावेळी प्रथम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण मध्येच ते पद सोडलातील. त्यानंतर ते राष्ट्रपती होतील. नरेंद्र … Read more

विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रम जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबवा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन विकसित भारत संकल्प यात्रा’ हा उपक्रम संपुर्ण देशभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वय राखत या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून उपक्रम यशस्वी करावा. या उपक्रमाद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more