Farmer Success Story:- सध्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून राहणे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. कारण गारपीट तसेच वादळी वारे, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे हातात आलेली पिके वाया जातात आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. या दृष्टिकोनातून शेती आधारित व्यवसाय उभारून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
शेती आधारित अनेक उद्योग व्यवसाय असून यामध्ये अनेक प्रक्रिया उद्योगांचा देखील अंतर्भाव होतो. अगदी बरेच छोटे मोठे व्यवसाय हे शेतीशी आधारित असल्यामुळे कमीत कमी गुंतवणुकीतून चांगले व्यवसाय उभारता येतात. शेती आधारित व्यवसायांचा विचार केला तर सध्या सेंद्रिय शेतीला खूप मोठ्या पद्धतीने प्रोत्साहन दिले जात असून अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
आपल्याला माहित आहे की सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खत किंवा कीटकनाशके यांना कुठल्याही पद्धतीचा थारा न देता विविध प्रकारचे सेंद्रिय खते म्हणजे शेणखत गांडूळ खताचा वापर प्रामुख्याने केला जातो. यातून दृष्टिकोनातून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील महाराजा गंज जिल्ह्याच्या नंदना या गावच्या नागेंद्र पांडे या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने शेणाचा वापर करून वर्मी कंपोस्ट व्यवसायाला सुरुवात केली आणि वर्षाला लाख रुपयांचा नफा या माध्यमातून तो कमावत आहे.
वर्मी कंपोस्ट व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज जिल्ह्यातील नंदना या गावचे नागेंद्र पांडे हे कृषी विषयांमध्ये पदवीधर असून पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली. परंतु यामध्ये त्यांना यश नाही आले. नोकरीचा शोध त्यांनी अनेक वर्ष सुरू ठेवला परंतु नोकरीने मिळाल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली.
परंतु परंपरागत पद्धतीने शेती करून आपल्याला काहीही साध्य करता येणार नाही हे त्यांना कळले व अशा परिस्थितीमध्ये जमिनीच्या एका भागावर त्यांनी सेंद्रिय खत निर्मिती करायचे ठरवले व 2000 मध्ये गांडूळ खत तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकली. काही भागांमध्ये गांडूळ खताची निर्मिती आणि उरलेल्या भागांमध्ये सेंद्रिय शेती अशा पद्धतीने त्यांनी शेतीला सुरुवात केली.
खत तयार करण्याकरता गांडुळांची गरज पडली तेव्हा त्यांनी कृषी व उत्पादन विभागाशी संपर्क साधून गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेतली. प्रयोग म्हणून सुरुवातीला त्यांच्या एका मित्राकडून त्यांना 40 ते 50 गांडूळ त्यांना मिळाले व ही गांडूळे त्यांनी शेण आणि काडीकचरा यामध्ये मिसळून एका कुंड्यांमध्ये टाकली.
45 दिवसांमध्ये या 40 ते 50 गांडूळांच्या माध्यमातून दोन किलो गांडूळे तयार झाली व याच बेड पासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. या बे डच्या माध्यमातून त्यांनी गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली व आज एक एकर मध्ये त्यांचे गांडूळ खत निर्मितीचे पाचशे बेड तयार केले असून एका वर्षात सुमारे बारा ते पंधरा हजार क्विंटल गांडूळ खत तयार करत आहेत. या व्यवसायातून ते लाखोंचा नफा मिळवत असून इतर शेतकऱ्यांनी देखील गांडूळ खत तयार करावे यासंबंधीचे प्रशिक्षण देखील देत आहेत.