राजधानीत अग्नितांडव ; ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील अवैध फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीचे लोळ आणि प्लास्टिकच्या विषारी वायूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. बहुतांश मृत कामगार बिहारचे आहेत. आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत होते. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ६२ … Read more

एन्काउंटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

हैदराबाद – हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी चकमकीत ठार केले. एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटाविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. … Read more

संतापजनक:  म्हणून महिलेने स्वत: च्या 6 वर्षांच्या मुलीवर ओतले ‘पेट्रोल’

नवी दिल्ली : देशभर निविध समाज माध्यमातून  उन्नाव आणि हैदराबाद बलात्कार प्रकरणी रोष केला जात आहे. दिल्ली येथे मात्र  एक अजब घटना घडली.  सफदरगंज रुग्णालयाबाहेर एका महिलेने बलात्काराचा निषेध म्हणून स्वत:च्या 6 वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतले. रुग्णालय परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. उन्ना बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात नेत असताना . … Read more

सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी – खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर: नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी संसदेत केली. हिवाळी अधिवेशनात नियम १९३ अन्वये कृषी विभागावरील चर्चेत डाॅ. विखे यांनी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यात अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी; विम्याची … Read more

व्हाेडाफाेन आयडिया बंद हाेणार ?

नवी दिल्ली: Jio रिलायन्स कंपनीला नफा होत असताना मात्र व्हाेडाफाेन-आयडियाचा वाढता ताेटा कंपनीला कुलूप लावण्याच्या दिशेने घेऊन जात आहे. कंपनीचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्लांनी शुक्रवारी सांगितले की, मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारककडून दिलासा मिळाला नाही तर कंपनी बंद हाेऊ शकते. दूरसंचार कंपन्यांवरील कर्जाचा बाेजा इतका वाढला आहे की कंपनी चालवणे मुश्कील झाले आहे. या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या … Read more

महिला वेटरनरी डॉक्टरचा बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींचा असा झाला एनकाउंटर

हैद्राबाद: महिला वेटरनरी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी  एनकाउंटर केला. ही संपूर्ण घटना काल  सुमारे पहाटे 3 ते 6 दरम्यान झाली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यावर गोळी चालवली गेली. पोलिस कमिश्नर वीसी सज्जनर म्हणाले की, “रिमांडच्या चौथ्या दिवशी आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो, त्यांनी … Read more

घोटाळेबाजांनी देशाला लावला १७,९०० कोटींचा चुना

नवी दिल्ली : भारतात आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या एकूण ५१ लोकांनी १७९०० कोटी रुपयांची देशाची फसवणूक केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) सांगितले आहे की, आजपर्यंत ६६ प्रकरणांमधील ५१ आरोपी फरार असून, त्यांनी अन्य देशांत पलायन केले आहे. ठाकूर यांनी सांगितले … Read more

सिरॅमिक फॅक्ट्रीत एलपीजीचा स्फोट; १८ भारतीयांसह २३ जणांचा मृत्यू

 खार्तुम : सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये एलपीजी टँकरच्या झालेल्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १८ भारतीयांचा समावेश आहे. या आगीत १३० लोक जखमी झाले असून प्रारंभिक माहितीनुसार सात भारतीयांचा जखमींमध्ये समावेश आहे. सुदानची राजधानी खार्तुमच्या बाह्य भागात असलेल्या सेला सिरॅमिक फॅक्ट्रीमध्ये मंगळवारी हा स्फोट झाला. अद्याप १६ भारतीय बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. … Read more

बिगर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१९ च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तानातील बिगर मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी संसदेत हे विधेयक दाखल होऊ शकते. गेल्या कार्यकाळात मोदी सरकारने हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले होते. मात्र, … Read more

क्रिकेटर मनीष पांडे ‘या’ स्टार अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध

टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत  2 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाला. मुंबईतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मनीषचा विवाहसोहळा पार पडला.  मनीष पांडेने विवाहसोहळ्यात क्रीम कलरची शेरवानी घातली होती. तर अभिनेत्री आश्रिता शेट्टीने लाल रंगाची सिल्क साडी घातली होती. https://www.instagram.com/p/B5m-3qgnJFL/ आश्रिता शेट्टी ही दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील एक स्टार अभिनेत्री आहे. विराट कडून मनीष ला सुभेच्छा    … Read more

मोदी व शहा हे गुजरातहून दिल्लीत आलेले घुसखोर आहेत !

दिल्ली –  ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे घुसखोर आहेत, असा तीक्ष्ण प्रहार काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी रविवारी केला आहे.  देशावर सर्वांचा हक्क आहे. भारत कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा देश नाही. सर्वांना समान हक्क मिळाले असून, ‘एनआरसी’मुळे सामाजिक सौहार्द … Read more

गोव्यात राजकीय भूकंप घडविण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले ! 

पणजी : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी’ने एकत्रितपणे सरकार बनवीत नवा सत्ताप्रयोग केला आहे; परंतु महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप गोव्यात घडणार नाही, असा दावा करीत या संबंधित वृत्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाओ यांनी रविवारी फेटाळून लावले आहे. गोव्यात भाजपने घोडेबाजार करून सरकार बनविले आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी … Read more

‘माझ्या मुलाला फाशी द्या, किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका’ !

हैदराबाद : पशुवैद्यक महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर जाळून निघृर्ण हत्या करणाऱ्या ४ पैकी एका आरोपीच्या आईने आपल्या मुलालाही जिवंत जाळून टाकण्याची मागणी केली आहे.  ‘त्याला फाशी द्या,  किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका,’ असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत या प्रकरणाची … Read more

Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांना बसेल मोठा झटका !

वृत्तसंस्था :- एअरटेल, व्होडाफोननंतर आता रिलायन्स जिओने आपल्या दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. ‘रेट्स ऑल इन वन प्लान्स’मध्ये ही दरवाढ होणार असल्याचे जिओने सांगितले आहे. कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील. जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग … Read more

आरक्षण रद्द करण्याचा मोदी सरकारचा डाव !

नवी दिल्ली – मोदी सरकार संवेदनाहीन आणि मूकबधिर आहे. हे सरकार सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून आरक्षण रद्द करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळेच या सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनआंदोलनाची गरज आहे, असे मत अनुसूचित जाती-जमाती संघटनेचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार उदित राज यांनी रविवारी व्यक्त केले आहे. देशाच्या विविध भागांतून येथील रामलीला मैदानात जमा झालेल्या … Read more

ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार, मोबाइल बिल वाढणार

नवी दिल्ली : १ डिसेंबर २०१९ पासून अनेक नियमांत बदल होत असून याचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो. रविवारपासून कॉलसोबत इंटरनेटचा वापर महाग होऊ शकतो. वास्तविक, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल दरवाढीच्या तयारीत असून यात नेमकी किती वाढ होईल याबाबत कोणत्याही कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. याशिवाय विमा हप्ताही महाग होऊ शकतो. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या … Read more

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६२.८% मतदान ; नक्षल्यांनी पूल उडवला 

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. ६ जिल्ह्यांमध्ये १३ जागांसाठी ६२.८७ टक्के मतदान झाले. हे मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक मुरारी लाल मीणा यांनी सांगितले की, नक्षल्यांनी गुमला जिल्ह्यात विष्णुपूर भागात एक पूल स्फोटकांनी उडवला. यात कोणतीही … Read more