Banana Farming: केळीची लागवड करा अन लखपती बना…! केळीच्या सुधारित जाती शेतकऱ्यांना बनवतील मालामाल

Ajay Patil
Published:

Banana Farming : आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात पीकपद्धतीत मोठा अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. देशातील शेतकरी सध्या नगदी पिकांचे (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती करू लागला आहे. आपल्या देशात फळबाग वर्गीय पिकांची आता मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केळी (Banana) हे देखील एक नगदी पीक असून शेतकरी बांधव याची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करू लागले आहेत. विशेष म्हणजे याची शेती (Agriculture) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करत आहेत. राज्यातील खानदेश प्रांतात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील केळीसाठी जी आय टॅग देखील देण्यात आला आहे. यामुळे येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. केळी शेतीची व्याप्ती बघता आज आपण केळीच्या काही सुधारित जाती (Banana Variety) जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

केळीच्या सुधारित वाणाची लागवड करावी

भारतातील हवामान आणि जमिनीनुसार केळीच्या 500 हून अधिक जाती आढळतात. केळी बागेतून मोठे उत्पन्न मिळविण्यासाठी केवळ त्याच्या प्रगत, रोग प्रतिरोधक आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी.

नेंद्रन केळी 

केळीच्या नेंद्रन जातीला कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा देणारे वाण म्हणून ओळखले जाते. यामुळेच दक्षिण भारतातील बहुतांश शेतकऱ्यांची पहिली पसंती नेंद्रन केळीला आहे. या केळीची लागवड केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून चिप्स आणि पावडर बनवली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात.

मोंथन केळी 

बिहार ते केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांमध्ये मोंथन केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. साधारणपणे, मोंथन केळीच्या फळाचा मधला भाग कठिण असतो, ज्यामुळे ते बहुतेक भाज्या आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते.  प्रत्येक हंगामात या केळीच्या एका रोपातून 22 किलो उत्पादन मिळते. पण कोकण-गोव्याच्या भागात सहपीक घेऊन त्याची लागवड करण्याची प्रथा आहे.

कर्पूरवल्ली केळी

केळीची ही एक दीर्घ कालावधीची जात आहे, जी प्रति झाड 25 किलो पर्यंत उत्पादन देते. केळीची ही जात कमी खर्चात चांगली वाढ मिळवते. हवामानाच्या धोक्यांचाही त्यावर विशेष परिणाम होत नाही. यामुळेच तामिळनाडूतील बहुतांश केळी उत्पादक शेतकरी कर्पुरावल्ली केळीचे पीक घेतात. याचा उपयोग भाजी म्हणूनही केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe