शेतकऱ्याच्या पोरांचा नांदचं खुळा!! कांदा काढणीसाठी तयार केलं आधुनिक मशीन, शेतकऱ्यांना होणारं फायदा

Ajay Patil
Published:

Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) बारामाही काबाडकष्ट करत असतात. देशात आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती (Onion Farming) केली जाते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) दर वर्षी कांदा काढणीसाठी मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रात गतवर्षी कांदा काढण्यासाठी अक्षरशा रात्रपाळी करून शेतकरी बांधवांना कांदा काढणीची (Onion Harvesting) कामे करावी लागली होती.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात भीषण मजूर टंचाई मागच्या वर्षी जाणवली होती. मध्यप्रदेश मध्ये देखील शेतकरी बांधवांना कांदा काढणीसाठी कायमच मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मध्यप्रदेशच्या शेतकऱ्याच्या पोरांनी एक भन्नाट कामगिरी केली आहे.

आपल्या आई वडिलांना कांदा काढणीसाठी कष्ट घ्यावे लागत असल्याने या शेतकऱ्याच्या पोरांनी कांदा काढण्यासाठी चक्क एक आधुनिक मशीनच (Onion Harvesting Machine) तयार केल आहे. यामुळे सध्या या पोरांची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे, असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशात या शेतकऱ्यांच्या पोरांची चर्चा रंगली आहे असं म्हणणं काही वावग ठरणार नाही.

मित्रांनो मध्य प्रदेशातील धार येथील पचखेडा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुमारे 32 विद्यार्थ्यांसह कांदा काढण्याचे यंत्र बनवले आहे, या यंत्राच्या सहाय्याने जमिनीतून कांदा काढणी सोपी होणार आहे. अर्थातच कांदा हार्वेस्टिंग साठी शेतकरी बांधवांना अधिक मजुराची शोधाशोध करावी लागते मात्र या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या हार्वेस्टिंग मशीनमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी कायमची मिटणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर मिळाला सर्वोत्कृष्ट डिझाईनचा पुरस्कार

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कांदा काढणीमध्ये मधुर टंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी वेळेवर कांदा काढण्याचे काम होत नाही. यामुळे या शेतकऱ्यांच्या पोरांनी यंत्र निर्मितीची प्रक्रिया सुरु केली. ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती, ती आता पूर्ण झाली आहे. एक लाख 50 हजार रुपये खर्चून हे यंत्र तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अभियांत्रिकीच्या या विद्यार्थ्यांच्या संघाला 17 जुलै रोजी राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट डिझाईनचा पुरस्कारही देण्यात आला. यावेळी संघाला 25 हजार रुपये आणि शिल्ड प्रदान करण्यात आली.

यंत्राविषयी थोडक्यात 

  • मनवर तहसीलच्या पाचखेडा गावातील विद्यार्थी पंकज पाटीदार यांनी सांगितले की – हे यंत्र 32 विद्यार्थ्यांच्या टीमने बनवले आहे, जे आठ अश्वशक्तीवर चालते आणि एका तासात तीन हेक्टरमध्ये कांदा काढू शकते.
  • हे यंत्र तयार केल्यानंतर स्पर्धेमध्ये मूल्यांकन करण्यात आले –
  • ज्यामध्ये खोदण्याची कार्यक्षमता 91.3 टक्क्यांपर्यंत असेल.
  • कमी वेळेत जास्त काम करू शकते.
  • येणाऱ्या काळात हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
  • या प्रकारच्या यंत्रामुळे शेतकऱ्याची शेतीची कामे करताना मजुरांची बचत होणार आहे.
  • पीक वेळेवर काढल्यास ते खराब होणार नाही.
  • कांदा पिकाला योग्य भाव मिळेल.

कुलगुरूंच्या प्रेरणेने तयार करण्यात आली मशीन

बहुतांश भागात मजुरांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना वेळेत कांदा पीक काढता येत नसल्याने आता हे यंत्र शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रदीप कुमार बिसेन यांच्या प्रेरणेने ते उभारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कांदा काढणी यंत्राच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱ्या टीम सदस्यांमध्ये हर्षिता चौबे, सचिन पटेल, आकर्ष उपाध्याय, युवराज पाटीदार, साहिल यादव, पंकज पाटीदार इत्यादी विद्यार्थी सामील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe