कांदा सडला..आणि शेतकरी रडला,कांदा उत्पादकांनी पावसापुढे टेकले हात!

संगमनेर : कांदा सडल्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहेत. डोळयादेखत हातातोंडाशी आलेल्या सेंद्री लाल कांद्याचे पीक परतीच्या पावसामुळे शेतामध्ये पूर्णपणे सडून गेले आहे.  त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांनी कस जगायचं? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.संगमनेर तालुक्याच्या पठार भागाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात आहे. वर्षानुवर्षांपासून येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती … Read more

अहमदनगर बाजारभाव : अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी, अधिक प्रमाणात सुरूच आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरीत परिणाम झाला आहे.  बाहेर गावाहून नगर बाजार समितीत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे. स्वाती नक्षत्राच्या सरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत बरसल्या. २४ … Read more

पीक विमा योजनेत पेरू च्या समावेशासाठी प्रयत्न

राहाता : हवामानावर आधारित पीक विमा योजनेत पेरू फळाचा समावेश होण्यासाठी कृषी आयुक्तांशी बोलून निर्णय करण्यास सांगू, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. राहाता तालुका राज्यात पेरू पिकाचे आगार मानले जाते. मागील काही वर्षात पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे पेरूच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. तालुक्यातील पेरूच्या शेतीचे अर्थकारणही मोठ्या … Read more

कोथिंबीरीच्या एका जुडीला कोंबडीच्या दरापेक्षा जास्त भाव !

नाशिक ;- बाजार समितीत कोथिंबीरीला तब्बल २८ हजार रुपये शेकडा दर मिळाला. एरवी कोथिंबीर दर न मिळाल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते; पण आज मात्र याच कोथिंबीरीला कोंबडीचा दर मिळाला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे झोडपणे सुरूच आहे. लाखो हेक्टरवरील पिकांना त्याचा फटका बसला असून, दिवसागणिक त्यात भर पडत असल्याने शेतकरी हबकला आहे. पावसामुळे … Read more

आ.मोनिका राजळे चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर !

अहमदनगर :- आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आ. राजळे यांचा लहान मुलगा कबीर यास डेंग्यू झाल्याने सध्या तो नगर येथे उपचार घेत आहे. त्या स्वतः सुध्दा आजारी असून सत्कार न घेता त्या चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर गेल्या. बाजरीच्या कणसाला आलेले मोड, शेतात … Read more

कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठली !

श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं?

राब.. राब.. राबून शेतात सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले, पण मान्सून हंगाम संपून गेल्यानंतरही पडत असलेल्या जोरदार पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे. आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मांडल्या. सेंद्री लाल कांद्याचे आगार म्हणून पठार भागावरील पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, … Read more

कांद्याने पुन्हा भाव खाल्ला @ 45?? !

नाशिक : परतीच्या पावसाने हाहाकार माजविलेला असल्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यात अतिपावसामुळे कांदा सडल्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी घेत प्रतिक्विंटल ४५८१ रुपये भाव गाठला आहे. परतीच्या पावसामुळे भाजीपाला महागलेला असताना कांद्याने पुन्हा भाव खाल्ल्यामुळे महिलावर्गासह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्याभरापासून परतीच्या … Read more

जिल्ह्यात चित्रा नक्षत्रांच्या सरी,रब्बीला दिलासा, शेतकरी खुश

अहमदनगर : सोमवारी लोकशाहीच्या उत्सावातील मतदान संपन्न होत आल्यानंतर जिल्ह्याच्या शिवारात चित्रा नक्षत्रांच्या सरींनी बरसातीचा उत्सव साजरा केला. अंतिम चरणातील चित्रांच्या सरींनी सोमवारी सर्वदूर हजेरी लावली.  ९७ पैकी ८० महसूल मंडलांत हजेरी लागतानाच कोळगाव व पारनेर या दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. बाकी उर्वरित १७ मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. रब्बी हंगामासाठी चित्रांच्या सरींनी दिलासा दिला. … Read more

कांदा दरात एक हजार रुपयांची वाढ

लासलगाव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर झालेल्या कांदा लिलावात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली.  शनिवारी २५०० रुपये सरासरी असलेला कांदा मंगळवारी ३५७० रुपये दराने विक्री झाला. मंगळवारी कांदा दरात तब्बल एक हजार रुपयांनी वाढ झाली.

कांद्यासाठी आंदोलन करणार्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

राहुरी – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून कांदा निर्यातबंदी केली. याच्या निषेधार्थ काल नगर – मनमाड रस्त्यावर राहुरी बाजार समितीसमोर अन्यायाच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाची प्रतिकात्मक तिरडीसह अंत्ययात्रा काढली. घोषणाबाजी केली व रस्त्यावर आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केला.  या प्रकरणी काल हे.कॉ.प्रविण मकासरे यांच्या फिर्यादीवरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे आंदोलक … Read more

हा घ्या पुरावा…भारतात येणारा कांदा पाकीस्तानचाच!

ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजपा सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातूनच केली आहे.  या संदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे भाजपा सरकार तोंडघशी पडले आहे. ३७० कलम, बालाकोट असे मुद्दे भाजपाच्या प्रचारामध्ये दिसत असले, तरी भारताने चक्क पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे … Read more

कांद्याला मिळाला ‘३९०५’ भाव

नाशिक : गेल्या आठवड्याभरापासून कांदा बाजारभाव वधारला असून, बुधवारी (दि.१८) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याने ३९०५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळवून उच्चांक गाठला आहे. कमीत-कमी २ हजार रुपये भाव मिळाला, तर कांद्याने सरासरी ३५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव गाठल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.  कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली असून, पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी (दि.१८) उन्हाळ कांद्यास जास्तीत … Read more

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास २५०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्यास १६०० ते २४९५, तीन नंबर कांद्यास ५०० … Read more

कांद्याला २२०० ते २७०० रुपये बाजारभाव

राहुरी: शहर वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर गुरुवारी एक नंबर कांद्याला २२०० ते २७०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १६०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबरला २००० ते २६०० रुपये, तर गोल्टीला १८०० ते २४०० रुपये भाव मिळाला होता. त्या तुलनेत वांबोरीत १०० रुपये भाव वाढले असले, तरी गोल्टीच्या … Read more

कांद्याच्या बाजारभावात ३०० ते ५०० रुपये घट

राहुरी :- अवघ्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी घट झाली. रविवारी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये क्विंटल भाव मिळाला. शुक्रवारी १९०० ते २४०० रुपयांप्रमाणे विक्री झाली होती. रविवारी ३२ हजार ९९ गोण्यांची आवक झाली. दोन नंबर कांद्याला १००० ते १५९०, तीन नंबरला २०० ते ९९५, … Read more

शेतकऱ्यांना चार कोटींचा डाळिंब पीकविमा मंजूर

कर्जत :- तालुक्यातील ४३४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटींचा व नगर जिल्ह्यातील ८ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटींचा पीकविमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर झाली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली. २०१७-१८ या वर्षात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत डाळिंब पिकासाठी पंतप्रधान फळपीक हवामान आधारित विम्याची रक्कम भरली होती. … Read more

कांदा, टोमॅटोला विक्रमी भाव

संगमनेर | येथील बाजार समितीमध्ये कांदा आणि टोमॅटोला विक्रमी भाव मिळाल्याने मोठी आवक सुरू आहे. रविवारी ८६८६ क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. लिलावात कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल १८५१ रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला १५०१ ते १८५१, दोन नंबरला ११०० ते १५०० व तीन नंबर कांद्याला ५०० ते १००० रुपये भाव मिळाला. … Read more