Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेत मानवरहित उड्डाणाची तयारी अंतिम टप्य्यात !

Ahmednagarlive24
Published:

Gaganyaan Mission :- चंद्रावरील यशस्वी लॅडिंगनंतर भारताने आपला मोर्चा आता पूर्णपणे महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या दिशेने वळवला आहे.या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मानवरहित उड्डाणाची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

ही चाचणी महिन्याच्या अखेरला घेतली जाण्याची शक्‍यता इस्त्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणीची सुरुवात केली जात आहे. यासाठी चाचणी यान ‘एबॉर्ट मिशन-१’ (टीवी-डी१ ) ‘ची तयारी सुरू आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सोशल माध्यमातून शनिवारी दिली.

मानवरहित उड्डाण चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परीक्षण यान हे एक विशेष रॉकेट आहे, जे खासकरून या मोहिमेसाठी विकसित करण्यात आले आहे. याच्या पेलोडमध्ये “क्रू मॉड्यूल’ (सीएम) आणि ‘क्रू एस्केप सिस्टम’ (सीईएस) सोबत वेगाने काम करणारे मोटर ‘सीएम फेयरिंग’ (सीएमएफ) आणि ‘इंटरफेस एडेप्टर’ सारखे उपकरण समाविष्ट आहेत.

सीएमसोबत सीईएसला जवळपास १७ किमी उंचीवर चाचणी यानापासून बेगळे केले जाईल. यानंतर सीएमला पॅराशूटच्या मदतीने समुद्रात उतरवले जाईल. श्रीहरिकोटा किनारपट्टीपासून जवळपास १० किमी दूर समुद्रात हे यान उतरवले जाणार आहे.

गगनयान कार्यक्रमांतर्गत चार चाचणी मोहिमांपैकी ही एक आहे‘‘क्रू एस्केप सिस्टीम हा गगनयानाचा महत्त्वाचा घटक आहे. या महिन्यात TV-D1 या चाचणी वाहनाची चाचणी केली जाईल. ही चाचणी गगनयान कार्यक्रमांतर्गत चार चाचणी मोहिमांपैकी एक आहे.

त्यानंतर दुसरं चाचणी वाहन TV-D2 आणि पहिल्या मानवरहित गगनयानाची (LVM3-G1) चाचणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत चाचणी वाहन मोहिमेत (TV-D3 आणि D4) आणि LVM3-G2 रोबोटिक पेलोडसह पाठवण्याची योजना आहे.”

आमची तयारी जोरात सुरू आहे. अंतराळयान प्रणालीचे सर्व भाग प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचले आहेत. त्यांची जोडणी सुरू आहे. आम्ही ऑक्टोबर महिन्यात त्याच्या प्रक्षेपणासाठी तयार आहोत. या क्रू एस्केप सिस्टीमसह आम्ही उच्चदाब आणि ट्रान्सेनिक परिस्थितीसारख्या विविध परिस्थितींची चाचणी करणार आहोत.”- एस. उन्नीकृष्णन नायर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe