Banana Farming: केळीची शेती बनवणार शेतकऱ्यांना मालामाल, मात्र लागवड करण्यापूर्वी जाणून घ्या केळीच्या सुधारित जाती

Ajay Patil
Published:

देशात मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची (Orchard Planting) लागवड केली जाते. यामध्ये केळीच्या पिकाचा (Banana Crop) देखील समावेश आहे. देशात सर्वाधिक आपल्या राज्यात केळीची लागवड (Banana Farming) केली जाते.

राज्यातील एकूण केळीच्या उत्पादनात खानदेशातील जळगाव जिल्ह्याचा (Jalgaon District) मोठा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्यातील केळी गुणवत्तापूर्ण असल्याने या जिल्ह्यातील केळीला जीआय टॅग (GI Tag) देखील प्राप्त झाला आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीला वैश्विक स्तरावरएक वेगळी ओळख मिळाली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Grower Farmers) याचा मोठा फायदा होत आहे. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, केळीची शेती (Banana Cultivation) सुरु करण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे.

मात्र असे असले तरी केळीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन (Banana Production) मिळविण्यासाठी केळीच्या सुधारित वाणांची (Banana Improved Varieties) लागवड करणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. शेतकरी बांधव आपल्या जमिनीच्या पोतनुसार, हवामानानुसार, पाण्यानुसार, आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता कृषी तज्ञांच्या सल्ल्याने सुधारित वाणांची निवड करू शकतात.

असे केल्यास केळीच्या शेतीतून शेतकऱ्यांना निश्चितच चांगला फायदा मिळू शकतो असा दावा केला जात आहे. केळीच्या आपल्या देशात जवळपास 500 हून अधिक प्रजाती आहेत. मात्र काही ठराविक प्रजातींची व्यावसायिक स्तरावर शेती केली जाते.

आपल्या राज्यात केळीची शेती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केळीची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. केळी उत्पादक शेतकरी एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण केळीच्या काही सुधारित वाणांची माहिती जाणुन घेणार आहोत.

कृषी तज्ञांच्या मते, आपल्या देशात केळीच्या एकूण 500 हून अधिक प्रजाती आहेत. यापैकी अनेक प्रजाती अशा आहेत, ज्यांची व्यावसायिक स्तरावर शेती आता देशभर केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना आता चांगले उत्पन्न देखील मिळत आहे.

केळी लागवडीची वेळ प्रजाती, प्रदेशाचे हवामान, बाजारपेठेची गरज इत्यादी विविध घटकांद्वारे केळीची जातं निश्चित केली पाहिजे. कृषी तज्ञांच्या मते, पश्चिम आणि उत्तर भारतात केळीची लागवड करण्याचा उत्तम काळ म्हणजे नैऋत्य मान्सूनची सुरुवात म्हणजेच जून-जुलैचा महिना.

दक्षिण भारतात विशेषता केरळच्या मलबार भागात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आणि इतर काही भागात डिसेंबर महिन्यात केळीची लागवड केली जाते. म्हणजेच काय, केळीची व्यावसायिक लागवड देशात प्रत्येक हंगामात केली जाते. मात्र असे असले तरी केळीची लागवड करण्यापूर्वी, शेतकर्‍यांनी त्यांची जाती जाणून घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची कमाई वाढू शकेल. यामध्ये काही जाती विशिष्ट क्षेत्रासाठी वरदान ठरत आहेत.

केळी लागवडीचा योग्य कालावधी 

»एप्रिलमध्ये पालिनीच्या खालच्या टेकड्यांवर.

»फेब्रुवारी-मार्चमध्ये कावेरी नदीच्या काठावर.

»तंजोरमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यात केळीची लागवड केली जाते.

»म्हैसूर, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये जूनच्या शेवटी केळीची लागवड केली जाते.

»पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर जून-जुलैमध्ये केळीची लागवड केली जाते.

»महाराष्ट्रात मे ते जुलै महिन्यात केळीची लागवड केली जाते शिवाय सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात देखील केळीची आपल्या महाराष्ट्रात केली जाते.

»आपल्या राज्यात डवार्फ कॅवेंडिश आणि रोबस्टा या जातीच्या केळीची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.

भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या केळीच्या काही सुधारित जाती

कॅवेंडिश, अल्पान, मालभोग, कोठीया, वान, रास्थळी, करपुरावल्ली, नेद्रान, पुवान, चकारा केळी, डवार्फ कॅवेंडिश, रोबस्टा, जहाजी, काचकेल, होंडा, डिगजोवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe