Silk Farming:रेशीम शेतीतून कमवू शकतात लाखो रुपये! फक्त फॉलो करा या टिप्स होईल फायदाच फायदा

Ajay Patil
Published:
silk farming

Silk Farming :- कुठल्याही पिकांपासून जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता आवश्यक असणारे व्यवस्थापन आणि नियोजन योग्य कालावधीमध्ये करणे खूप गरजेचे असते. तसेच त्यांचे खत व्यवस्थापनापासून पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबी खूप काटेकोरपणे करणे गरजेचे असते. जसे हे पिकांच्या बाबतीत असते तसे ते व्यवसायाच्या बाबतीत देखील असते. व्यवसायामध्ये देखील चांगला नफा मिळावा याकरिता अनेक प्रकारचे व्यवस्थापन खूप गरजेचे असते.

तेव्हा कुठे आपल्याला यामधून चांगला परिणाम मिळत असतो. या मुद्द्याला धरून जर आपण रेशीम शेतीचा विचार केला तर रेशीम शेती मधून देखील शेतकरी अगदी कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळवू शकतात. परंतु याकरिता देखील अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते. रेशीम शेती फायदेशीर होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? याबद्दल महत्वाची माहिती घेऊ.

 चांगला उत्पादनासाठी या पद्धतीने करा व्यवस्थापन

1- रेशीम शेतीतून जर तुम्हाला चांगले उत्पादन हवे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे रेशीम किड्यांसाठी आवश्यक असलेला तुतीचा पाला हा दर्जेदार असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुती बागेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे.

2- रेशीम कोषची काढणी सुरू झाल्यानंतर लगेचच तुती बागेची छाटणी करावी.

3- छाटणी झाल्यानंतर तुती बागेतील ज्या काही सऱ्या असतात त्या व्यवस्थित नांगरून घ्यावे व त्याची वखरणी करून आवश्यक खतांच्या मात्रा द्याव्या.

4- छाटणीनंतर दीड महिन्याचा कालावधीमध्ये कीटकांना खाद्यासाठी तयार होतात.

5- रेशीम कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर रेशीम कोष संगोपनगृहाची व्यवस्थित स्वच्छता करून घ्यावी व निर्जंतुकीकरण करावे.

6- जेव्हा चॉकी आणाल तेव्हा रेशीम कोष उत्पादनाची पुढील बॅचला सुरुवात करावी व यामध्ये चॉकी अवस्थेत रेशीम किटकांची खूप व्यवस्थितपणे काळजी घ्यावी.

 रेशीम उद्योगाची अशाप्रकारे करावी सुरुवात

रेशीम व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते याकरिता एका खोलीच्या आत मध्ये कीटक पाळण्यात येतात व सर्वात अगोदर तूतिच्या पिशव्या टाकणे गरजेचे असते. जेणेकरून कीटकांना पाने खाता येतात.रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये स्वच्छ हवा आणि व्यवस्थित प्रकाश येण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

तसेच या संगोपनगृहामध्ये लाकडी ट्रायपॉड  ठेवावे व त्यावर ट्रे ठेवणे गरजेचे आहे. ट्रायपॉडच्या खाली पाणी ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्याचे मुंग्या व इतर कीटकांपासून संरक्षण होऊ शकेल. हा एक शेतीवर आधारित कुटीर उद्योग असून तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये या व्यवसायाची सुरुवात करून चांगला पैसा मिळवू शकतात. शेती करत असताना तुमच्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा हा एक चांगला स्त्रोत निर्माण करू शकतो.

 रेशीम शेतीतून मिळणारे उत्पन्न

जर आपण यामध्ये रेशीमचे प्रमाण पाहिले तर ते 18 ते 22% पर्यंत असते व जर आपण एका महिन्याचे रेशीम कोष उत्पादन पाहिले तर ते अडीचशे ते तीनशे किलो आपल्याला मिळते. सध्या रेशीम कोषला बाजारपेठेमध्ये 300 ते 550 पर्यंत किलोला दर मिळत आहे.

साधारणपणे एक उत्पादन हातामध्ये यायला अडीच महिन्याचा कालावधी जायला लागतो. बाजारपेठेत मिळणारा दर आणि एकूण उत्पादन पाहिले तर एकरी वीस हजार रुपयांचा खर्च वजा करता तुम्हाला यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न सहजपणे मिळवता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe