देव तारी त्याला कोण मारी! कांद्याने मारले पण कांदा पातीने तारले! कांद्याची पात विकून कांदा उत्पादक झाला लखपती, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Successful Farmer: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेत असतात. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (Pune) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात (Purandar) विशेषता दिवे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे आणि कांदा पातीचे शेतकरी बांधव उत्पादन घेत असतात.

सध्या कांद्याला संपूर्ण राज्यात अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Grower Farmer) मोठ्या संकटात सापडला आहे.

मात्र अशा परिस्थितीत देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या पातीने तारल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे. दिवे परिसरातील एका शेतकरी दाम्पत्यांने कांदा पात विक्रीतून लाखो रुपये उत्पन्न (Farmers Income) कमावण्याची किमया साधली आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये कांदा पातीला सध्या मोठी मागणी असल्याने कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानादेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदापात विक्रीतून लाखो रुपये मिळत आहेत.

दिवे येथील शेतकरी ताराचंद झेंडे यांनी आपल्या सिताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून कांदापातीची लागवड केली होती. त्यांनी दीड एकर सीताफळ बागेत कांदा पात लागवड केली होती.

यासाठी त्यांनी सुरुवातीला सिताफळाच्या बागेत वाफे तयार केले आणि जमीन भिजवून घेतली. जमिन ओलिताखाली आल्यानंतर ताराचंद यांनी कांदा बियाणे पेरले आणि सुरवातीला फ्लड पद्धतीने कांदा बियाण्याला पाणी भरले.

विशेष म्हणजे त्यांनी यासाठी स्प्रिंकलर लावून पाणी व्यवस्थापन केले. कांदा पातीचे दर्जेदार उत्पादन मिळावे म्हणून त्यांनी जीवामृताचा देखील वापर केला.

खरं पाहता कांदा पातीला जास्त गरम वातावरण सहन होत नाही मात्र स्प्रिंकलरचा यशस्वी उपयोग करून ताराचंद यांनी कांदापातीचे चांगले यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे.

याकामी त्यांना त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती अर्चना झेंडे यांची देखील मोलाची मदत लाभली आहे.ताराचंद त्यांनी उत्पादित केलेली कांदा पात प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या बांधावर गर्दी करत आहेत.

विशेष म्हणजे ताराचंद यांनी कांद्याची देखील लागवड केली होती मात्र सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने ताराचंद यांना कांदा पिकातून अतिशय नगण्य उत्पन्न मिळणार आहे.

मात्र, एकीकडे कांद्याने मारले तर कांदा पातीने ताराचंद यांना तारले आहे. ताराचंद यांनी उत्पादित केलेली कांदापात चांगली दर्जेदार असल्याने व्यापाऱ्याने थेट त्यांच्या बांधावर हजेरी लावत कांदापात खरेदी केली आहे. व्यापाऱ्यांनी दीड एकरात लावलेली कांदापात दीड लाख रुपयाला खरेदी केली आहे.

यामुळे ताराचंद यांना आर्थिक हातभार लागला आहे. एकीकडे कांद्याने रडवले तर कांदा पातीने ताराचंद यांना हसवले आहे. निश्चितच ताराचंद यांनी योग्य नियोजनाच्या जोरावर विपरीत परिस्थितीत देखील चांगले नेत्रदीपक यश संपादित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe