Brinjal Farming Tips : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कमी खर्चात आणि कमी कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरते.
मित्रांनो वांगी हे देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक असून या पिकाची संपूर्ण भारत वर्षात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची विशेष उल्लेखनीय लागवड पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण जवळपास सर्वच विभागात वांगी या पिकाची शेती पाहायला मिळते. मित्रांनो रब्बी हंगामात वांग्याचे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. वांग्याची रोपवाटिका सप्टेंबर महिन्यात तयार केली जाते आणि वांग्याची रोपे लावणीसाठी नोव्हेंबर महिन्यात तयार होतात.
अशा परिस्थितीत आज आपण वांगी रोपे लागवड करताना गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी घेतली तर त्यांच्या उत्पादनात भर पडणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया वांगी रोपांची पुनर्लागवड करताना घ्यावयाची काळजी.
अशा जमिनीत वांग्याची पुनर्लागवड केली पाहिजे :-
मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार वांग्याची लागवड सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या कसदार जमिनीत केली पाहिजे. अशा जमिनीत वांग्याची लागवड शेतकरी बांधवांनी केल्यास त्यांना वांग्याच्या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त होणार आहे परिणामी त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.
तसेच कृषी तज्ञांच्या मते जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास वांग्याच्या पिकापासून अधिक उत्पादन मिळत असते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या जमिनीचा सामू म्हणजेच पीएच ५.५ ते ६.६ असतो त्या ठिकाणी या पिकाची वाढ उत्तम होते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी जमिनीचा पीएच मेंटेन करणे आवश्यक राहणार आहे. यासाठी शेतकरी बांधव कृषी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
रोपांची पुनर्लागवड कशी करावी बर :-
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, वांगी रोपे लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरट करून घ्यावी. नांगरणी व्यवस्थित रित्या झाल्यास पिकाची वाढ चांगली होत असते. नांगरणी केल्यानंतर शेतकरी बांधवांना चांगले कुजलेले शेणखत मिसळण्याचा सल्ला देखील जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीत शेणखत मिसळल्यास वांग्याच्या पिकातून अधिक उत्पादन मिळू शकते. यानंतर सऱ्या वरंब्या तयार करून वांग्याच्या रोपांची लागवड केली पाहिजे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे :-
जस की आपण आधी बघितलं की रोपांची लागवड करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
जाणकार लोकांच्या मते सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर दिली पाहिजे यामुळे पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होत असते.
तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, माती परीक्षणानुसार हेक्टरी १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित ७५ किलो नत्र दोन समान हप्त्यांत विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे. जाणकार सांगतात की, खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी दिले पाहिजे.