Grape Variety:- शेतीमध्ये जे काही तंत्रज्ञान आलेले आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केला तर शेतीमधून आपण विचार करू शकत नाही अशा गोष्टी घडू शकतात. तसेच आताची तरुण पिढी शेतीमध्ये आल्याने अनेक नवनवीन प्रयोग करण्याला प्राधान्य देतात व अशा प्रयोगांच्या माध्यमातून देखील अनेक फायदेशीर आणि उपयुक्त ठरतील अशा गोष्टी जन्माला येतात.
त्यामुळे शेती व्यवसायात प्रयोगशीलता असणे खूप गरजेचे आहे. या प्रयोगशीलतेचा जर आपण विचार केला तर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या सहाय्याने व मार्गदर्शनाने द्राक्ष वेलींच्या उत्परीवर्तनाचा आधार घेऊन स्वतःच काळ्या द्राक्ष वाणांची निर्मिती केली आहे व हे वाण लवकर तयार होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकर फायदा तर मिळतो व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे वाण विशेष पसंतीचे ठरत आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केला काळ्या द्राक्षांचा वाण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने द्राक्ष शेतीमध्ये विशेष प्रगती केली असून या भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष वेलींच्या उत्परिवर्तनाचा आधार घेऊन स्वतः काळ्या द्राक्ष वाणाची निर्मिती केली आहे.
या वाणाची विशेषता म्हणजे हा लवकर काढणीस तयार होतो व त्यामुळे शेतकऱ्यांकडून या वाणाला पसंती मिळताना दिसून येत आहे. इंदापूर तालुका म्हटला म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड केली जाते व आता हलक्या ते मध्यम जमिनीवर देखील काळ्या द्राक्षांची लागवड वाढताना दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यातील द्राक्ष आज सर्वात महागडी द्राक्ष म्हणून ओळखली जातात. सध्या या भागातील द्राक्ष काढणी सुरू झाली आहे व द्राक्षाच्या प्रती प्रमाणे किलोला 135 ते 170 रुपये दर मिळत आहे.
तसेच द्राक्ष शेतीमधील अनुभव असलेले बागायतदार व कृषी शास्त्रज्ञ यांच्या मदतीने येथील शेतकऱ्यांनी उत्कृष्ट आकार व चांगली चव असलेले द्राक्ष विकसित केले आहेत.
अगदी शांत पद्धतीने या ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन पद्धतीचा आधार घेऊन वाढवलेले काळ्या द्राक्षाचे वाण हे निश्चितच फायद्याचे ठरताना दिसून येत आहे.