राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणीएनसीबीने आज … Read more

निवडणुकांमुळे ‘या’ तालुक्यात वाहतोय दारूचा पूर

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदार राज्याला खुश करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. अशा गैरप्रकार पाहून नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. श्रीगोंदा … Read more

धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व सामाजिक न्यायमंत्री तसेच परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत तसेच वादात आले आहेत. रेणू शर्मा या गायिकेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप हा ट्विट करून केला आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्व … Read more

निळवंडे धरणाबाबत जलमंत्री जयंत पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-२०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. दरम्यान स्वातंत्र्यसैनिक सहकार … Read more

महापालिकेला कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करावी

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या स्थापनेपासुन महापालिकेला आत्तापर्यत कार्यक्षम आयुक्त न मिळाल्याने नगर शहराची वाताहात झाली आहे. नियोजनबद्ध विकासाचे व्हिजन असणारा सक्षम आयुक्त नगर शहराला मिळाले तर नगरचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही त्यासाठी कार्यक्षम आयुक्त नियुक्त करावा अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व … Read more

२५ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्हा नियोजन समितीची सभा दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सावेडी येथील माऊली सभागृहात ही बैठक होणार असून या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसुचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ … Read more

निमगाव वाघात निवडणुकीतील सर्वच उमेदवार आले एका छताखाली

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार वळणावर आल्या असताना, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडल्या जात आहे. गावाच्या निवडणुकीत कोणाचा पॅनल किंगमेकर ठरणार यासाठी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडली जात नाही. या निवडणुकीच्या रणशिंगात गावा-गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथे निवडणुकीतील सर्वच उमेदवार एका छताखाली … Read more

कृषी कायद्यांना स्थगिती देणार्‍या निर्णयाचे स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल न घेणार्‍या केंद्रातील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देऊन झटका दिला आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगरचे अनिल … Read more

निवडणुकीचे बिगूल वाजणार; जिल्हा बँकेसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी केले आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ४ जानेवारीला जिल्हा … Read more

व्हीआरडी स्थलांतराबाबत माजी खासदार दिलीप गांधींचे महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-व्हीआरडीई स्थलांतरीत होऊ नये यासाठी पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. सोमवारी रात्री राजनाथ सिंह यांनी मला फोन करून व्हीआरडीई स्थलांतरीत करणार नाही, असे आश्वासन दिले, अशी माहिती माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिली. यावेळी दिलीप गांधी म्हणाले … Read more

मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन … Read more

खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज … Read more

सुरक्षा कपात ! राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-  आपल्या भाषणांमुळे व आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुक्रक्ष व्यवस्थेत नुकतीच कपात करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच काही प्रमुख नेत्यांची देखील सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातच आता मनसे सैनिकांनी मनसे स्टाईल यावर … Read more

आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार एका एकाला; शिवसेना नेते बरसले…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये ईडी vs महाविकास आघाडी हा संघर्ष पाहायला मिळतो आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांची ईडीने चौकशी लावली आहे. ईडी हि संस्था भाजपासाठी काम करत आहे असा आरोप महाविकास आघाडी मधील नेते वारंवार करत आहे. सध्या ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी लावली आहे. या संदर्भात … Read more

पोकळ आश्वासनाला कंटाळून ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार घालणार

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्‍य निवडणूक आयोगाने राज्‍यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्‍ये अहमदनगर जिल्‍ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती यावेळी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अखेर ते होर्डिंग्स हटवले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग स्वत:च हटवण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी नेहरू पुतळा परिसरातील चार पैकी तीन अनधिकृत फलक हटवले. उर्वरित एक फलक मंगळवारी हटवण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात आंदोलन करण्यात आले होते. नेहरू पुतळा परिसरातील होर्डिंग … Read more

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कामगारांचा समावेश करा : घुले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. या बरोबरच राज्यातील सर्व माथाडी कामगार, कष्टकरी, हमाल-माथाडी यांना सुद्धा यावेळेस मोफत लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य हमाल मापाडी संघटनेचे सहचिटणीस अविनाश घुले यांनी केली आहे. … Read more

व्हीआरडीई स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविराम; खासदार डॉ. सुजय विखे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नगर येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबुतीकरण करण्याची ग्वाही व्हीआरडीईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी सांगितले. अहमदनगर येथील व्हीआरडीई संस्थेच्या … Read more