Cotton Farming: देशात सर्वत्र आता मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात देखील सर्वत्र मौसमी पाऊस (Rain) झाला असून अनेक ठिकाणी पावसाची चांगली समाधानकारक हजेरी बघायला मिळाली आहे. यामुळे राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीला वेग आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी (Farmer) खरिपातील पेरण्या पूर्ण केल्या आहेत.
मित्रांनो खरीप हंगामात आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली जाते. राज्यात (Maharashtra) देखील कापसाचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. खानदेशात त्याची लागवड विशेष उल्लेखनीय असून येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कापूस पिकावरचं अवलंबून आहे.
कृषी तज्ञांच्या मते, गत हंगामात कापसाला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. मित्रांनो, कापसाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते मात्र कापूस लागवड केल्यानंतर पीक बहरात आले की दरवर्षी गुलाबी बोंड आळीचा (Pink Bollworm) धोका हा कायम असतो.
गुलाबी बोंड आळी मुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र आता गुलाबी बोंड आळी वर तोडगा काढला जाणार असून या खरीप हंगामात एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने कापसावर येणाऱ्या गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवले जाणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विशिष्ट तंत्रज्ञानाविषयी सविस्तर.
कापूस लागवडीला आला वेग
राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लगबग करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी देखील कापूस लागवडीसाठी प्रयत्नरत आहेत. यामुळे कापूस पिकासाठी घातक ठरत असणाऱ्या गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मेटिंग डिस्टर्बन्स या सुधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता गुलाबी बोंड आळी वर आळा घालता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मित्रांनो देशातील एकूण 23 जिल्ह्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात अधिक कापसाचे उत्पादन घेतले जाते त्या ठिकाणी गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण कसे मिळवले जाईल
•मित्रांनो कापूस पिकासाठी घातक ठरत असलेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक रसायनाचा वापर केला जाणार आहे.
•या तंत्रज्ञानाच्या मदतीने गंधक कापसाच्या झाडाच्या विशिष्ट भागात लावले जाणार आहे. यामुळे मादी पतंगाच्या गंधाने नर याकडे आकर्षित होणार आहेत.
•गंधक लावलेल्या ठिकाणी मिलनासाठी नर पतंग वारंवार जातील मात्र मादी पतंग न मिळाल्याने ते परत येतील.
•म्हणजेच मिलन प्रक्रिया न झाल्याने अंडी घालण्याच्या क्रियेमध्ये अडसर निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
•एकंदरीत काय या सुधारित तंत्रज्ञानामुळे नव्याने अळीची निर्मिती होणार नाही.
•ही प्रक्रिया कापसावर बोंड आळी नियंत्रणासाठी फायद्याची आहे मात्र हे तंत्रज्ञान अतिशय किचकट आहे.