Maniyar Snake Species:- साप हा सरपटणारा प्राणी असून सापाला कुठल्याही प्रकारचे हात किंवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यामुळेच ते जमिनीवर नागमोडी आकाराने सरपटतात. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती असून त्यातील बहुसंख्य या बिनविषारी आहेत तर काही बोटावर मोजण्याइतक्या विषारी आहेत.
प्रत्येक सापाच्या प्रजातीचे त्यांचे त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असतात. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मानवी वस्तीत आढळून येणारे चार प्रमुख विषारी सापांचा विचार केला तर यामध्ये फुरसे, नाग, घोणस आणि मण्यार या जातींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
भारतामध्ये प्रामुख्याने घोणस सापाच्या दंशामुळे सर्वाधिक मृत्यू होतात. सर्पदंशांवर एक मात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष होय. याशिवाय सापाच्या दंशावर कोणताही दुसरा उपाय नाही. यामध्ये जर आपण मण्यार जातीच्या सापाचा विचार केला तर भारतामध्ये आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापांच्या जातींपैकी ही एक जात आहे.
या जातीचे साधा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळा मण्यार अशा तीन जाती आढळून येतात व यामध्ये आणखीन दहा उपजाती आहेत. विशेष म्हणजे मण्यार जातीच्या सापाचे विष नागाच्या विषापेक्षा 15 पट अधिक विषारी असते. या लेखांमध्ये आपण याच मण्यार जातीच्या सापाविषयी काही माहिती घेणार आहोत.
मण्यार जातीच्या सापाचे विष असते नागाच्या विषापेक्षा पंधरा पट जहाल
या जातीचा साप रंगाने निळसर काळा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. या सापाचा वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि त्याच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांमुळे तो पटकन ओळखता येतो. मण्यार जातीच्या सापाच्या डोक्याचा आकार त्रिकोणी असतो व तो अंडी घालणारा साप आहे.
या जातीच्या सापाच्या पिल्लांची लांबी 25 सेंटिमीटर तर पूर्ण वाढ झालेल्या मन्यार जातीच्या सापाची लांबी एक ते सव्वा मीटर पर्यंत असते. या जातीच्या सापाचे विष नागाच्या विषापेक्षा अनेक पटींनी अधिक जहाल व तीव्र असते. जर व्यक्तीला मण्यार जातीचा सापाने चावा घेतला तर या जातीच्या सापाच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर पटकन होतो. त्यामुळे व्यक्तीचे मेंदूचे कार्य अनियंत्रित होते व श्वास घ्यायला अडथळे येतात.
पोटात दुखायला लागते, घसा कोरडा पडतो व चावा घेतलेला व्यक्ती किंवा प्राणी बेशुद्ध पडतो अशा प्रकारचे लक्षणे दिसतात. जर या जातीच्या सापाने चावा घेतला व लवकर उपचार मिळाले नाही तर व्यक्ती किंवा प्राण्याचा मृत्यू होतो. म्हणजे मण्यार जातीचा साप हा निशाचर असून रात्रीच्या वेळेला तो त्याच्या भक्षाच्या शोधासाठी बाहेर पडतो.
त्यामुळे जर रात्रीच्या वेळी साप चावल्याची घटना घडली तर प्रामुख्याने तो चावा मण्यारचाच असल्याची शक्यता बळावते. या जातीच्या सापाचे वास्तव्य हे पडकी घरे तसेच अडगळीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी जास्त प्रमाणात असते. जर बाहेर थंडी जास्त प्रमाणात असेल तर तो उष्णतेकरिता घरात, बाथरूममध्ये घुसतो किंवा बाहेर अतिउष्ण वातावरण असेल तरीही थंडावा मिळावा याकरिता घरांचा आसरा घेत असतो.
मन्यार जातीच्या सापाचे मुख्य अन्न म्हणजे तो उंदीर, बेडूक तसेच पाली, सरडे व छोटे साप हे असते. प्रामुख्याने जेव्हा या जातीच्या सापावर पाय पडतो तेव्हाच हा साप चावल्याची घटना घडते. त्यामुळे मण्यार जातीचा साप चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. मन्यार जातीच्या सर्पदंशाचे वैशिष्ट्य म्हणजे कधी कधी हा साप चावला आहे हे देखील आपल्याला कळत नाही.